साहित्य संमेलन अध्यक्षा आणि साहित्य जीवनगौरव पुरस्कार : ४,ऑगस्ट, २०१८
लेखणीने मला खूप माणसे दिली. त्यापैकी एक श्री.
मधुसूदन घाणेकर. त्यांच्याशी परिचय झाला, माझ्या लेखणीची कलाकुसर पाहून लगेचच ते
म्हणाले, की तुम्ही आमच्या संमेलनाच्या अध्यक्षा. खरं तर साहित्यात माझे योगदान
अध्यक्षा होण्याइतके नाही. तशी जाणीव मला आहे, तेच मी त्यांनाही सांगितले. मध्ये
बराच काळ गेला. वाटलं, लोकं म्हणतात हे करू ते करू, पण जोपर्यंत प्रत्यक्ष काही
केलं जात नाही तोपर्यंत काही खरं नसतं अशी माझी समजूत. काही दिवसांनी एकदिवस खरोखरीच मला अध्यक्षा
म्हणून पदभार स्वीकारण्याची विचारणा झाली. त्याचबरोबर “साहित्य जीवन गौरव
पुरस्कार” घोषित केला गेला.
साहित्य गौरव हा साहित्यिकांचा एक ग्रुप आहे. अनेक
दिग्गज साहित्यिक एकत्रित येतात आणि दरवर्षी वार्षिक संमेलन ऑगस्ट, महिन्यात
भरवतात. तेच यंदा ४ ऑगस्ट,२०१८ रोजी वेद शास्त्रोत्तेजक सभागृह, पुणे येथे भरविले
होते. त्या साहित्य संमेलनाची अध्यक्षा व्हायचा मान मला देण्यात आला. त्याने खरं
तर माझी जबाबदारी अधिक वाढली असेच मला वाटले. तेंव्हा अधिकाधिक लिखाण करायचेच असे
मी मनाशी ठरवले. छोट्याश्या का होईना संमेलनाची मी अध्यक्षा झाले, यात मला खूप
आनंद आहे. माझ्या लेखणीला मिळालेली ही अतिशय मोलाची दाद आहे, असे मला वाटते.
“साहित्य जीवन गौरव पुरस्कार” हे नावचं खूप काही
सांगून जाते. साहित्य प्रकारातील काही प्रकार मी हाताळते, सातत्याने लिखाण करते
त्याचेच हा गौरव हे फलित आहे. विशेषत्वाने माझे अधिकांश लिखाण बँकिंग विषयावर
असते. त्याच बरोबर माझा कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित वैचारिक लेखांचे संकलन
केलेले पुस्तक आणि साहित्य क्षेत्रात असलेला वावर याची दखल घेतली गेली याचा मला
आनंद आहे, समाधान आहे.
धन्यवाद!
वंदना धर्माधिकारी
४ ऑगस्ट,२०१८
पुणे
साहित्यिक वाटचालीस मिळालेली दाद.
ReplyDeleteधन्यवाद! हुरूप येतो आणि लेखणी जोरात धावायला लागते.
ReplyDeleteसाहित्य जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन !
ReplyDeleteधन्यवाद! अशीच कशाची तरी कुठेतरी कधीतरी कोणीतरी दखल घेते.
ReplyDelete