25-11-2018
‘मैत्री बँकिंगशी ब्रेल रुपांतरित द्वितीय सुधारित आवृत्ती’ लवकरच येत आहे.
नुकतीच “मैत्री
बँकिंगशी – बेस्ट सेलर” पुस्तकाची सुधारित अकरावी आवृत्ती यशोगाथा ब्रेल
प्रकाशनाचे सर्वेसर्वा ब्रेलमॅन श्री.स्वागत थोरात यांच्याकडे मी सुपूर्त केली.
तसेच सावी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी पांढारे यांनाही पुस्तक प्रत भेट
दिली. रश्मीताईंच्या “सावी फाउंडेशन” ने “मैत्री बँकिंगशी” पुस्तकाच्या १० व्या आवृत्तीच्या ब्रेल
रुपांतरीत तीन खंडांचे प्रकाशन आयोजित केले होते, तसेच अंधांसाठी काम करणाऱ्या एकूण
दहा संस्थांना ब्रेलच्या तीन खंडांच्या प्रती भेट दिल्या होत्या. नव्या आकराव्या
आवृत्तीमध्ये शुभेच्छा देताना रश्मीताईंनी हे सर्व नमूद केलेले आहेच.
‘यशोगाथा’ प्रकाशित ब्रेल पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ९
जानेवारी २०१६ रोजी आयोजित केला होता. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी आरबीआयचे
असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. राजेश आसुदानी खास नागपूरहून आले होते. जन्म:त
दृष्टिहीन असूनही बँकिंग क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोचलेल्या सरांना पाहून
अनेकांनी प्रेरणा घेतली आणि बँकिंग
क्षेत्र निवडले.
आत्ता, मैत्री बँकिंगशी आकराव्या आवृत्तीमध्ये
नव्याने झालेले बँकिंग व देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व बदलांचा समावेश केलेला
आहे. त्याबद्दलची माहिती दृष्टिहीन वर्गाकडे जाण्यासाठी लवकरच ब्रेल मधली दुसरी
आवृत्ती प्रकाशित करायचा मानस आहे. ब्रेलमॅन श्री.स्वागत थोरात यांनी ती जबाबदारी
स्वीकारली असल्याने लवकरच ब्रेल पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती यशोगाथा प्रकाशन
उपलब्ध करून देईल.
त्याचसाठी मी पुस्तकाच्या प्रती दिल्या आहेत. रविवार
दिनांक २५ नोव्हेंबर, २०१८ रोजी ब्रेल भाषेत रुपांतरीत केलेलं आपल्या देशाचे
‘भारतीय संविधान’ दृष्टिहीन लोकांसाठी प्रकाशित करण्यात आले. प्रकाशन सोहळा
बी.जे.मेडिकल कॉलेज, कॅम्प, पुणे येथील महात्मा गांधी सभागृहात साजरा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी.एल.थुल होते. अनेक मान्यवरांचे
उपस्थितीत पुस्तक लोकार्पण करण्यात आले.
समाजाच्या दृष्टिहीन लोकांपर्यंत मैत्री बँकिंगशी -
ब्रेल द्वितीय आवृत्तीद्वारे अद्ययावत बँकिंग माहिती त्यांच्या पर्यंत पोचणार आहे.
हीच अकरावी आवृत्ती ब्रेल रीडरवर उपलब्ध आहे, आणि अनेक संस्थांमध्ये ब्रेल रीडर
असल्याने अनेकांनी त्यावरून आपला अभ्यास केलेला आहे. यातचं मला समाधान आहे.
वंदना धर्माधिकारी
२५.११.२०१८
first casino no deposit bonus codes for 2021 - Kookoo.kr
ReplyDeletefirst casino no deposit 제왕카지노 bonus codes for 2021 10cric login 【 Slingo Online Casino Malaysia】 【 Casino South Africa】 【 퍼스트 카지노 Betway Online Casino】 【 Play Lucky 7】 【 Baccarat】 【 Baccarat】 【 Sports