Friday, June 20, 2008

9. Mahilashram Highschool - Annual Gathering - Chief Guest

महिलाश्रम हायस्कूल, कनिष्ठ विद्यालय, वार्षिक स्नेहसंमेलन २००७-२००८

कर्वेनगरची कर्वे संस्था, खास महिलांसाठीची म्हणून कायम मनात घर करणारी संस्था आहे. एक लेखिका म्हणून त्या संस्थेशी माझा मधून मधून संबंध येतो. त्यांच्या काही स्पर्धांना मी
परिक्षक म्हणून गेलेली आहे. २००७-२००८ महिलाश्रम हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाची प्रमुख पाहुणी म्हणून मला निमंत्रण आले होते. मी ते आनंदाने स्वीकारले.
सकाळी संस्थेत गेल्यावर अण्णांच्या राहत्या घरात आम्ही नाश्ता घेतला. ती वस्तू होती तशीच ठेवलेली आहे. नंतर सगळे बाहेर येऊन उभे राहिलो. मुलींनी मार्चिंग करीत  सर्वांना सलामी दिली. मस्त वाटले सलामी घेताना.
नंतर मुलीनी भरवलेल्या सायन्स प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आहे. त्यांच्या प्रयोगांची मांडणी, रचना, साहित्य आणि खुद्द भावी शास्त्रज्ञ होऊ इच्छिणाऱ्या मुली. आपला प्रयोग समजावून देत होत्या.
वार्षिक स्नेहसंमेलनातला महत्वाचा भाग असतो “बक्षीस समारंभ”. शाळेतल्या लहान लहान मुलींना समोर बघितल्यावर आपण त्या वयात असताना आपल्या शाळेतले दिवस आठवतात. गंमत वाटते, खूप गप्पा झाल्या त्या दिवशी. मी जे बोलले ते मुलींना आवडले होते. ऐकत होत्या सगळ्या, आणि नंतर दादही चांगली दिली. मलाही समाधान वाटले.

वंदना धर्माधिकारी





Sunday, May 18, 2008

8. 'Aani Mhanunch G' Lokmt Sakhi Manch - Poerty Program

“… आणि म्हणूनचं गं!” : लोकमत सखी मंच कार्यक्रम : १८ मे, २००८

कविता केल्यावर दुसऱ्याला वाचून दाखवायची घाई प्रत्येक कवीला असतेच. तशीच मलाही आहेच. असे आहेत काही प्रथम श्रोता होणारे, ऐकवीत असते त्यांना. खूष व्हायला होतं आपल्या कवितेला दाद मिळाली की!
अशीच एक संधी मला चालून आली. लोकमत सखीतर्फे चिंचवड, मोरे सभागृहात माझ्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम ठरविला गेला. प्रायोजक होते, ‘चंदुकाका सराफ,पुणे’. त्यांनी चिंचवडला शाखा काढली, तेंव्हा त्यांनी प्रायोजकत्व दिले, आणि मी कविता सादर केल्या. नुसत्याच माझ्या मी नाही सादर केल्या, तर तबला पेटी, सिंथ सायझर, गायिका असा सगळा गोतावळा घेऊन मस्त तयारीनिशी दोन तासांचा कार्यक्रम केला. संगीतकाराने नव्याने काहींना चाली लावल्या होत्या, आधी बरीच प्रक्टिस केली होती. त्याने उठावदार कार्यक्रम झाला. सगळ्यांना आवडला होता.
“... आणि म्हणूनचं गं!” माझी बँकेला उद्देशून केलेली कविता. प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असतेच. हे हे असं आहे म्हणून मी तसं करते. तेच या कवितेत मी व्हीआरएस घेताना बँकेला सांगितले होते. माझं असे असे आहे म्हणून मी घरी राहते. त्याच नावाने माझा कविता संग्रह आहे. “… आणि म्हणूनचं गं!”  पुस्तक आलेल्या सर्व महिलांना भेट देण्यात  आले.
मधून मधून अगदी एकटी देखील माझ्या कवितांचा कार्यक्रम मी करते. आवडते मला तेही  करायला.

वंदना धर्माधिकारी



Monday, January 14, 2008

7. Tilgul Gya Nidan Bola tari

तिळगुळ घ्या, निदान बोला तरी! सकाळ : मुक्तपीठ : १४ जानेवारी २००८.

