नऊवारीची व्यथा : लोकसत्ता – चतुरंग पुरवणी
– २५ मे २००५
व्हीआरएस घेऊन
चार साडेचार वर्षे झाली. तशी घरी बसायला मीही रुळले. मला घरात कंटाळा येत नाही.
काहीतरी असतेच की आपले असे. त्या त्या गोष्टींसाठी वेळ द्यायला मिळतो, यातचं मी
खूष.
पण नेमके द्या
दिवशी मला दिवसभर कुठे तरी जायाचे होते,
आणि वल्लरीला तिच्या मैत्रिणींना नऊवारी साड्या नेसून कॉलेजमध्ये जायचे होते.
कुठली तरी डान्स कॉम्पिटीशन होती. मला जाणे भागच होते. जवळच राहणाऱ्या माझ्या
मैत्रिणीला विचारलं, तीही म्हणाली,
“ पाठव मुलींना. देते नेसवून. तीन मुली आहेत ना. येऊ देत गं.”
मी हुश्श केलं
आणि गेले बाहेर. घरी काय झालं. मुलगी आणि तिच्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणीच्या घरी
गेल्या. तर घराला कुलूप. आता आली का पंचाईत. घर बरोबर होते, जरा घुटमळल्या.
शेजारणीने दार उघडून चौकशी केली. तर या नटलेल्या मुली. मुलींचा एकुणातला अवतार
पाहून तिने त्यांना आत बोलावले, चौकशी केली.
म्हणाली, “ इतकेच ना. या आत.मी
नेसवते नऊवारी साडी. ”
मुली देखील मस्त
तयार झाल्या, ताईला नमस्कार करून गेल्या नाचायला.
मी उशिरा घरी
आले. आल्यावर सगळं समजलं.... आणि आता वाचाल तेंव्हा समजेल काय काय झालं ते.....
छान लेख..👍👌
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteछोट्या प्रसंगातून लेख सुचला. कसं जमतं कोण जाणे.
ReplyDeleteमाझ्या पहिल्या काही लेखातला अनेकांना आवडलेला हा लेख. लोकसत्तेकडे बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. पुढच्या चतुरंग मध्ये सगळ्या छापल्या होत्या, नंतरही काही आल्या, त्याही टाकल्या होत्या... मज्जा आली...
ReplyDeleteआपणास धन्यवाद!