Sunday, November 20, 2005

5. Shreemati Pune 2005

श्रीमती पुणे – २००५ : प्रथम क्रमांक : वंदना धर्माधिकारी

दैनिक लोकमत मधेही माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले होते. ‘मधुरा’ मधील लेखमाला गाजली होती. त्यानंतर  ‘बँकिंग जिज्ञासा’ पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले. लोकमतने त्याचे परीक्षण छापले होते, आणि सखीची मी सभासदही होते. सगळं मजेत चालले होते. एक दिवस असाच लोकमत ऑफिस मधून फोन आला. “वंदनाताई आजउद्या लोकमत ऑफिसमध्ये भेटायला या.”

आणि गेले तर...गंमतचं झाली. तेथील सखी प्रमुखांनी माझ्यापुढे एक अर्ज धरला आणि ‘वंदनाताई हे भरून द्यायचं. लगेच द्या, घरी नेलात, तर उद्या आणून द्या.”

“ आहो, पण, मी कधी अशा स्पर्धेत भाग घेतला नाही. बघितल्या देखील नाही कधीकाळी..... ते ते कॅट वॉक वगैरे कधीच केलेलं नाही. नको. मी नाही घेत भाग.”

“ नाही....नाही. तुम्ही आम्हाला पाहिजेत. इतक्या छान छान कविता करता. मस्त कवितेतून करून द्या तुमचा परीचय. तुम्ही येणार आहात. आम्ही सोडणार नाही तुम्हाला.”

“बरं.. मी उद्या आणून देते.”

“नक्की, मस्त एन्जॉय कराल तुम्ही. मी सांगते ते ऐकायचं हं. उद्या आणून द्या, आणि हो फोटो पाहिजे हं!”

दोनतीन पानांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती मी भरली. फोटो घेऊन ऑफिसला गेले. “श्रीमती स्पर्धेत सहभाग घेतला”.  बघू या तरी.

मध्ये काही दिवस गेले आणि स्पर्धेची वेळ जवळ आली. भाग घेतला कि झोकून द्यायचं असतं इतकेच मला माहित होते. प्रथम लेखी, मग संस्कृत पाठांतर, प्रश्नोत्तरे, असे करतानाच साधारण तीनशे साडेतीनशे पैकी अनेकजणी गेल्या घरी. मी चालले हळूहळू पुढे. ऐन स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होती. तिथे आपला महाराष्ट्रीय पोशाख सोडून दुसरा कुठल्याही प्रांताचा, अथवा महाराष्ट्रीय विशेष पोशाख परिधान करून त्या प्रांताच्या भाषेत आपण काय केले ते सांगायचे होते. मी बंगाली स्त्री झाले, आणि घोटून पाठ केलेले माझ्या पेहरावाचे वर्णन बंगालीत बोलून टाकले. मस्त कविता केली माझ्यावरचं आणि झाली ओळख वंदनाची. ...आणखीन बरेच काही होते. अभिनय होता, गद्य पद्य लिखाण तेही मी माझेचं सगळं निवडून सादर केले. माझीच कविता चाल लावून गायले मी. अशाप्रकारे आणखीन काही विविध कसोट्या पार करीत शेवटच्या कसोटीपर्यंत तीन जणींची निवड केली. मग होती फायर राउंड. तीन परीक्षक प्रेक्षकांच्यात बसलेले. आणि एकामागून एकेक प्रश्नांची सरबत्ती. मीही भराभर मान  वळवीत उत्तरे दिली. आणि....तो निकालाचा क्षण आला–

“वरिष्ठ गट, प्रथम क्रमांक वंदना धर्माधिकारी”

टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या, आणि...... मला स्टेजवर घेऊन गेले.
तुतारीच्या लहरींनी भरतनाट्य भारावले. तेव्हढ्यात “भारतमाता” आली, तिने माझ्या हातात तलवार दिली. पुन्हा प्रचंड टाळ्या वाजत होत्या. बक्षीस देण्यात आलं. खूप काही भेटवस्तू मिळाल्या. अगदी थाटामाटात समारंभ संपला तसा  माझ्याभोवती आणखीन घोळका झाला. खूप खूप छान वाटलं! आणि श्रीमती पुणे घरी आली. ही देखील माझी वेगळी ओळख झाली. मस्त वाटतं मला ते आठवले तरी. मी हेही करू शकते जाणवलं. खरं तर आपल्या आत खोलवर कुठेतरी बरेच काही दडलेले, लपलेले सुप्तावस्थेत पडलेले असते. माझे तसेच होतं होते, ते असेच एकेक करीत मी बाहेर काढत होते, नाहीतर आतले उफाळून वर येई आणि मला दखल घ्यावीच लागे. सुंदर सेकंड इनिंग आहे माझी.
तो दिवस माझ्या आयुष्यात खूप वेगळा आनंदाचा झाला, कारण मी झाले होते..... “श्रीमती पुणे २००५ – वंदना धर्माधिकारी’

---------------------------------------------------------------------------------------------- 
अलका बापूराव भोमे मी १९७६ साली आले सासरी
विजयची मी वंदना आडनाव धर्माधिकारी .
आहो, सगळंच माझं पुण्यात, आहे मी पक्की पुणेरी 
आपला देश, भाषा, संस्कृती याप्रती स्वाभिमान माझ्या उरी 

