01-06-2017
दैनिक देशोन्नती – लेखमाला
अर्थसंस्कार
लेखिका :
सौ.वंदना विजय धर्माधिकारी
दैनिक देशोन्नती मध्ये मागील २ जून, २०१७ पासून “अर्थसंस्कार” ही लेखमाला मी
लिहित आहे. लोकांना अर्थ हवे असते, पण आर्थिक विषय जाणून घेण्यास फारसे कोणी
उत्सुक नसतात. जेंव्हा कधी एखादा दणका बसतो, काहीतरी चुकीचे केले जाते, बँकेकडून
कसले तरी चार्जेस खात्यातून घेतले जातात, तेंव्हा चूक महोदयांची असते; अशावेळी
मात्र असे का झाले हा प्रश्न आ वासून पुढ्यात येतो. डोक्यात राहतो, एखादा बँकेत
चौकशी करतो, नाहीतर सोडून देतो. ‘जाऊ देत, इतके कुठे जातात, तसे इथेही’ असे म्हणून
दुर्लक्ष केले जाते. विस्मरण तर असतेच असते.
एकुणात, अर्थसंस्कार मुद्दाम करून घेणारे कमी आहेत. देशाला अर्थसाक्षरतेची
नितांत गरज आहे. त्यासाठी माझी लेखणी थोडेफार तरी काम करण्यात यशस्वी झालेली आहे.
देशोन्नती मधील लेखमाला ही माझी आर्थिक विषयाची ९ वी लेखमाला आहे. सकाळ, लोकमत,
प्रभात, केसरी यामधून लेखमाला झाल्या. सहकार सुगंध, नागरी बँक वार्तापत्र,
अर्थपूर्ण, अर्थपर्व, अर्थशक्ती अशा आर्थिक विषयांची मी लेखिका आहे. वर्षानुवर्षे
यामधून प्रत्येक अंकांत माझे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. शिवाय, दिवाळी अंक, इतर
काही हे वेगळेच आहे.
वाचकांचे जेंव्हा फोन येतात, त्यांच्या समस्या अडचणी यावर चर्चा होते तेंव्हा
प्रकर्षाने जाणवते ती अर्थसाक्षरतेची देशाला असलेली गरज. तीच गरज लक्षात घेऊन
माझ्यापरीने मी प्रयत्न करते. नाहीतर कोण बँक सोडून १८ वर्षे झाल्यावर देखील
बँकिंग वर लिहित बसेल. शिवाय, आता तर मला अभ्यासच करावा लागतो इतके बँकिंग सतत बदलत
आहे. यामागे माझी एकच धारणा आहे ती माझ्याच कवितेच्या ओळीत लिहिते आणि थांबते.
समाजाचे आपण देणे लागतो ही बोचणी
सदैव अंतरी
लेखणीतून मांडू लागले माझ्या
अनुभवांची शिदोरी
वंदना धर्माधिकारी
सामाजिक जाणिव
ReplyDeleteअर्थसाक्षरता निर्मूलनाचे व्रत घेतल्या सारखे झपाट्याने आपण लिहीत आहात. दिडवर्ष लेखमाला सुरू आहे. मानलं. असेच लिहीत रहा. शुभेच्छा!
ReplyDelete