“अभ्यास, मुलं आणि पालक” : सकाळ, मधुरा पुरवणी १५ मार्च, २००३
मुलाच्या परीक्षा म्हणजे पालकांनाचं दडपण अधिक! मुलींच्या अभ्यासाचं मी कधी टेन्शन घेतलेले आठवत
नाही. मी माझ्याही परीक्षेचे घेतले नव्हते कधी. आणि खूप सारखं मागेही नव्हते
लागले. आणखीन काय विचार करून मी मुलींची तेंव्हा काळजी घेतली, कसा अभ्यास घेतला,
काय अपेक्षा ठेवल्या, आणि त्यांनी काय केले, असा विचार डोकावला आणि “अभ्यास, मुलं
आणि पालक” मस्त लेख लिहिला. दिला सकाळकडे
पाठवून. आणि चक्क छापूनही आला. ‘मधुरा ‘ महिलांच्या पुरवणीत. लेख आवडला अनेकांना.
हे लगेच समजले मला.
पंधरा दिवस गेले असतील, आणि सकाळ
मधून फोन आला. “येऊन भेटायला जमेल का?” आणि मीही गेले. लेखाला अनेकांच्या
प्रतिक्रिया आल्या होत्या, पत्रे, फोन होतेच. मग, चौकशीही झाली. कोण, कुठे असता,
काय करता, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. इतके दिवस काही लिहिले नाही का? .....
“कसलं काय? नोकरी, घर सांभाळता
सांभाळता दररोजच्या वर्तमानपत्राची घडी न उलगडता रद्दीत जायची. तेंव्हा कुठे वेळ
मिळायचा? नाही जमलं.”
“मग, आता लिहाल का? बँकिंग वर.”
अशी विचारणा केली.
“हो, देईन की. अगदी डझनाने लेख
देईन मी.”एकदम डझनाची बोली केली मी.
“अगदी सोप्प्या सोप्प्या भाषेत
बायकांना बँकिंग समजावून द्या.” असे सांगितले, मग तसेच लिहिले. आठवड्याला एक लेख
अशी सकाळ मधुरा पुरवणीत पहिली लेखमाला – ओळख बँकिंगची सुरु झाली.
“अभ्यास, मुलं आणि पालक” या बद्दल
आणखीन एक गोष्ट सांगते. श्री.विजय धर्माधिकारी तेंव्हा मुंबईला सिंडीकेट बँकेच्या कांदिवली
शाखेत होते. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कुलकर्णी नावाच्या बाई होत्या. त्यांचा
मुलगा दहावीला आणि टेन्शन आईला. त्याने त्या सारखी त्याची काळजी करायच्या, बडबड
करायच्या. दर शनिवार रविवार बाबा पुण्याला यायचे. घेऊन गेले एक अंक त्यांना
दाखविण्यासाठी. दिला वाचायला. वाचला लेख त्यांनी, तरीही त्या म्हणाल्याच,
“ तुमच्या मुली आहेत हो हुशार. पण
हा.”
पंधरा एक दिवसांनी कुलकर्णी
बाईंच्या मुलाच्या क्लासमध्ये रविवारी सकाळी पालकांची सभा घेतली. तिथे सगळ्यांना
सांगण्यात आले, कि ‘क्लासच्या चारी कोपऱ्यात जे लेख लावलेले आहेत, ते वाचून मगच
जा.’ कुलकर्णी बाईंनी आत गेल्यागेल्या माझा लेख भिंतीवर बघितला होता. त्यांनी परत
वाचला. पण नेमका रविवार आणि बाबा पुण्याला. घरचा फोन काही त्यांचेकडे नव्हता.
सोमवारी बाबा गेले बँकेत. तर कुलकर्णी बाईंनी वृत्तांत सांगितला. आणि, बाबांनी घरी
फोन केला, मीही बोलले कुलकर्णी बाईंशी. बरं वाटलं. माझा पहिला लेख असा गाजला. आणि
मी सकाळ पेपर मध्ये लिहायला लागले..... आणि आत्ता, या निमित्ताने तुम्हाला
सांगितले....बास. इतकेच!
Chan
ReplyDeleteमाझी लेखणी या लेखापासून लोकांना दिली गेली. ती वाहतच आहे. आज इथे तर उद्या तिचे... असो.
ReplyDeleteधन्यवाद!
पहिल्याच लेखात सिक्सर ठोकली आपण. एक लेख काय छापून आला आणि लेखमाला सुरु केली. लेखातले बारकावे मार्गदर्शक.अभिनंदन
ReplyDeleteसुरवातीला सकाळने उशीर झाला लेखाला म्हंटल होतं. मी सांगितलं लेख पाठवला आहे. नको असेल तर तसे सांगा. मी घेऊन येईन. कसंच काय, झालं ते वेगळेच. बुलावा आ गाय!
Deleteप्रतीक्रीयेबद्दल धन्यवाद!