Saturday, May 1, 2010

17. Kanala KhaDa

एक छोटीशी गोष्ट आहे, सासू सुनेच्या नात्याची. अनेकींना भावलेली, अनेकांना लाजविणारी. नवीन साडी खरेदी म्हणजे बायकांचा आनंदोत्सव असतो नाही का? खरेदी करायला जाण्यापासून किंबहुना जायचे मनात आल्यापासूनच किती तरी साड्या डोळ्यापुढून गेलेल्या असतात. मग, दिवस येतो प्रत्यक्ष खरेदीचा. उत्सव साजरा करण्याची ती दुपार आणि निवांत लक्ष्मी रोड असल्यावर भरपूर खरेदी करून घरी यायचे हे वेगळं थोडेच असणार तुमच्या माझ्या घरी. असेच होते तिच्याही घरी.... तरी पण नक्कीच काहीतरी  वेगळं...
असं कसं सांगू...वाचूनच बघा कथा. आणि ठरवा तुम्ही कुठे होतात त्या वेळी?
हो... मलाही कळू देत की तुम्ही कुठे असता ते? मग, रिमार्क मध्ये टाका कथा कशी वाटली आणि तुम्ही कुठल्या दुकानात जाऊन आलात. कायकाय बघितलं आणि घेतलं काय?

वंदना 

16. Journey from Saptahik Sakal to Maitree Bankingshee

नुकतीच सहा महिन्यापूर्वी लंडनचा सहा महिन्याचा मुक्काम करून घरी परतले. धाकट्या मुलीचे लग्नही लावले.... आणि थोडीशी निवांतपणे वावरत होते. घरात एक बाळंतीण आणि लग्नघर, शिवाय परदेशातून येणाऱ्या मुली म्हणजे ह्या मोठमोठ्या बॅगा त्यांच्या. म्हणून जागा करताना, माझ्या  बँकिंग लिखाणाची भली मोठ्ठी रद्दी टाकली. म्हंटल मनात,’ दहा वर्ष झाली बँक सोडून, आता कोणी म्हणणार नाही मला बँकिंग वर लिहा म्हणून.’ दिलं टाकून. ना खंत ना खेद. आणि....
अचानक जानेवारी २०१० मध्ये सकाळ ऑफिसमध्ये बोलावणे आले. गेले भेटायला. साप्ताहिक सकाळच्या संपादकांनी बोलावले होते. गप्पा सुरु झाल्या. त्यांना बँकिंग विशेषांक काढायचा होता. मी अगदी स्पष्ट शब्दात बोलले, “तुम्ही माझी मदत मागताय? माहित आहे ना दहा वर्ष झाली बँक सोडून मला. आणि सकाळ मध्ये बँकिंग लिहायला फक्त पुण्यात हजार बँक अधिकारी मिळतील तुम्हाला. बघा, विचार करा एकदा.”
तर ते म्हणाले, “आम्हाला दुसरे कोणी नको. धर्माधिकारीचं पाहिजेत. मला तुम्ही लिहिलेलं बँकिंग समजते. साधं सोप्प, पटकन लक्षात येणारे. सामान्य माणसाला हवे तसे तुम्ही लिहिता, आणि मीही मला काही हवे असेल तर तुमचे बँकिंग जिज्ञासा वाचतो.”
मग काय, मी सरसावले पुढे, आणि लागले कामाला. तेंव्हा संपादकांनी माझ्यापुढे एक अंक टाकला, आरोग्य विशेषांक, “यात, आरोग्याच्या १०० टिप्स दिल्या आहेत. ठेवा संग्रही.”
म्हंटल द्या, सेकंड इनिंग सुरु झालेली, हे असलं बरं असतं जवळ असलेलं.
आणि आम्ही दोघांनी मिळून विषय ठरवले, काय घ्यायचे काय नको ते झालं. आणि उठताना मी म्हंटल, “आरोग्य विशेषांकांत १०० आरोग्याच्या टिप्स दिल्यात ना. मग, बँकिंग विशेषांकात मी १०० बँकिंग अॅब्रिव्हेशन्स देते.”
“ १०० द्याल?” थोड्या साशंकतेने त्यांनी विचारलं.
“ अगदी सहज होतील १००. देतेच.”
आणि फेब्रुवारी २०१० - दुसरा साप्ताहिक सकाळ अंक बँकिंग विशेषांक काढला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी मला परत बोलावलं. तेंव्हा समजलं त्या १०० आकड्यामुळे अनेकांनी अंक घेतले, काही सहकारी बँकांनी आपल्या प्रत्येक शाखेसाठी एकेक घेतला. मग काय ठरलं लेखमाला करायची. मलाही सुरसुरी आली, आणि १ मे, २०१० पासून “नाते बँकिंगशी” लेखमाला सुरु झाली. लेखमालेला खूपच छान प्रतिसाद मिळाला. इतके लिखाण तयार झाल्यावर पुस्तक नाही काढलं तर ती वंदना कसली... नाही का? काढलं तेही सकाळ प्रकाशन कडूनच. “मैत्री बँकिंगशी”. तर ही होती मैत्री बँकिंगशी पुस्तकाची जन्मकहाणी.

