नित्यपठणार्थ
सार्थ १८ श्लोकी गीता
माझी आई, श्रीमती शांताबाई बापूराव भोमे ४ सप्टेंबर,२००४
रोजी आम्हाला सोडून गेली. आईने “श्रीमद्भगवतगीता” आणि “श्री ज्ञानेश्वरी” या दोहोंचा अभ्यास वर्षानुवर्षे केला होता. तिने
त्यावर टिपण्णी काढून खूप लिहून ठेवले आहे. प्रत्येक अध्यायावर एक श्लोक एस अशी ही
१८ श्लोकी गीता आई रोज म्हणायची. आम्हालाही तिने ही गीता शिकवली. गीतेच्या
प्रत्येक अध्य्यात योगेश्वरने अर्जुनाला कथन केलेला योग व त्याचे वर्णन
सारांश्रुपणे एका एका श्लोकात मांडलेले या गीतेत दिसते. त्या संक्षिप्त स्वरूपातील
१८ श्लोकी गीतेवर आईने लिहिले निरुपण छोट्या पुस्तकरूपाने मी प्रकाशित केले आहे.
आई असताना जर हे काम माझ्या हातून झालं असतं तर तिला खूप आनंद झाला असता. पण
काळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत. हे पुस्तक हीच माझी आई व मामांना श्रद्धांजली.
सौ. वंदना धर्माधिकारी
४ सप्टेंबर, २००७
आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ लिहिलेली श्रद्धांजली भावली. नमन त्यांच्या स्मृतींना!
ReplyDeleteआईने खूप काय लिहून ठेवलेले आहे. त्यातले घेतले आणि छापले. हीच श्रद्धांजली.
ReplyDelete