Wednesday, June 13, 2018

53. Poem - कुंडली! कुंडली!! कुंडली!!!



कुंडली! कुंडली!! कुंडली!!!
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी


संगणकाने कमाल केली, जन्मवेळ देता जादू झाली I
गणिती आकडेमोड झाली, समोर जन्मकुंडली आली II 

शनी, राहू, केतू आले, बुध, नेपच्यून, प्लुटो बसले I
गुरु, मंगळ, हर्शल, चंद्र, शुक्रासह असते कुंडली’ II

अक्षांश आणि रेखांश, जगात कोठे मिळतात I
त्यास काय म्हणतात? नाव सांगे कुंडली’ II

पत्रिकेच्या नाना तऱ्हा, नारायणी पाश्च्यात I 
सायन आणि निरयन, सर्वच दावी कुंडली’ II

नक्षत्र, रास, गण, गोत्र, पत्रिकेत एकत्र नोंदली I
दोघांची युती, पाठीशी शशी, सांगड घाली कुंडली’ II

प्रत्येक राशीला साडेसाती, पाच सरली अडीच उरली I
शुभांक आणि खडे दाविती, प्रचीती दावे कुंडली’ II

एक पानी, शंभर पानी, भूत भविष्याची रेखाटणी I
क्षणात सुबक मांडणी, छापून देई कुंडली’ II

अभ्यास करून परीक्षा दिली, मार्कलिस्ट बघता भोवळ आली I
अपयशाने भरली झोळी, ‘काय करू?’ सांगे कुंडली’ II

दोघांची मने जुळली, परी पत्रिका आड आली I
जीवाची घालमेल झाली, तेंव्हा मार्ग दावी कुंडली’ II

नोकरीवरती गदा आली, धंद्याची पुरी वाट लागली I
घरादाराला कळा काळी, उपाय सुचवी कुंडली’ II







ही व्यवसायाची हमी, पैशाला ना पडे कमी I
घ्या संगणकी बसवूनी, श्रीमंत बनवी कुंडली’ II

कुंडली नियमीत  काम, कष्ट थोडे, योग्य दाम I
वेळेचे नियोजन छान, ‘कुंडली’! ‘कुंडली’!! ‘कुंडली’ !!! 

वंदना धर्माधिकारी
१३ जून,२००४




2 comments:

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com