वंदना





Monday, March 8, 2010

76. Pallavi - पालवी - अडगुलं मडगुलं ते पैलतीर



08-03-2010



पालवी – अडगुलं मडगुलं ते पैलतीर
लेखिका : सौ. वंदना विजय धर्माधिकारी

लेखणी सर्वत्र उधळत पळत होती. मासिके, वर्तमानपत्रे काहीतरी देत होते. ते घेत होते, छापत होते.  मुक्ता मासिकात दरमहा लिखाण करायची संधी मला दिली. ललित वैचारिक लेख द्यायचे होते. अगदी माझ्या आवडीचे काम होते. साहजिकच माझी लेखणी घरात फिरू लागली लहानांमध्ये खेळू लागली. तरुणाईत रंगू लागली आणि वयस्करांबरोबर शांतपणे गप्पा मारू लागली. नातेवाईक येत जात होते, एकीकडे अभ्यास करणारे टाळाटाळ करीत होते. कोणीतरी आपल्या लग्नाची स्वप्ने रंगवीत होते. आजीआजोबा आयुष्याचा लेखाजोखा मांडण्यात मग्न झालेले. एकाचे एक तर दुसऱ्याचे भलतेच काहीतरी. ताळमेळ कसा बसणार, आणि गाडी रुळावर कशी कधी येणार. आयुष्यातली निरुत्तरित राहिलेली कोडी उगाचच पुन्हा पुन्हा उकलत बसण्यात काही अर्थ नसतो हे माहित असले तरी त्यावरून मनस्ताप होतोच ना. दुरावा बोचतो, तर कोणाची हाक बळ देऊन जातं.

छोट्या छोट्या गोष्टी सहज टिपल्या जातात, बोचत राहतात. बोचणीची होते लेखणी आणि कोड्याचे उत्तर सापडते. एकेक करीत एकवीस लेखांना एकत्र गुंफल आणि त्यांची पालवी तयार केली. अडगुलं मडगुलं म्हणतं पिढ्या पिढ्या मोठ्या झाल्या. त्याच काही टप्प्यांवर डोलत असते पालवीची हिरवाई. वैचारिक हिरवळ म्हणू यात का? पायवाट मोकळी सापडते आणि जोरात पळत जावं त्याच वाटेवरून अशी उभारी देखील मिळते.



