अडगुलं मडगुलं सोन्याचं कडबूलं
रुप्याचा वाळा तीट लावा बाळाच्या कपाळाला
हे गाणं गुणगुणलं नाही, अशी मराठी
स्त्री नसेल असेच वाटायचे कधी काळी. हो, आता ते कधी काळी झालं आहे ना? मला तरी
असेच वाटते. कधी काळी गायलेलं जुनं झालेलं गाणे. कोण गाणार हे असे गाणे, अगदीचं काहीतरी जुनाट
गाणे. खरेचं जुन्या समजुती, जुनी भांडीकुंडी, नाती, अंथरूण पांघरूण, खेळणी आणि खेळ
देखील! किती किती जुने झालेलं परत तेच तेच तेच... किती वर्षानुवर्षे वापरून खराब
झालेले.
हं... खरं आहे. बदल करायलाच
पाहिजे. बदल होतोच. चांगला वाईट. पण विचार करून गोष्टी बदलतात की असेच कंटाळा आला
म्हणून, काहीतरी फॅड हवेचं म्हणून चांगल बिघडवायचं आणि नव्याने काहीतरी सुरु
करायचं.
पण, म्हणजे तरी काय? आणि हे असे कसे...
बघा वाचून. मला काही लिहीताच येत नाही कधी कधी. हे आठवलं आणि लेखणी रुसली.
खरं आहे.हे गाणं आणि चिऊचं काऊचं घरटं दोन्ही पाहिजेच तान्हुल्याला.
ReplyDeleteकाही गोष्टी न चुकता त्या त्या वेळी करायच्या असतात. त्यातलीच ही गोष्ट आहे. हे गाण ही गोष्ट तान्हुल्याला हवीच.त्याशिवाय आईपण नाही. इतकी ती मराठी आयांमध्ये भिनलेली आहे. असेच वाटते. धन्यवाद आपणास.
ReplyDelete