रंगतदार बाळ साहित्य
दिवाळी अंक – 2018
कथा :: चला, भेळ खायला.
रेखाताईची दहावीची परीक्षा झाली आणि तिचे सगळे मित्रमैत्रिणी संध्याकाळी भेळ
खायला गेले. घरी आल्यावर जेवायला सुट्टी दिली. इतर सगळे जेवत होते. भेळेतले एकेक
पिंटूच्या पानात नाचत होते, पण हाती काही केल्या येत नव्हते. पोळी एकीकडे तर हात
दुसरीकडे. आवडीची भेंडीची भाजी, हात दुसरीकडे शोधात होता काहीतरी.
“काय चालले तुझे पराग? हात कुठे जातोय? डोळे मिटून घेतले कि काय?” बाबांनी
विचारले.
“ मला भेळ खायची. एकट्याने नाही. सगळे मित्र मैत्रिणींच्या बरोबर. ताई सारखी.”
परागने मागणी केलीचं.
“ इतकेच ना. उद्या दुपारी. तुला देखील सुट्टी लागली आहेच. बोलवं सगळ्यांना.
आपण मस्त भेळपार्टी करू. मागच्या अंगणात करायची. मी सगळं देईन. काय? आता जेवा
पटापट.” आईनेच भेळ पार्टी ठरवली म्हणजे नक्कीच मस्त मस्त होणार.
“आई, मला शिकशील उद्या भेळ करायला.” रेखला उत्साह आला.
“ तुझी मदत हवीच मला. सकाळी घेऊन येऊ सामान. काय? एक मुलगा खूष.”
सगळी चिल्लीपिल्ली गोळा झाली परागच्या घरी. सकाळीच परागने बोलावलेले. उन्हे
ओसरली तशी मुले धावली अंगणात. काही ठरवले नव्हते तरी प्रत्येकाने काही ना काहीतरी
आणलेच. मोठी परात ठेवली मध्ये आणि ओतले की त्यात. चुरमुरे, फरसाण, खारेदाणे,
खारीबुंडी, कैरी, कांदा, शेव, कोथिंबीर. चुमुकल्या हातांनी कालवली. तेव्हढ्यात
आईने मुलांना हाक मारली. सगळे घरात पळाले. पाहतात तो काय परागच्या आईने केव्हढी
तयारी केलेली.... उचललं एकेक आणि आले पळत बाहेर.
सगळं एकदम ओतलं. सांडल बाहेर. निनादने मुठभर भेळ उंच उडवली. त्याने उडवली, काहींनी
तोंडात कोंबली, मग उडवली.
त्यांना काय माहित, वरून कोणीतरी बघतं होते ते. अंगणभर भेळचं भेळ! वर बसलेले
आले खाली. पटापटा टिपले, उडाले वर, आले खाली, उडाले वर! खुपचं मज्जा वाटली. तशी
पोटंही भरत आली होती.
थोडी मोठी ढमाली लीना म्हणाली, “आपण गंमत करू, घरात जाऊ. पक्षांची गंमत बघू.”
बापरे! सगळी मुले उठली, आत पाळली.
चिवचिवाट अंगणात. मुलांच्या आवाजापेक्षा जोरात. इकडून आले, तिकडून आले, काही तर
पलीकडून आले, जोरात आले, खाली धावले, दुडक्या पायांवर उड्या मारीत मारीत टिपायला
लागले. अंगण झाडून साफ तर केलेच लगेच एका मिनिटात. भरलेली परात होतीच, झेपावले
त्यात, आलेले उडाले, चार जणांना घेऊन आले. त्यांचा आवाज चार गल्लीच्या पलीकडे गेला
आणि धाड पडली परातीवर.
टाळ्यांनी केले पक्षांचे स्वागत, उड्यांनी केला मोठा जल्लोष, आई आली आतून
बाहेर. बघते तो काय, पक्षांचीच शाळा सुटलेली आणि अंगणात सगळे मस्त मज्जेत. निनादचा
चेहरा पडला. त्याने नव्हती खाल्ली खूप खूप ढेरपोटभर भेळ. आईच्या नजरेनं टिपलं.
रेखाताई आली, “ व्वाव... बाहेर कोणी जायचं नाही. थांबा.” आणि पाळली आत. जशी गेली तशी आली. हातात काय होतं....भेळ! भेळ!!
“होय...” एकचं आवाज, गलका घरातही. पक्षांनी मात्र घरात आजीबात बघितलं नाही.
सगळे दंग झालेले परातीत. सगळ्यांनी त्यावर ताव मारला.... आत बसलेल्यांची पोटे भरली, आणि बाहेर पक्षांची
देखील. फरक काय झाला सांगू. तुम्हाला येईल का तरी ओळखायला? नाहीच मुळी. मीच
सांगते.
‘अंगण होते सफी साफ. आणि आतमात्र सगळीकडे भेळेचा सडा, कुठे पांढरा, कुठे
पिवळा, कोथिंबीरीची हिरवा हिरवा.’
पुढे सरसावली रेखाताई, तिच्या शेजारी धमाली लीना. ठेवले कंबरेवर हात आणि दिले
फर्मान, “ बघा बरं बाहेर. काय होते तिथे आत्ता.”
रेखाताईने समजावलं “किती चाटून पुसून खाल्ली भेळ पक्षांनी. नाहीतर आपण, ते बघा
अगदी सोफ्यावर बसून कोणी सांडली. खुर्ची खाली उडाली. खिडकीत, सगळ्या घरभर.
आवरायचं, सांडलेल गोळा करायचं.”
सोनाली झाली चिमणी, उड्या मारीत चुरमुरे वेचले. निनाद झाला कावळा करू लागला
कावकाव, गोळा केले त्याने दाणे फक्त. लीनाला ढकललं ताईने तिने घेतला सोफ्याचा
ताबा. पटकन घर सफी साफ.
मुले आली अंगणात, बघितले वर!!!! तर---. काय... गमाडीगंमत !
सगळे पक्षी झाडावर मुलांची वाट बघत होते. मुलांनी मारल्या उड्या, वाजवल्या
टाळ्या, उंच हात करून बोलावले पक्षांना. ते तरी काय कमी की काय! त्यांनी घेतली झेप
खाली. फिरले गोलगोल. मुलांच्या भोवती. चिवचिव, कावकाव, कून..कून... आईने पटकन काढला
फोटो.
बघायचा तुम्हाला.....
वंदना धर्माधिकारी
M : 9890623915
भेळ खाणं अगदी काॅमन. फार छान रंगवली भेळपार्टी. वेगळ्या पद्धतीने मुलांना वळणही,लावलंत आपण. सुंदर.
ReplyDelete