एखादा प्रसंग समोर घडत
असताना आपण त्यात मिसळतोचं असे नाही. असतो तिथेच चार चौघांसारखे पण विचार आपल्याला
दूर कुठेतरी नेत असतात. छोटे छोटे प्रसंग बरेच काही सांगून जातात, मौलिक देऊन
जातात. तेच असेच काही बोलके क्षण मला भेटलेले, तसे सगळ्यांना भेटतातच. तसेच मला भेटले
आणि वेगळं सांगून गेले. मुक्ता मासिकाचे निमित्ताने त्यांना मी मोकळी वाट करून
दिली. दरमहा एक विचारिक लेख मी लिहित होते, तेंव्हाच असे जाता जाता दिसलेले
टिपलेले मांडले आणि अनेकांना आवडले देखील.
त्याचे पालवी – अडगुलं
मडगुलं ते पैलतीर पुस्तकात रुपांतर केले.
त्याचीच दुसरी
आवृत्तीही काढली जानेवारी २०१५ मध्ये.
अशी ही अनेकांना
भावलेली आवडलेली हसवणारी तर कधी मीही असेच चुकीचे वागले होते, आता काय करू? म्हणून
कधी कधी अपराधीत्व देऊ करणारी हिरवीगार तजेलदार माझी पालवी इथे येऊ पहात आहे
आपल्याकडे.
माझी सगळीच पुस्तके माझ्याकडे
आहेत. बोलवा एकेकाला....
वंदना
No comments:
Post a Comment