वंदना धर्माधिकारी








15. Palvee 2nd Edition

एखादा प्रसंग समोर घडत असताना आपण त्यात मिसळतोचं असे नाही. असतो तिथेच चार चौघांसारखे पण विचार आपल्याला दूर कुठेतरी नेत असतात. छोटे छोटे प्रसंग बरेच काही सांगून जातात, मौलिक देऊन जातात. तेच असेच काही बोलके क्षण मला भेटलेले, तसे सगळ्यांना भेटतातच. तसेच मला भेटले आणि वेगळं सांगून गेले. मुक्ता मासिकाचे निमित्ताने त्यांना मी मोकळी वाट करून दिली. दरमहा एक विचारिक लेख मी लिहित होते, तेंव्हाच असे जाता जाता दिसलेले टिपलेले मांडले आणि अनेकांना आवडले देखील.
त्याचे पालवी – अडगुलं मडगुलं ते पैलतीर पुस्तकात रुपांतर केले.
त्याचीच दुसरी आवृत्तीही काढली जानेवारी २०१५ मध्ये.
अशी ही अनेकांना भावलेली आवडलेली हसवणारी तर कधी मीही असेच चुकीचे वागले होते, आता काय करू? म्हणून कधी कधी अपराधीत्व देऊ करणारी हिरवीगार तजेलदार माझी पालवी इथे येऊ पहात आहे आपल्याकडे.
माझी सगळीच पुस्तके माझ्याकडे आहेत. बोलवा एकेकाला....


वंदना




Saturday, February 6, 2010

14. COEP Sir Vishweshwaryya Memorial Trophy - Debate Competition

महाराष्ट्रातील कॉलेजेसची अंतर्गत इंग्रजी डिबेट स्पर्धा :
 कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे : २०१०


महाराष्ट्र राज्य कॉलेजेस मधील डिबेट स्पर्धा  दोन दिवस ६ आणि 7 फेब्रुवारी, २०१०  रोजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे आयोजित केली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मी आणि इंडियन एक्स्प्रेस संपादिका आम्हा दोघींना निमंत्रण होते. स्पर्धा अतिशय टफ झाली. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयात खूप विविधता होती. आम्ही जरी जज्ज म्हणून होतो, तरी त्यापैकी बरेच विषय दोघींनाही नवीन होते. मुलांची बुद्धी, प्रेझेन्टेशन, वक्तृत्व, सभाधीटपणा सर्वच विशेष कौतुकास्पद होते. अतिशय उत्कृष्ट तयारी करून सगळे आले होते. त्यांच्यात नंबर लावणे आम्हा दोघीनच अवघड गेले होते.

स्पर्धा झाल्यावरचे चित्र अधिक उत्साह देणारे होते. सगळेजन  एकमेकांशी दुसर्याच्या  विषयात इंटरेस्ट घेऊन विचारीत होते. चौकशी करीत होते, गप्पा रंगल्या होत्या. खूप चांगला अनुभव तिथे आला. पुढची पिढी हुशार आहे, याची तिथे खात्री झाली म्हंटल तरी चालेल.




वंदना धर्माधिकारी 


Wednesday, October 21, 2009

13. Award winnning article- Sushrey Diwali aanka 2009

वाढते घटस्फोट आणि वाढती व्यसनाधीनता :
सुश्रेय, दिवाळी अंक २००९ ::: स्पर्धा : प्रथम क्रमांकाचा लेख

ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या सुश्रेय दिवाळी अंकाने स्पर्धा घ्यायचं ठरवलं. त्यांना असेच कुणीतरी माझे नाव सुचविले, आणि त्यांच्याकडून विचारणा झाली. तुम्ही स्पर्धेत भाग घ्यावा असे वाटते. लेख द्याल का आमच्या अंकासाठी.

मला काय, मी लिहीतचं होते दिवाळी अंकांत, इथेही लिहू म्हंटल. विषय गंभीर, चर्चेचा तसाच  आजच्या युगाचा असा होता. मी माझ्यापरीने सर्वांगाने विचार करून लेख पाठवला. आणि त्याला पहिल्या  नंबरचे बक्षीस मिळाले. दिवाळी अंक संपादक पतीपत्नी दोघीही एकदिवस घरी आले. त्यानंतर अधून मधून लिहित असते, याही दिवाळी अंकात काहीतरी. अंक चांगला असतो हा.