संक्रांत, वर्षाचा पहिला सण! आपले सण, रीतीरिवाज, संस्कार  सारे काही माणसाला माणूस घडविणारे आहेत. म्हणजे इथे कसं. वर्ष सुरु झालं की आधीच्या वर्षातलं काही भांडण असेल तर संपले म्हणायचे आणि तिळगुळ देऊन घेऊन नाते घट्ट करायचे. बोलणं आटत चालले आहे, हे सगळ्यांना चांगलेच जाणवते. पण का म्हणून मी पहिल्यांदा बोलू त्याच्याशी? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. अगदी खरे, माघार कोण घेणार? पहिल्यांदा कोण हसणार, बोलणार. लहानपण मस्त असते, कट्टी नाहीतर लगेच बट्टी. ना आढेवेढे, ना रागरूसवा. मोठे होता होता काय होते समजत नाही. आणि नाती अलग अलग व्हायला लागतात. अगदी तेव्हढ्या पुरते कसेबसे साडे चार शब्दात संवाद संपतो. काय म्हणावे याला?? म्हणून आपले सण साजरे करावेत. निदान वर्षाचा पहिला संक्रांतीचा सण करायचाच करायचा.
“ तिळगुळ घ्या, गोड बोला! “असे म्हणून जर सगळेजण गुण्यागोविंदाने राहू लागले असते, तर हा असा लेख मी लिहिला नसता, आणि सकाळने छापला नसता. बघा, विचार करा... निदान बोला तरी!

वंदना धर्माधिकारी




Tuesday, September 4, 2007

74. 5 at a time - एकाच वेळी ५ पुस्तकांचे प्रकाशन



04-09-2007

बँकिंग जिज्ञासा आणि Banking Horizon
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी

बँकिंग लिखाणाला सुरवात झाली ती सकाळ मधुरा पुरवणीतून. २००४ साली ‘ओळख बँकिंगशी’  लेखमाला खास महिलासाठी असलेल्या मधुरा मध्ये प्रसिद्ध झाली. अनेक घराघरात मी पोचले. वाचकांचे फोन यायला लागले. त्यांच्याशी बोलताना मला काहीतरी वेगळं केल्याचा आनंद वाटू लागला.समाजाला जे काही हवे आहे ते कदाचित मी देऊ शकेल असाही विचार डोकावू लाग बँकिंग जिज्ञासा’ ला. आज तेच होत आहे, मी सातत्याने करीत आहे.  त्यानंतर त्याचे पुस्तक काढायचा विचार केला आणि बँकिंग जिज्ञासा’ पुस्तक ३१ जुलै,२००५ रोजी प्रकाशित केले. तेंव्हा वाटलं नव्हतं मला की मी बरेच वर्षे बँकिंग विषयावर लिखाण करेन. एकामागोमाग मागणी तसा पुरवठा करीत करीत बरीच मजल मारली म्हणते. पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. लगेच दुसरी काढली. माझी लेखणी महाराष्ट्रातील विविध भागात याच पुस्तकाने गेली.


साधी सरळ सोपी भाषा, ओघवती भाषाशैली, समजेल उमजेल अशी लेखणी त्यामुळे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवू लागले. इतक्या सोप्या भाषेत लिहिणे मी लिहिले की ज्याला लिहिता वाचता येते त्याला
नक्कीच बँकिंग समजणार. जवळ जवळ २५ ठिकाणी म्हणजे वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके यामध्ये पुस्तकाचे परीक्षण छापून आलेले होते. आवृत्यावर आवरत्या काढल्या. शेवटची सहावी आवृत्ती ४ सप्टेंबर, २००७ रोजी सकाळ मधुरांगण ऐश्वर्यवती कार्यक्रमात प्रकाशित केली गेली. एकुणात माझ्या चार पुस्तकांचे प्रकाशन एकत्रित केले गेले.

त्याचे इंग्रजी रुपांतर ‘Banking Horizon’श्रीमती पुष्पा पंडित यांनी केले. तेही लोकांना खूप आवडले. त्याहीची पहिली आवृत्ती लवकर संपली. रोहन ग्राफिक्स यांनी ही दोन्ही पुस्तके अतिशय छान काढली. एकाच वेळी माझी चार पुस्तके ‘ऐश्वर्यवती’ मधुरांगण कार्यक्रमात प्रकाशित केली गेली.