२८ वर्षे केली मी बँक ऑफ इंडियात नोकरी 
२००० साली घेतली VRS , आणि निवांत बसले घरी 
घरीच असते, काहीच काम नाही, अधुरी मी स्वप्नपरी.
काय सांगू? माझ्याभोवती गोळा झाला पसाराच भारी

एकेक करता करता माझ्या उर्मिला आली उभारी
“...आणि म्हणूनचं गं!” म्हणतं कवितांचा कार्यक्रम करी
समाजाचे आपण देणं लागतो ही बोचणी सदैव अंतरी
लेखणीतून मांडू लागले माझ्या अनुभवांची शिदोरी 

‘बँकिंग जिज्ञासा’ सहा आवृत्त्या लगोलग गेल्या बाजरी
Banking Horizon  तेही त्याचे बरोबरी
‘ऐश्वर्यवती’ लेखमाला, कार्यक्रम आणि श्रीमंतीची तयारी
आईवडिलांना श्रद्धांजली वंदूनी ‘निरुपण गीते’चे करी

हिरवीगार नाजूक ‘पालवी’ संस्कार शिंपण भरजरी
‘घायाळांची मोट’ एकेक कथा मनाला अस्वस्थ करी
असे घायाळपण अनुभवले अन कधी दिले कोणालातरी
किती वास्तव, अगदी हळवे, लेखणी हेलावून सोडणारी

‘मैत्री बँकिंगशी’  फारच आवडले घरीदारी
संगे त्याच्या ‘हिंदी, गुजराथी आणि ब्रेल’ रुपांतरी
‘मित्रता बँकिंग से’  पुरस्कार मोठे त्याचे पदरी
दृष्टीहींनांना ब्रेल पुस्तक असून तेही भेटे ब्रेल रिडरवरी

कधी कविता, कधी ललित लेख झळकतो कोठेतरी
एका मागून एक लेखमाला असतात पेपरमध्ये कुठल्यातरी
‘श्रीमती पुणे २००५’ मोरपीस मागेच खोवलं आहे शिरावरी
आज मैत्री बँकिंगशी ची अकरावी आवृत्ती ठेवते तुमच्या सामोरी

अशी ही मी विजयची वंदना आडनाव धर्माधिकारी 






10 comments:

  1. इंटरेस्टिंग 👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना. मस्त वाटलं होतं स्वत:ला सिद्ध करायला. अशा स्पर्धेत प्रथमच उतरले, तेही लोकमत मधील काहींनी खूप आग्रह केला. बरं झालं मला माझ्या आत काय काय लपलं आहे ते तरी उमजलं. आपण आपल्याला ओळखत नाही, आत किती प्रचंड उर्जा आहे, गुण आहेत ह्याची जाणीव नसते. Hidden Talent Required Strokes And They Flourish Like Anything. It happened about me. खरंच, व्हीआरएस घेताना हे असे काही होईल, मी करेल, आणि अशी ब्लॉग वर उमेशशी गप्पा मारेल असे वाटले नव्हते. सुंदर कलाटणी घेतली माझ्या आयुष्याने आणि लेखणी तिला गरागरा फिरवते तिच्या हातातल्या लाटण्याने. तिच्या तालावर मीही नाचते. अशी गंमत आहे रे बाबा. फार छान झालं मला लेखणी भेटली. लेखणीने मला खूप माणसे दिली. परीघ विस्तारला. इथेही बोलायला मस्त वाटते. चलो. बाय. .... वंदना

      Delete
  2. खरंच मस्त! फॉर्म भरताना नको नको केलं. आणि नंतर भाग घेतल्यावर सुसाट धावले. टफ असतात अशा स्पर्धा. भाग घेतल्याने बरेच काही समजले मलाही. नाहीतर फक्त नोकरी अन संसार यातच घुटमळले होते. घरी बसले नोकरी सोडून ते सुंदर झाले. आता मस्त एन्जॉय करीत असते, वेगळ्या प्रकारे खूप बिझी असते. काहीतरी, देत असते लेखणीतून. असो. धन्यवाद!

    ReplyDelete
  3. Proud of you Vandana.wish that you achieve more prizes in the years to come.

    ReplyDelete
  4. Thanks! just remember journey from 2005 till date.

    ReplyDelete
  5. हो ना. मिळाल्यावर मलाही मस्तचं वाटलं होतं. अजूनही मस्तं आहेच.

    ReplyDelete
  6. Wa, Aprateem shabdapratibha.Kharach Superb

    ReplyDelete
  7. धन्यवाद! आपली प्रतिक्रिया आवडली मला. एक भाषा म्हणून मराठीचा अभ्यास मॅट्रिक-१९६९ पर्यंत केला. त्यानंतर गणित विषय घेऊन बी ए. केलं.ते सगळं इंग्रजीतून. डिग्री घ्यायच्या आधीचं बँकेत लागले, अभ्यास नोकरी बरोबर केली. नंतर बँकेच्या परीक्षा इंग्रजीत दिल्या. घर, संसार, परीक्षा करता करता वाचनही खुंटले नव्हे बंद झाले. मराठीत १/२ पत्र लिहिली असतील. इतकेच माझे ४० वर्षातले मराठी लिखाण. नंतर मात्र सगळा वचपा आता काढला जातोय. कुठून आली ही शब्दप्रतिभा देव जाणे. आता लेखणी शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहिली पाहिजे. राहणार आहे. मी बरी जाऊन देईल तिला, जी पन्नाशीत मला भेटली, आणि संपूर्णत: मला घडवत चालली आहे... खूप खूप धन्यवाद आपणास.

    ReplyDelete

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com