95. Deshonnati 25 article NEFTRTGS
एकविसावे शतक इलेक्ट्रॉनिक युगाचे
शतक आहे, याची प्रचीती आपण पदोपदी घेत आहोत. बँकिंग इंडस्ट्री तर आता इलेक्ट्रॉनिक
बँकिंग नावानेच ओळखली जाती, इतका अमुलाग्र बदल बँकिंग कार्यप्रणालीत झालेला आपणास
जाणवतो. सर्वात कमाल केली गेली ती धनप्रेष सेवेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
पैसे पाठवण्याचे वेळ प्रत्येकावर ना
कधीतरी येतेच येते. अशावेळी लवकरात लवकर पैसे पोचणे महत्वाचे असल्याने त्यानुसार
केलेले काही बदल उत्तमरीत्या अमलात आणले जातात. NEFT – National Electronic Fund Transfer आणि RTGS – Real Time Gross Settlement दोन महत्वपूर्ण बदल होय.
एका गावातील मग ते खेडेगाव असले तरी चालेल, एका व्यक्तीला आपल्या देशातील एखाद्या
बँकेतील एका खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या दूरच्या गावातील दुसऱ्याच कुठल्यातरी बँकेतील
त्याच्या खात्यात पैसे पाठवून त्या व्यक्तीची निकड लवकरात लवकर निभवायची असल्यास NEFT/ RTGS पद्धतीने ते शक्य होते. नोव्हेंबर,२००५ मध्ये NEFT सुरु झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेने RTGS सेवा मार्च २००४ मध्ये काही मर्यादित बँक-शाखांमध्ये
प्रायोगित तत्वावर सुरु केले आणि नंतर ते सर्वत्र सुरु करण्यात आले. दोन्हीमध्ये
एक व्यक्ती, कंपनी, फार्म आपल्या खात्यातून दुसऱ्या कोणाच्याही खात्यात कितीही
रक्कम पाठवू शकतात. रुपये २ लाखापर्यंतचे धनप्रेष
NEFT द्वारा होतात तर
त्याहून अधिक रक्कम पाठविताना RTGS केले जाते. RTGS साठी कमीतकमी २ लाख आणि जास्तीतजास्त कितीही अधिक रक्कम पाठविता येते. अत्यंत
अल्पदरात दोन्ही धनप्रेष असल्याने, त्यांचेद्वारे होणार्या व्यवहारांची संख्या आणि
रकमा प्रतिदिन वाढत आहेत.
आपल्या नावाप्रमाणे Real Time मध्ये म्हणजे जेंव्हा व्यवहार बँकेकडे नोंदवून पैसे पाठवा असा आदेश बँक
ग्राहकाकडून देण्यात आला, तेंव्हा लगेचच त्यावर कार्यवाही सुरु केली जाते.
त्यासाठी प्रतीक्षाकालावधी शून्य आहे. RTGS व्यवहार संगणकात नोंदवून रिझर्व्ह बँकेकडे पाठविला गेला की तो मागे घेता येत
नाही, तो अपरिवर्तनीय (irrevocable
) असतो. ( Payment through RTGS become
irrevocable and final immediately after booking on the account.). रिझर्व्ह बँकेकडून तो लाभार्थीच्या बँकेकडे आणि लगेचच लाभार्थीच्या खात्यात
जातो. RTGS व्यवहार आल्यावर त्या शाखेला ताबडतोब रक्कम लाभार्थीचे खात्यात जमा करावी
लागते. त्याने २ तासाचे आत पैसे लाभार्थीचे खात्यात जमा होतात. व्यवहार पूर्तता आरबीआय कडून बँकेला कळविली
जाते, आणि बँक आपल्या ग्राहकास.
NEFT/ RTGS व्यवहार नोंदणीचा दिवस ‘T’ असे धरल्यास RTGS व्यवहार त्याच दिवशी म्हणजे ‘ T+0’ कालावधीत पूर्णत्वास जातात, आणि NEFT जास्तीतजास्त ‘T+1’ वेळेत पूर्ण होतात. याचाच अर्थ RTGS त्याच दिवशी तर NEFT उशिरात उशिरा म्हणजे दुसऱ्या दिवशी पूर्ण होतात. काही कारणास्तव उदा.:खातेदाराचे
नाव, नंबर जुळला नाही तर व्यवहार पूर्ण न झाल्याने आला तसा उलट पाठवला जातो, आणि
पैसे पाठविणार्याचे खात्यात जमा होतात, तसे कळविण्यातही येते. NEFT व्यवहार दिवसभरातून काही ठरवीक (अर्धा तास/एक तास) वेळेच्या अंतराने एकाच
वेळी नोंदविलेले सर्व केले जातात. RTGS - सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ते४.३०
पर्यंत आणि शनिवारी ९ते१ असे आहे. तसेच NEFT – ९ते६.३० आणि ९ते१२.३०.
दोन्हीमध्ये सुरक्षितता, जलदगती,
अचूकता, कमी जोखीम असल्याने दिवसेंदिवस अशा व्यवहारांची संख्या आणि त्यातील रकमा
पटीपटीने वाढत आहेत. व्यावसायिक धनप्रेषांचा कालावधी कमी झाला, अचूकता वाढल्याने
व्यवसाय वृद्धी झाली, विश्वासार्हता बळकट झाली. परिणामत: कॉर्पोरेट जगतात
निर्णयप्रक्रिया जलद झाल्याने व्यवहारपूर्तीसाठी वाट बघणे ही अपरिहार्यता कमी
झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला यांनी गती आली, बळकटी आली.
NEFT/ RTGS व्यवहार बँकेत नोंदविताना पुढील सर्व माहिती पाठविणाऱ्या व्यक्तीने (remitter) द्यावी लागते. स्वत:चे नाव,खाते नंबर, मोबाईल नंबर. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे त्याचे(beneficiary) संपूर्ण नाव, संपर्कासाठी फोन/मोबाईल नंबर, त्याच्या बँकेचे शाखेचे नाव व IFSC नंबर तसेच लाभार्थीचा खाते नंबर आणि
पाठवायची रक्कम दिलेल्या अर्जात नमूद करावी लागते. पाठवणाऱ्याने लाभार्थीला आपण
इतके इतके पैसे आज पाठवीत आहोत असा निरोप देणे देखील आवश्यक असते.
IFSC - Indian Financial Security Code भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेच्या प्रत्येक
शाखेस दिलेला ११ आकडी एकमेव नंबर आहे. त्यापैकी पहिले चार आकडे बँक दर्शवितात, तर
पुढील सहा आकडे शाखा.
वंदना धर्माधिकारी
No comments:
Post a Comment