पुस्तकास प्रस्तावना : A-ONE’S Basic to Advance
Apptitude – I
सहज सोप्प गणित मार्गदर्शनासह
सौ.वंदना विजय धर्माधिकारी
पुस्तक : लेखक : श्री. संतोष वदक पाटील
माझा सर्वात आवडता विषय
गणित आहे. मी गणिताची विद्यार्थिनी आहे. कॉलेजमध्ये गणित हाच प्रमुख विषय घेऊन मी
कला शाखेची बी.ए. ही पदवी घेतली आहे. शाळेत असताना शंभर पैकी शंभर मार्क्स आणि
दरवर्षी गणिताचे पारितोषिक घेतले होते. मी जेंव्हा शिकवण्या घेत होते, तेंव्हा माझ्या
विद्यार्थ्यांना मी गणितात एकदम पक्क केलं होते. गणिताची त्यांना खूप भीती होती,
ती तर घालवली शिवाय मार्क्स बरेच वाढले गेले. या विषयात पुढे नोकरी करताना विशेष
काही करणे झाले नाही, हेही खरं. माझ्या दोन्ही मुलींचा गणित विषय एकदम तयार करून
घेतला होता.
मला आठवते धाकट्या
जान्हवीने एकदा एका परीक्षेत १० मार्कांसाठीचा प्रश्न म्हणजे तो विषय ऑप्शनला
टाकला होता. ते मला परीक्षेला निघायच्या आधी १५ मिनिटे समजले. तिला म्हंटल अगदी ३
मिनिटे दे मला, मी तुला समजावून सांगते. तुला जमेल, नक्की प्रश्न सोडवता येईल. आणि
खरंच अगदी दोन मिनिटात मी तिला समजावून सांगितले. त्या दिवशी परीक्षेला
त्याविषयावर प्रश्न आला, आणि तोही १५ मार्काचा. तिने अगदी बरोबर सोडवता आला.
तेंव्हा तिला खूप आनंद झाला, आणि मार्क्सही ९०+ मिळाले.
याच गणिताच्या एका
पुस्तकाला प्रस्तावना द्याल का अशी विचारणा केली गेली. तेंव्हा मला अतिशय आनंद
झाला. श्री.संतोष वदक पाटील हे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतात. मराठी मुलांना
मराठीतून विषय समजावून देतात, म्हणून खास त्यांचेसाठी पुस्तक तयार केले, आणि मी
त्यास प्रस्तावना दिली. मला खूपखूप आनंद वाटला. माझ्याकडे माझ्या विषयाच्या
पुस्तकासाठी प्रस्तावना हा माझाच मला गौरव वाटतो.
वंदना धर्माधिकारी
प्रस्तावना ::: A-ONE’S Basic to Advance
Apptitude – I
सहज सोप्प गणित मार्गदर्शनासह
सौ.वंदना विजय धर्माधिकारी
पुस्तक : लेखक : श्री. संतोष वदक पाटील
“गणित विषय एकदम सोप्पा. गणित ज्यांना जमते, ते आयुष्यात कुठलाही विषय
अभ्यासून उत्तम यश संपादन करतात. म्हणून गणित येणं आयुष्यात महत्वाचे आहे.” हे
लक्षात घेऊनच खास मराठी मुलांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे, ही सदिच्छा मनी बाळगून या पुस्तकाची मांडणी केलेली
आहे. लेखक, श्री. संतोष वदक पाटील यांचे प्रथमत: मन:पूर्वक अभिनंदन!
विद्यार्थ्यांच्या नजरेतून करावा लागणारा अभ्यास सोपा कसा होईल या विचाराने
एकेका गणिताची निवड केलेली दिसते.
प्रत्येकात काही ना काहीतरी फरक आहेच. प्रकरणाच्या सुरवातीला त्या त्या विषयासाठी
आवश्यक असलेली सूत्रे दिल्याने त्यातील गणिते सोडविणे नक्कीच सोपे जाणार आहे.
मराठी मुलांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकविध क्षेत्रात प्रवेश करावा ह्या
कळकळीने वदक सरांनी सुंदर पुस्तक लिहिले. आणि म्हणूनच या इंग्रजी पुस्तकाची
प्रस्तावना मात्र मला मराठीतच लिहा असे त्यांनी सांगितले.
एकदा का गणिताची मेख समजली, त्याची गोडी लागली, की आयुष्यातच बदल होताना
जाणवतो. म्हणजे कसं सहज रस्त्याने जाता जाता एखादी गाडीची नंबर प्लेट बघूनही
आकड्यांची गंमत लक्षात येते. लहान लहन कोडी पटकन सुटतात. काही गोष्ट आवर्जून करा
असे मी सुचविते. सुडोकू सोडवायची सवय खूप चांगली. त्याने मनाला, मेंदूला या
आकड्यांशी खेळायची चटक लागते. अनेकविध कोडी सोडविताना आकडे मदतीस येतातच. पाढे
पाठांतर पक्के होते, भूमितीतील दाखले व्यवहारी जगात वापरले जातात. गणितातील
वैविध्य जाणवत राहते. त्याने बुद्धी तल्लख होते, आणि तल्लख मेंदूच यश खेचून आणतो.
