कविता : चिमणी
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ....कळली ना
चिमणीनं केलं काम
चिमणीनं आणला
दाणा
चिमणीनं गायलं
गाणं
गाण्यावर ताल तू
धरला ना .... धरला ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........१.
चिमणीच्या
हातामंधी
प्रेम माया तेथं
नांदी
हाती भाजी
चिरताना
वरणाला फोडणी तू
घातली ना ..... घातली ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........२.
ऑफिसातून घरी आली
चिमणी पावसात भिजलेली
ओली साडी सो
गॅसवर आधण तू ठेवले ना ..... ठेवले ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........३.
चिमणीला माहेराला
मधून मधून
डोकायला
पिल्लांसंगे
निघताना
तुझं तिकीट
तिच्या संगे काढलं ना ..... काढलं ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........४.
चिमणी आली तुझ्या दारी
लागलं तसं पाणी
भारी
माझं माझं
म्हणताना ना
पुरुषी अहं तुझा
सरला ना .... सरला ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........५.
वंदना धर्माधिकारी
१० एप्रिल, २००५.
चिमणीची उडी.. छानच !
ReplyDeleteअगदी मनापासून पटली ना. बरं झालं. धन्यवाद!
DeleteNice poem!
ReplyDeleteअसंच असतं घरात. धन्यवाद!
ReplyDeleteNice poem
ReplyDeleteIt is daily routine. Thanks.
ReplyDeleteछान कविता...👍
ReplyDeleteआवडली? धन्यवाद!
ReplyDeleteम्हणून घरात चिवचिवाट असतो. लयबद्ध रचना छान आहे.
ReplyDeleteएकदा whatsapp वर मेसेज आला इथेच रेकॉर्ड करून कविता सादरीकरण पाठवायचे. चिमणी उडाली भुर्र... आणि बक्षीस जाहीर केलं गेलं. अशी ही चिमणी आणि चिवचिवाट.
Deleteधन्यवाद!