कधी कधी शब्द अगदी रुसून बसतात. काही केल्या येतचं बाहेर तर
कागदावर तरी कसे उतरवणार त्यांना? असेच एकदा झालं. तसे ते रुसतात माझ्यावर. मला
बँकिंगचा एक लेख द्यायचा होता. पण, काही केल्या सुचत नव्हतं, लिहीताच येत नव्हता.
खरं तर, विषय सोपा, अगदी डाव्या हातचा. पण, संपावर गेलेल्यांना कसे आणायचे.
त्यांच्या मागण्या होत्या का काही? समजेना. लेखासाठी ५/६ फोनही आले. “देते” म्हणून
आजचं उद्यावर ढकलत गेले. बास. आणि एकदम उफाळून यावे तसे शब्द वर आले, त्यांनाच मी
बांधल इथे एका कवितेत. अडीच अक्षरे. हीचं या कवितेची जन्मकहाणी. रात्री कविता
उतरवून उशिरा झोपले. कारण लेख सकाळी द्यायलाच हवा होता. तो नाही झाला, अडीच अक्षरे
उतरली एकदाची. परत पहाटे जाग आली, मस्त चहा घेतला आणि पटकन अक्षरशः १५/२० मिनिटात
लेख लिहून ७ चे आधी ईमेलवर गेला देखील. होतं असं कधीकधी.... काय करणार. हट्ट
पुरवावे लागतात शब्दांचे, कधी लेखणीचे, कधी लॅपटॉपचे, तर कधी इंटरनेटचे... आलीया
भोगासी....
आणि सांगायचेच
राहिलं, ‘अडीच अक्षरे’ या कवितेला ‘साहित्य प्रेमी भगिनी मंडळ, साहित्य परिषद,
पुणे’ यांच्यातर्फे ‘कालिदास पुरस्कार’ मिळालेला आहे.
कविता : अडीच अक्षरे
कवयित्री : वंदना धर्माधिकारी
कोणी भरून ठेविले
तेथे शब्दांचे रांजण
बाळ रांगत रांगत
घेई एकेक वेचून
शब्द अडीच अक्षरे
काय सांगू त्याचे गुण?
त्याचे गोडवे
गायना शब्द आणू मी कोठून? …१.
शब्द शब्दात
मांडण्या बनविला शब्दकोष
शब्दाशब्दातून
पुसे दोघा मधला तो रोष
अशी शब्दांची किमया, शब्द आहे एक कोडे
कधी सांगावया
गोष्ट, एक शब्द ना सापडे ...२.
प्रेम अडीच
अक्षरे, त्याला वर्णू कसे किती?
प्रेम जगता उमजे
प्रेम भावना महती
प्रेम शब्द, शब्द
शब्द, दोन्ही अडीच अक्षरे
दोघे करिती शिंपण, येती आतून घुमारे ...३.
प्रेम गुंफाया
शब्दात नाही जमले कोणाला
शब्दांवरी जीवा प्रेम
कवी म्हणोनी जन्मला
किती प्रयत्न
करोनी कवी अपुरा ठरला
दोन्ही लिहिण्या
कागदी हात मधेच थांबला....४.
नका करू चिरफाड, जोडी अडीच दोघांची
सूक्ष्म अती, दिसू नसे, उंची आहे आभाळाची
दोन्ही हवे
माणसाला, त्याले खोली सागराची
जीव आसुसतो किती, चालरीत जगण्याची ...५.
बोल बोबडे बाळाचे
गोड कानात घुमती
अर्थ नसे का
शब्दांना येई प्रेमाला भरती
किती उपसले जरी
परी भरीला रांजण
शब्द, अर्थ, प्रेम, भाव जणू मनीचा दर्पण
...६.
वंदना
धर्माधिकारी
M : 9890623915
खूप छान कविता..👍👌
ReplyDeleteया कवितेला मिळालेल्या 'कालिदास पुरस्काराबद्दल अभिनंदन..💐
खूप खूप धन्यवाद !
Deleteसुंदर
ReplyDeleteसुंदर कविता. पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअरुण दळवी - सुंदर कविता पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteकरायला गेलात एक आणि झाले भलतचं.,तेही इतके सुबक की मानाचा पुरस्कार मिळाला. कविता फारंच छान आहे.अभिनंदन!
ReplyDeleteहोय! झालं खरं असे. होतं असेही कधीकधी. धन्यवाद!
ReplyDelete