थोड्याच स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका मराठीतून असतात. बहुधा इंग्रजीत
पेपर असतो, म्हणून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला आधीच टेन्शन येते. प्रश्न
समजेल कि नाही इथपासून मनात शंका येतात. आणि मराठी मुले मागे राहतात. ते
टाळण्यासाठी म्हणूनच ह्या पुस्तकात गणिते इंग्रजीतून दिलेली आहेत, पण प्रस्तावना,
मनोगत, पुस्तकातील गमती जमती मात्र मराठीतूनच दिलेल्या आहेत. मराठी चांगले समजले
की इंग्रजी समजणे, शिकणे सोपे जाते. डायरेक्ट इंग्रजी शिकण्यापेक्षा आपला ज्ञानाचा
पाया मराठीने पक्का करून दुसऱ्या कुठल्याही भाषेत ते ज्ञान रुपांतरीत करण्याचे
कौशल्य संपादन करता येतेच, मग फक्त स्पेलिंग बरोबर टाकून लिखाण करणे बाकी शिल्लक
उरते. सांगोपांग जाणीवपूर्वक हे असे
करताना त्यामागे उद्देश, ध्येय आणि बरोबर सामाजिक भान आहे. मराठी भाषा, मराठी
तरुणपिढी, मराठी माणूस आणि आपला महाराष्ट्र याप्रती प्रेम असल्याने सरांनी मराठी
मुलांसाठी, मराठीतून गणित शिकविण्याचा केलेला प्रयत्न, त्यांना पुढे नेण्यासाठी
सारे काही पुस्तक रूपाने मांडले आहे. डायरेक्ट इंग्रजी शिकण्यापेक्षा आपला
ज्ञानाचा पाया मराठीने पक्का करून दुसऱ्या कुठल्याही भाषेत ते ज्ञान रुपांतरीत
करण्याचे कौशल्य संपादन करता येतेच. पाटील सरांच्या स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे
विशेष आभार मी मानते.
गणित म्हणजे आकडेमोड. इथे तीच आकडेमोड एकदम कशी सोपी होते जेंव्हा पाढे पाठ
असतात, हे समजावून देते. आणखीनही काही गोष्टी मराठीतून अभ्यास केल्याने शक्य
होतात. एक अतिशय महत्वाची गोष्ट माझ्या नजरेस आली आणि ती मी सगळ्यांना नेहमी
सांगते. मराठीतून पाढे म्हणनं, घोकण,
लक्षात ठेवणं, पाठ करणं, आठवण, उड्या मारीत पटकन उत्तर ओठावर येण, त्यानुसार गणित
सोडवण हे इंग्रजीतून टेबल्स म्हणण्यापेक्षा खूपच सोप्प आहे. इथे कुठेही दुसऱ्या
भाषेला कमी लेखायची भावना नाही. उदाहरणार्थ : ‘९*९=८१ - नवा नवा ऐक्याऐंशी - शब्द
तीन’ तसेच ‘१२*१२=१४४ – बारं बारे चव्वेचाळाशे - शब्द तीन. तेच इंग्रजीतून
म्हणताना ‘nine
nine’s are eighty one’- शब्द ५’ आणि ‘twelve twelve’s are one hundred forty four – शब्द ७.’ शिवाय ‘s आणि are चा उच्चार करताना बोबडी वळते,
शब्दोच्चार अस्पष्ट येतो, वेळ लागतो, गती मंदावते, आणि उगीचच जास्त शब्द उचारण्यात
अधिक उर्जा खर्च झाल्याने टेबल्स म्हणणे कंटाळवाणे काम होते. ‘शे’ या एकाक्षरी
शब्दाने इंग्रजीमधील ‘One hundred’ या १० अक्षरी अधिक एक स्पेस अशा शब्दाचे उच्चारण
अर्थपूर्ण झालेले आहे. पटले ना. इंग्रजीच्या उलट पाढे म्हणताना जाणवते तो ठेका,
रिदम, स्पष्ट शब्दोच्चार, गती, आणि उर्जा सुद्धा. संपूर्ण वर्ग जर जोरात पाढे
म्हणत असेल, तर आवाजाची पट्टी प्रत्येकाची वाढत जाते. पण तीच पट्टी टेबल्स
म्हणताना खाली घसरते. मोठ्यांदा पाढे म्हणून बघा, माझे म्हणणे नक्कीच पटेल.