वाचाच हा लेख... वैचारिक आहे.



वंदना धर्माधिकारी







Tuesday, October 20, 2009

12. Playing Cards - Sushrey 2009 Diwali aanka

इसपिक एक्का, बदाम राणी, ऐका पत्तेवाणी!

सुश्रेय दिवाळी अंक – २००९ 




वाचला ना लेख. आहे ना गंमत! पत्ते खेळायला मला खूप खूप आवडते.
आता तर पत्त्यांची शाळा दाखवते इथे.....
पत्त्यांची शाळा

मला आवडतं खूप पत्ते कुटायला
पिसून सरसर भरभर वाटायला
मस्तपैकी सर्कन कात्री लावायला
मार कट म्हणता टिचकी मारायला  ..... १.

समोरासमोर बसलेले असतात भिडू
वख्खई बोलता पटकन वळला लाडू
हुकुम लपवा आधी नका फोडू
संपला डाव आता नका ओरडू ..... २.

भिकार सावकार भिडू फक्त दोन
डाव लावायला एकटा देखील पुरे
पाच तीन दोनसाठी हवेत गडी तीन
झब्बुला असतील ते खेळतात सारे ..... ३.

गाढव व्हायला भिणार नाही मी
त्याच्या सारखं ओरडते का कोणी?
झालेला अपमान गिळायला शिकलो
गंमतच गंमत पोट धरून हसलो ..... ४.

नाटे ठोंब म्हणजे माझ्याकडे नाही
जोडी लपवलेली चालणार नाही
कोणाकडे राणी होती आठवत नाही
स्मरणशक्तीची कसोटी होई. ..... ५.

चारी सत्त्या पडल्या खाली
त्यामागे इतरांची पळापळ झाली
मार्कांची बेरेज पटापट केली
बदामसात मध्ये मज्जाच आली ......

मॅरेज मध्ये जो राजा तीच राणी
लफड्यात इथे अडकतं नाही कोणी
तीनशेसात मध्ये तोंडी बेरीज हुकमी
खाजवून डोके करा उतारी नामी ..... ७.

उचल चल पत्ते ... च्यालेंज माझा
गुलाम म्हणून तू लावलास राजा
चुकीच्या लोकांना लगेच पकडा
आयुष्यभराचा गिरवला धडा ..... ८.

अष्ट एक्का त्रिभुज राजा
सप्त राणी चतुर गुड्डू छकी दश्शी
दुरी नवी आणि पणजी
जादूमंत्र पाठ फसाल तुम्ही ..... ९.  

कधी खेळलो मेमरी, कधी बांधला बंगला,
तर कधी मेंढीकोट खूपच रंगला
कधी रमी मध्ये सिक्वेन्स रिअल
अति महत्वाचा जोकरचा रोल ..... १०.

आपली जागा ओळखून वागेल तो खरा
पापला आब प्रत्येकाने ठेवलेला बरा
गुलामचोराची जरी असली थोडी भीती
त्याने तर दिली जादू, युक्ती, अन गती ..... ११. 

दोन काळी दोन लाल राजा राणी मोठे
एक्क्याची सत्ता मोठी अजबच वाटे
असली तर असू दे मी दुर्री बिचारी  
हुकुमाची असेल तर कमालच करी ..... १२.

झालं का खेळून पत्ते करा गोळा
सगळ्यांची लाडकी पत्त्यांची शाळा
त्यातूनच शिकलो चांगल वागायला
संस्कार ते काय पत्त्यांशी बोला  ..... १३.           

.............. तेरा कडवी चार ओळी                                        
         तेर चोक बावन्न बरोबर जुळली..........

वंदना धर्माधिकारी

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com