माझी ‘क्षितीजाची कोर’ कविता लोपामुद्रा
– फेसबुक पेजवर ०८-१२-२०१७ रोजी
टाकली गेली होती.
लोपामुद्रा – कवयित्री, अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे पेज आहे.
कवयित्री – सौ.वंदना विजय धर्माधिकारी
क्षितीजाची कोर
दिसू लागे पैलतीर
जरी अंधूक नजर
मन होई ना तयार
जाया क्षितीजाच्या पार
सांग आधी कोण जाई
उगा मागेपुढे होई
माझी श्रीमंत पुण्याई
पुढे जाया मज घाई
दोन जीव एक मन
एका क्षणी उडो प्राण
नभ धरेचे मिलन
क्षितीजाची कोर छान
नको आडवू उगाचं
दोघं संगच जायाचं
आहे स्वर्गीय दाराची
कडी क्षितीज रेघेची
रेघ भिडे धरित्रीला
त्याने निरोप धाडीला
मावळती मुहूर्ताला
दोघं निघू प्रवासाला
सोड आता भुईतण
भांडीकुंडी अंथरूण
बघ नभीचं तोरण
क्षितीजाचं ते आंगण
त्या अंगणी खेळाया
चंद्र चांदण्यांचा मेळा
हात हातामंदी घ्याया
तुझं गाणे गोड गळा
सुर घुमेल नभात
मोती जमले डोळ्यात
हास गडे तू खुशीत
नातं आहे जन्मजात
वंदना धर्माधिकारी.......२४ ऑक्टोबर, 2017
छान कविता 👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteउत्तम
ReplyDeleteनुकताच कोथरूड सांस्कृतिक मंडळ कविता लिखाण स्पर्धेत या कादितेला दुसऱ्या नंबरचे बक्षीस मिळाले. धन्यवाद!
ReplyDeleteफेस बुक पेजवरही आपले साहीत्य आहे.चौफेर लेखणी फिरत आहे. विविधता आहे लेखणीत. सुरेख.
ReplyDeleteहं. आवडली ना कविता. मला पण. आणि अगदी सहज केली गेली.
ReplyDelete