महिलाश्रम हायस्कूल, कनिष्ठ
विद्यालय, वार्षिक स्नेहसंमेलन २००७-२००८
कर्वेनगरची कर्वे संस्था, खास महिलांसाठीची म्हणून कायम मनात घर करणारी संस्था
आहे. एक लेखिका म्हणून त्या संस्थेशी माझा मधून मधून संबंध येतो. त्यांच्या काही
स्पर्धांना मी
परिक्षक म्हणून गेलेली आहे. २००७-२००८ महिलाश्रम हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाची
प्रमुख पाहुणी म्हणून मला निमंत्रण आले होते. मी ते आनंदाने स्वीकारले.
सकाळी संस्थेत गेल्यावर अण्णांच्या राहत्या घरात आम्ही नाश्ता घेतला. ती वस्तू
होती तशीच ठेवलेली आहे. नंतर सगळे बाहेर येऊन उभे राहिलो. मुलींनी मार्चिंग
करीत सर्वांना सलामी दिली. मस्त वाटले
सलामी घेताना.
नंतर मुलीनी भरवलेल्या सायन्स प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आहे. त्यांच्या
प्रयोगांची मांडणी, रचना, साहित्य आणि खुद्द भावी शास्त्रज्ञ होऊ इच्छिणाऱ्या
मुली. आपला प्रयोग समजावून देत होत्या.
वार्षिक स्नेहसंमेलनातला महत्वाचा भाग असतो “बक्षीस समारंभ”. शाळेतल्या लहान
लहान मुलींना समोर बघितल्यावर आपण त्या वयात असताना आपल्या शाळेतले दिवस आठवतात.
गंमत वाटते, खूप गप्पा झाल्या त्या दिवशी. मी जे बोलले ते मुलींना आवडले होते. ऐकत
होत्या सगळ्या, आणि नंतर दादही चांगली दिली. मलाही समाधान वाटले.
अनेक शुभेच्छा !
ReplyDeleteवंदना तुझे माहेरी ( साहित्य कलाकाराचे घरी) तेथला थाट भरजरी ...
ReplyDeleteनटूनी थटुनी लेखणी
ReplyDeleteखेळते माझिया अंगणी
कधी हसू कधी डोळा पाणी
गोडधोड तिखट चटणी ......... धन्यवाद!
शाळेचं गॅदरींग, कार्यक्रम, नाटकं आणि बक्षीस वितरण...शाळेचे दिवस आठवले. बरं आहे तुमचं तुम्हांला हे अजूनही मिळतं. अभिनंदन!
ReplyDeleteहोय. छान वाटतं कुठल्यातरी शाळेत पाहुणी म्हणून जायला. कधीतरी परीक्षक म्हणूनही जाते. वातावरण वेगळंच असतो. आपण लहान होऊन जातो तिथे गेल्यावर..
Deleteधन्यवाद!