“अलका बापूराव भोमे, १९७६ साली
आले मी सासरी
विजयची मी वंदना आडनाव
धर्माधिकारी
आहो,... सगळंच माझं पुण्यात, आहे मी पक्की पुणेरी
आपला देश, भाषा, संस्कृती याप्रती स्वाभिमान माझ्या उरी”
माझ्याच कवितेच्या या ओळींचा प्रत्यय मला वेगळ्याप्रकारे
करून देण्यात आला. मी पुणेकर तर आहेच, त्याचा स्वीकार पुण्याने केला आणि पुण्याचा
अभिमान सन्मान मला मिळाला.
“पुण्याचा अभिमान : ज्येष्ठोत्सव २०१८ : मा.सौ.वंदना
धर्माधिकारी”
मला तर पुण्याचा अभिमान आहेच. पुणे शहर हीच कर्मभूमी. मी
स्वत: पक्की नारायणपेठी पुणेकर आहे. ज्या पुण्यात माझे आयुष्य गेले त्या शहराची एक
विशेष संस्कृती आहे, तीच माझी आहे. त्याच पुण्यातील आमदारांकडून “पुण्याचा अभिमान”
असे गौरवचिन्ह स्वीकारताना मला खूप आनंद झाला, समाधान वाटले. पुणेकरांना, पुणे
शहरालाही माझा अभिमान आहे, हे माझ्या
लक्षात आणून दिले गेले. "पुण्याचा अभिमान" हा सन्मान मिळाला. समाजिक न्याय
(महाराष्ट्र शासन), आमदार मेधाताई कुलकर्णी, आणि अॅस्कॉप यांचे तर्फे आयोजित ज्येष्ठोत्सव -२०१८
कार्यक्रमाचे सुंदर आयोजन १ ऑक्टोबर, २०१८ रोजी शुभारंभ लॉंन्सवर केले होते. पुण्यातील विशेष
कार्य केलेल्या अनेक पुणेकरांना "पुण्याचा अभिमान" सन्मानचिन्ह देऊन
सन्मानित करण्यात आले. त्यात मलाही हाचं सन्मान मिळाला.
"मला पुण्याचा
अभिमान आणि मी पुण्याचा अभिमान"
माननीय मंत्री राजकुमार बडोले, आणि आमदार मेधाताई कुलकर्णी, यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यांचे खूपखूप
आभार मानते..
आणि... मुख्य म्हणजे मला ही जाणिव
करून दिल्याबद्दल विशेष धन्यवाद!
आणि म्हणूनचं मी खूष आहे!!
वंदना धर्माधिकारी
मी पुणेकर
१ ऑक्टोबर, २०१८,
सोमवार
शुभारंभ लॉंन्स.
डी.पी.रोड, एरंडवणे, पुणे.
Congratulations
ReplyDeleteअस्सल पुणेकर. अभिनंदन
ReplyDeleteपुणे सगळ्यानाच आवडणारे शहर आहे. तरीपण कुठेतरी आवर घालायला हवा. अशा पुण्याला तुमचा अभिमान वाटतो म्हणजे नक्कीच आपले काम चांगले असणार. त्याबःअदल अभिनंदन !
ReplyDeleteअभिनंदन !
ReplyDelete