बँकिंग जिज्ञासा – ६ वी आवृत्ती
Banking Horizon – २ री आवृत्ती
ऐश्वर्यवती
सार्थ १८ श्लोकी गीता

त्यानंतर मात्र या पुस्तकांच्या आवृत्त्या काढल्या नाहीत. बँकिंग बदलत गेले. मी वेगळे लिहायला लागले. त्याचीही पुस्तके झाली.

वंदना धर्माधिकारी









Wednesday, July 4, 2007

6. Aaishwaryawati -Sakal Madhurangan

ऐश्वर्यवती” :  सकाळ – मधुरांगण कार्यक्रम – ४ जुलै, २००७
ऐश्वर्यवती” सकाळ मैत्रीण मधील आठवडाभर दररोज एक अशी वर्षभर चाललेली एक लेखमाला, त्यानंतर त्याचे ललित वैचारिक लेखांचे संकलन केलेले ऐश्वर्यवती” पुस्तक.  त्याच पुस्तकाचे प्रकाशन करताना सकाळ-मधुरांगण तर्फे घेतला ऐश्वर्यवती” इव्हेंट. ४ जुलै,२००७  रोजी गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे येथे एकाचवेळी माझ्या ५ पुस्तकांचे प्रकाशन सकाळचे संपादक श्री.यमाजी मालकर यांचे हस्ते करण्यात आले.
प्रकाशित पुस्तके  :
१.    ऐश्वर्यवती : ब्रीदवाक्य : नुसत्या मनाच्या श्रीमंतीने भागत नाही आणि नुसत्या पैशाच्या श्रीमंतीने माणूसपण गावत नाही, आणि आपण तर सारी माणसं! हाडामासाची भावभावनांची !
२.    बँकिंग जिज्ञासा : ६ वी आवृत्ती
३.    Banking Horizon : 2nd  Edition
४.    ... आणि म्हणूनचं गं! : कविता संग्रह
५.    नित्यपठनार्थ सार्थ १८ श्लोकी गीता : माझी आई – सौ. शांताबाई
बापुराव भोमे. आईचा गीता ज्ञानेश्वरी यांचा व्यासंग दांडगा होता. माझ्या इतर पुस्तकांबरोबर आईच्या वह्यांमधून शोधून  १८ श्लोकी गीतेचे निरुपण एकत्रित केले, आणि हे छोटेखानी पुस्तक इतर पुस्तकांबरोबर प्रकाशित केले. माझा सहभाग या पुस्तकात फक्त इतकाच आहे.  आईचे देहावसान ४ सप्टेंबर,२००४ रोजी झाले, आणि मधुरांगणच्या मोठ्या व्यासपीठावर मला ही संधी मिळाली तीही ४ सप्टेंबर,२००७ रोजी. तीच तारीख. सकाळ संध्याकाळ दोन इव्हेंट्स ‘ऐश्वर्यवती’ चे घेतले गेले, आलेल्या प्रत्येकीला हेच पुस्तक भेट म्हणून दिले. हीच माझी माझ्या आईवडिलांना श्रद्धांजली!

‘ ऐश्वर्यवती ’ कार्यक्रमाचे पुण्यात ३, पिंपरी चिंचवड मध्ये २, नाशिकला २, औरंगाबादला २, असे एकूण ९ इव्हेंट्स घेतले गेले. माझी श्रीमंत ऐश्वर्यवती अनेकघरी गेली, कधीतरी तिचेही कोडकौतुक येते माझ्या कानी.

आता मात्र माझ्याकडे अगदी मोजक्या प्रती शिल्लक आहेत. तेव्हढ्या असू देत माझ्या घरी.


वंदना धर्माधिकारी






Sunday, November 20, 2005

5. Shreemati Pune 2005

श्रीमती पुणे – २००५ : प्रथम क्रमांक : वंदना धर्माधिकारी

दैनिक लोकमत मधेही माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले होते. ‘मधुरा’ मधील लेखमाला गाजली होती. त्यानंतर  ‘बँकिंग जिज्ञासा’ पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले. लोकमतने त्याचे परीक्षण छापले होते, आणि सखीची मी सभासदही होते. सगळं मजेत चालले होते. एक दिवस असाच लोकमत ऑफिस मधून फोन आला. “वंदनाताई आजउद्या लोकमत ऑफिसमध्ये भेटायला या.”

