87. के. के. कथ्थक नृत्य अकादमी,
धायरी, पुणे
प्रमुख पाहुणी ::
सौ.वंदना विजय धर्माधिकारी
कथ्थक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणी म्हणून मला बोलावणे आले होते. सौ. कविता
खोडके आणि सौ. कुलकर्णी यांची
के.के.कथ्थक नृत्य अकादमी पुण्यातल्या धायरी येथे आहे. कथ्थक नृत्यांगना कविताने
तिच्या क्लासमध्ये मागील १५ वर्षे आपल्या अनेक शिष्यांना अतिशय उत्तम तर्हेने
कथ्थक नृत्याचे धडे दिलेत.
कुठलाही कलाकार म्हंटल की मला जाणवते ते असे की कलाकार अतिशय आपला कलेशी जवळीक
बाळगून असतो. त्यांचे नाते दृढ खोलवर असते, ते एकजीव झालेले असल्याने नात्याची
निरगाठ असते दोघांच्यात. त्यामुळे, मी म्हणते ‘कलाकार हा कधीच मरत नाही.’ मरत नाही
याचा अर्थ काय? मरण तर सगळ्यांनाच येते, अगदी अटळ असते मरण तेही प्रत्येकाचे.
म्हणजे कलाकार जर आयुष्यात मेला, त्याने खच खाल्ली, डेसपरेट झाला तर त्यातून तो
नक्कीच उभारी घेऊन पुन्हा जिवंत राहू शकतो. आहे त्या परिस्थितीत तग धरून आनंदाने
आयुष्य जगायला कला शिकविते. तसेच या कलाकारांना कधी जरी कंटाळा आला, नैराश्याने
ग्रासले गेले तर तेंव्हा नक्कीच त्यांना आपल्या पायातली घुंगरू साद घालतील, साथ
देतील. अगदी एकांतात अलगद घुंगरू बांधले जातील, तोडे ओठावर नाचतील, आणि पाऊले
ठुमकतील. ताल, सूर आणि लय यांचा संगम होईल. नृत्याच्या तालावर पदन्यास होईल. एक
अदभूत उत्साह आनद एनर्जी घेऊन तो कलाकार परत आपल्या आयुष्यात भरारी घेतात. वेगवेगळ्या वयातील कलाकारांनी अतिशय सुंदर सादरीकरण केल. कविताने देखील आपले
कथ्थक नृत्य सादर केले.
वंदना धर्माधिकारी
No comments:
Post a Comment