“ऐश्वर्यवती” : सकाळ – मधुरांगण
कार्यक्रम – ४ जुलै, २००७
“ऐश्वर्यवती” सकाळ मैत्रीण मधील आठवडाभर दररोज एक अशी वर्षभर चाललेली एक
लेखमाला, त्यानंतर त्याचे ललित वैचारिक लेखांचे संकलन केलेले “ऐश्वर्यवती” पुस्तक. त्याच पुस्तकाचे
प्रकाशन करताना सकाळ-मधुरांगण तर्फे घेतला “ऐश्वर्यवती” इव्हेंट. ४ जुलै,२००७
रोजी गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे येथे एकाचवेळी माझ्या ५ पुस्तकांचे
प्रकाशन सकाळचे संपादक श्री.यमाजी मालकर यांचे हस्ते करण्यात आले.
प्रकाशित पुस्तके :
१. ऐश्वर्यवती : ब्रीदवाक्य : नुसत्या मनाच्या श्रीमंतीने भागत नाही आणि नुसत्या
पैशाच्या श्रीमंतीने माणूसपण गावत नाही, आणि आपण तर सारी माणसं! हाडामासाची
भावभावनांची !
२. बँकिंग जिज्ञासा : ६ वी आवृत्ती
३. Banking Horizon : 2nd Edition
४. ... आणि म्हणूनचं गं! : कविता संग्रह
५. नित्यपठनार्थ सार्थ १८ श्लोकी गीता : माझी आई – सौ. शांताबाई
बापुराव भोमे. आईचा गीता ज्ञानेश्वरी यांचा व्यासंग दांडगा होता. माझ्या इतर पुस्तकांबरोबर आईच्या वह्यांमधून शोधून १८ श्लोकी गीतेचे निरुपण एकत्रित केले, आणि हे छोटेखानी पुस्तक इतर पुस्तकांबरोबर प्रकाशित केले. माझा
सहभाग या पुस्तकात फक्त इतकाच आहे. आईचे
देहावसान ४ सप्टेंबर,२००४ रोजी झाले, आणि मधुरांगणच्या मोठ्या व्यासपीठावर मला ही
संधी मिळाली तीही ४ सप्टेंबर,२००७ रोजी. तीच तारीख. सकाळ संध्याकाळ दोन इव्हेंट्स
‘ऐश्वर्यवती’ चे घेतले गेले, आलेल्या प्रत्येकीला हेच पुस्तक भेट म्हणून दिले. हीच
माझी माझ्या आईवडिलांना श्रद्धांजली!
‘ ऐश्वर्यवती ’ कार्यक्रमाचे पुण्यात ३, पिंपरी चिंचवड मध्ये २, नाशिकला २,
औरंगाबादला २, असे एकूण ९ इव्हेंट्स घेतले गेले. माझी श्रीमंत ऐश्वर्यवती अनेकघरी
गेली, कधीतरी तिचेही कोडकौतुक येते माझ्या कानी.
आता मात्र माझ्याकडे अगदी मोजक्या प्रती शिल्लक आहेत. तेव्हढ्या असू देत
माझ्या घरी.
श्रीमंत ऐश्वर्यवती 👌👌
ReplyDeleteमी ऐश्वर्यवती आहे... आणि तोच भाव घेऊन सार्वजणी घरी जात होत्या. हे विशेष झालं. कार्यक्रमाचे चीज झालं ते असं. धन्यवाद!
Deleteनाव अर्थपूर्ण। खरच प्रत्येक स्त्री असते ऐश्वर्यवती
ReplyDeleteअसतेच गं.एक सांगते, तिथे कार्यक्रमाचे शीर्षक गीत मधून मधून लावलं जायचं. मी ऐश्वर्यवती आहे - वर दिलेली कविता. चाल लावून, स्टुडीओत रेकोर्ड करून वाजवत होतो. तर जाताना तो ऐश्वर्याचा भाव मनात घेऊन सर्व स्त्रिया बाहेर पडत होत्या. हे अनेकींनी सांगितलं.
DeleteIt’s an amazing to be known as “Aishwaryawati”
ReplyDeleteIt’s not a name it’s a character
That 100 articles series (I had written 87-90)
Deletechanged my identity as Aishwaryawati. It's a super character. Enjoyed those days.
वंदनाताई, किती सुंदर अन वेगळे असते हे तुमचे भाव विश्व.....
ReplyDeleteझालंय खरं असं. सगळीकडे लुडबुड करते. सेकंड इनिंग मस्त चालली आहे. धन्यवाद!
Deleteपुस्तकाचे नाव अर्थपूर्ण आहे..💐
ReplyDeleteहोय... लेखमालेत आठवड्यात तीन दिवस लिहित होते मनाची श्रीमंती आणि तीन दिवस पैशाची श्रीमंती. ऐश्वर्यवती व्हायला याशिवाय काय हवे...नाही का? आत जे तेच नाव. धन्यवाद!
Deleteइतके लिखाण, पुस्तकं, पुरस्कार म्हणजे ऐश्वर्यवती
ReplyDeleteनाव साजेसं आहे. कार्यक्रम तेही पुणे, नाशिक,औरंगाबाद,पिंपरी चिंचवड,सर्वत्र केलेत.Great. Congratulations!!
हो ना. मलाही आश्चर्य वाटतं कधीकधी. ऐश्वर्यवती मला खूप आवडते. एकदम खूप ठिकाणी पुस्तक गेलं.
Deleteधन्यवाद!
Congratulations and Wonderful name ����
ReplyDeleteYes Prajakta! I am Aishwaryawati!
DeleteThanks!