माझे तर सांगणे आहे, जर मुलांना गणितात तरबेज करायचे असेल तर स्वत: मराठी पाढे
नियमित म्हणा, मुलांना ते म्हणायला शिकवा. आपल्या संस्कृतीनुसार तिन्हीसांजेला
शुभंकरोती आणि पाढे म्हणायची सवय आम्हाला होती, तीच पुढच्या पिढ्यानपिढ्या तशीच
राहो, असे आवर्जून आग्रहपूर्वक सांगावेसे वाटते. गणित चांगले तर सगळे चांगले करणे
शक्य होऊ शकते. जरी इंग्रजी माध्यमात शिक्षण मुले घेत असली तरी पाढे पाठ करून
घेतले आणि त्यानुसार गणिते सोडवली गेली, तर लवकर लवकर गणिते सुटतात. एकदम उत्तर
देता येते. पंधराचा पाढा पंधरा एके पंधरा पासून न म्हणता पंधरी पाची पंच्याहत्तर
एकदम उच्चारले जातेच. आणखीन एक लक्षात घ्या, एक ते शंभर अंकात पंच्याहत्तर मध्ये ७
आणि ५ दोन अंक आहेत. पण मराठीत एकच शब्द आहे, तेच इंग्रजीमध्ये मात्र seventy five असे दोन शब्द झाले. असेच सगळ्या अंकांसाठी आहे,
तपासून बघा.
तुम्ही म्हणाल, पेपर इंग्रजीत असतो, तर मराठीत कसे पाढे म्हणून सोडवू. हे बघा,
कमी वेळात जर जास्त गणिते अचूक सोडवायची असतील, जास्तीतजास्त गुण पाहिजे असतील तर
विचार मराठीतून करा, गतिमान होईल आणि लिहिताना इंग्रजीत मांडा. जमते, वेळ वाचतो.
आपली उर्जा तर वाचवायची, साठवायची आणि गणितात पूर्ण मार्क मिळवायचे असतील तर पाढे
पाठ करून गणित सोडवा. यश नक्की मिळेल. याची खात्री बाळगा. आणि त्यासाठीच हे पुस्तक
आहे. त्यासाठी श्री. संतोष वदक पाटील सरांचे मार्गदर्शन तसेच अभिनंदन!
सर्वांना उत्तम यश मिलो, त्यांची प्रगती होवो ह्या माझ्या शुभेच्छा!
वंदना धर्माधिकारी
मोबाईल : ९८९०६२३९१५.
सर्व प्रथम वंदना धर्माधिकारी जी आपले हार्दिक अभिनंदन तुमच्या प्रस्तावना ची.आणि पाटील सर यांचे ही,गणितात चांगले गुण पाहिजेत तर मराठीतून पाढे पाठ करणे अगदी आवश्यक आहे.
ReplyDeleteपुस्तक विकत घ्यावयाचे।
धन्यवाद! पाढे तालासुरात म्हणताना येणारी मजा काही औरच आहे. पुढची पिढी मुकत चालली त्यापासून... कालाय तस्मै नंम:. पुस्तक माझ्याकडे आहे. देऊ शकते.
Deleteअभयजी धन्यवाद.! पुस्तकासाठी संपूर्ण 9730830649
Deleteयोग्य प्रस्तावना
ReplyDeleteधन्यवाद! आवडीचा विषय असला की सगळं छान छान जमतं सगळ्यानाच. तसंच.
DeleteVery well read !!!
ReplyDeleteThanks Prajakta.
Deleteनमस्कार, जास्तीत जास्त मराठी मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे असा आमचा प्रयत्न आहे. या पुस्तकाला सौ.वंदना धर्माधिकारी यांची अतिशय सुंदर, समर्पक प्रस्तावना लाभली हे मी माझे भाग्य समजतो...👏
ReplyDeleteआपला नम्र
संतोष वदक-पाटील
श्री.पाटील,मराठी मुलांसाठी आपण ज्या तळमळीने शिकवता. पुस्तकातून गणित सोप्प कसं हे तिथे लक्षात येते. या पुस्तकाला प्रस्तावना लिहायची आपण मला संधी दिलीत त्याबद्दल आभारी आहे मी. धन्यवाद!
Deletenice preface
ReplyDeleteThanks !
DeleteSundar
ReplyDeleteप्रस्तावना वाचल्यावर गणिताचा विचार खोलवर केलेला आहे. एक लक्षात आलं. ते सांगतो घड्याळ बघितल्यावर साडेपाच म्हणणं आणि half past five.... मराठीत नक्कीच चांगलं. असे बोलणं सर्वांना सहज शक्य आहे. मस्त. आवडला.
ReplyDeleteबरोबर शोधून काढलेत. तसे निदान बोली भाषेत तरी मराठी वापरावी. जसजसा विचार करतो, किंवा असे बोलत राहतो तेंव्हा जाणवते. आपलं चांगल सोडून आपण दुसऱ्याच्या मागे उगीच धावतो. इंग्रजी शिका, अभ्यास, बोला... पण मराठी अधिक बोला, अधिक वाचा, अभ्यासा देखील. धन्यवाद.
ReplyDelete