आणि गेले तर...गंमतचं झाली. तेथील सखी प्रमुखांनी माझ्यापुढे एक अर्ज धरला आणि ‘वंदनाताई हे भरून द्यायचं. लगेच द्या, घरी नेलात, तर उद्या आणून द्या.”

“ आहो, पण, मी कधी अशा स्पर्धेत भाग घेतला नाही. बघितल्या देखील नाही कधीकाळी..... ते ते कॅट वॉक वगैरे कधीच केलेलं नाही. नको. मी नाही घेत भाग.”

“ नाही....नाही. तुम्ही आम्हाला पाहिजेत. इतक्या छान छान कविता करता. मस्त कवितेतून करून द्या तुमचा परीचय. तुम्ही येणार आहात. आम्ही सोडणार नाही तुम्हाला.”

“बरं.. मी उद्या आणून देते.”

“नक्की, मस्त एन्जॉय कराल तुम्ही. मी सांगते ते ऐकायचं हं. उद्या आणून द्या, आणि हो फोटो पाहिजे हं!”

दोनतीन पानांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती मी भरली. फोटो घेऊन ऑफिसला गेले. “श्रीमती स्पर्धेत सहभाग घेतला”.  बघू या तरी.

मध्ये काही दिवस गेले आणि स्पर्धेची वेळ जवळ आली. भाग घेतला कि झोकून द्यायचं असतं इतकेच मला माहित होते. प्रथम लेखी, मग संस्कृत पाठांतर, प्रश्नोत्तरे, असे करतानाच साधारण तीनशे साडेतीनशे पैकी अनेकजणी गेल्या घरी. मी चालले हळूहळू पुढे. ऐन स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होती. तिथे आपला महाराष्ट्रीय पोशाख सोडून दुसरा कुठल्याही प्रांताचा, अथवा महाराष्ट्रीय विशेष पोशाख परिधान करून त्या प्रांताच्या भाषेत आपण काय केले ते सांगायचे होते. मी बंगाली स्त्री झाले, आणि घोटून पाठ केलेले माझ्या पेहरावाचे वर्णन बंगालीत बोलून टाकले. मस्त कविता केली माझ्यावरचं आणि झाली ओळख वंदनाची. ...आणखीन बरेच काही होते. अभिनय होता, गद्य पद्य लिखाण तेही मी माझेचं सगळं निवडून सादर केले. माझीच कविता चाल लावून गायले मी. अशाप्रकारे आणखीन काही विविध कसोट्या पार करीत शेवटच्या कसोटीपर्यंत तीन जणींची निवड केली. मग होती फायर राउंड. तीन परीक्षक प्रेक्षकांच्यात बसलेले. आणि एकामागून एकेक प्रश्नांची सरबत्ती. मीही भराभर मान  वळवीत उत्तरे दिली. आणि....तो निकालाचा क्षण आला–

“वरिष्ठ गट, प्रथम क्रमांक वंदना धर्माधिकारी”

टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या, आणि...... मला स्टेजवर घेऊन गेले.
तुतारीच्या लहरींनी भरतनाट्य भारावले. तेव्हढ्यात “भारतमाता” आली, तिने माझ्या हातात तलवार दिली. पुन्हा प्रचंड टाळ्या वाजत होत्या. बक्षीस देण्यात आलं. खूप काही भेटवस्तू मिळाल्या. अगदी थाटामाटात समारंभ संपला तसा  माझ्याभोवती आणखीन घोळका झाला. खूप खूप छान वाटलं! आणि श्रीमती पुणे घरी आली. ही देखील माझी वेगळी ओळख झाली. मस्त वाटतं मला ते आठवले तरी. मी हेही करू शकते जाणवलं. खरं तर आपल्या आत खोलवर कुठेतरी बरेच काही दडलेले, लपलेले सुप्तावस्थेत पडलेले असते. माझे तसेच होतं होते, ते असेच एकेक करीत मी बाहेर काढत होते, नाहीतर आतले उफाळून वर येई आणि मला दखल घ्यावीच लागे. सुंदर सेकंड इनिंग आहे माझी.
तो दिवस माझ्या आयुष्यात खूप वेगळा आनंदाचा झाला, कारण मी झाले होते..... “श्रीमती पुणे २००५ – वंदना धर्माधिकारी’

---------------------------------------------------------------------------------------------- 
अलका बापूराव भोमे मी १९७६ साली आले सासरी
विजयची मी वंदना आडनाव धर्माधिकारी .
आहो, सगळंच माझं पुण्यात, आहे मी पक्की पुणेरी 
आपला देश, भाषा, संस्कृती याप्रती स्वाभिमान माझ्या उरी 

२८ वर्षे केली मी बँक ऑफ इंडियात नोकरी 
२००० साली घेतली VRS , आणि निवांत बसले घरी 
घरीच असते, काहीच काम नाही, अधुरी मी स्वप्नपरी.
काय सांगू? माझ्याभोवती गोळा झाला पसाराच भारी

एकेक करता करता माझ्या उर्मिला आली उभारी
“...आणि म्हणूनचं गं!” म्हणतं कवितांचा कार्यक्रम करी
समाजाचे आपण देणं लागतो ही बोचणी सदैव अंतरी
लेखणीतून मांडू लागले माझ्या अनुभवांची शिदोरी 

‘बँकिंग जिज्ञासा’ सहा आवृत्त्या लगोलग गेल्या बाजरी
Banking Horizon  तेही त्याचे बरोबरी
‘ऐश्वर्यवती’ लेखमाला, कार्यक्रम आणि श्रीमंतीची तयारी
आईवडिलांना श्रद्धांजली वंदूनी ‘निरुपण गीते’चे करी

हिरवीगार नाजूक ‘पालवी’ संस्कार शिंपण भरजरी
‘घायाळांची मोट’ एकेक कथा मनाला अस्वस्थ करी
असे घायाळपण अनुभवले अन कधी दिले कोणालातरी
किती वास्तव, अगदी हळवे, लेखणी हेलावून सोडणारी

‘मैत्री बँकिंगशी’  फारच आवडले घरीदारी
संगे त्याच्या ‘हिंदी, गुजराथी आणि ब्रेल’ रुपांतरी
‘मित्रता बँकिंग से’  पुरस्कार मोठे त्याचे पदरी
दृष्टीहींनांना ब्रेल पुस्तक असून तेही भेटे ब्रेल रिडरवरी

कधी कविता, कधी ललित लेख झळकतो कोठेतरी
एका मागून एक लेखमाला असतात पेपरमध्ये कुठल्यातरी
‘श्रीमती पुणे २००५’ मोरपीस मागेच खोवलं आहे शिरावरी
आज मैत्री बँकिंगशी ची अकरावी आवृत्ती ठेवते तुमच्या सामोरी

अशी ही मी विजयची वंदना आडनाव धर्माधिकारी 






Wednesday, May 25, 2005

4. Nauwaree Saree

नऊवारीची व्यथा : लोकसत्ता – चतुरंग पुरवणी – २५ मे २००५

व्हीआरएस घेऊन चार साडेचार वर्षे झाली. तशी घरी बसायला मीही रुळले. मला घरात कंटाळा येत नाही. काहीतरी असतेच की आपले असे. त्या त्या गोष्टींसाठी वेळ द्यायला मिळतो, यातचं मी खूष.

पण नेमके द्या दिवशी मला दिवसभर कुठे तरी जायाचे  होते, आणि वल्लरीला तिच्या मैत्रिणींना नऊवारी साड्या नेसून कॉलेजमध्ये जायचे होते. कुठली तरी डान्स कॉम्पिटीशन होती. मला जाणे भागच होते. जवळच राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला विचारलं, तीही म्हणाली,
पाठव मुलींना. देते नेसवून. तीन मुली आहेत ना. येऊ देत गं.”

मी हुश्श केलं आणि गेले बाहेर. घरी काय झालं. मुलगी आणि तिच्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेल्या. तर घराला कुलूप. आता आली का पंचाईत. घर बरोबर होते, जरा घुटमळल्या. शेजारणीने दार उघडून चौकशी केली. तर या नटलेल्या मुली. मुलींचा एकुणातला अवतार पाहून तिने त्यांना आत बोलावले, चौकशी केली.

म्हणाली, “ इतकेच ना. या आत.मी नेसवते नऊवारी साडी. ”

मुली देखील मस्त तयार झाल्या, ताईला नमस्कार करून गेल्या नाचायला.


मी उशिरा घरी आले. आल्यावर सगळं समजलं.... आणि आता वाचाल तेंव्हा समजेल काय काय झालं ते.....



Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com