Wednesday, October 21, 2009

13. Award winnning article- Sushrey Diwali aanka 2009

वाढते घटस्फोट आणि वाढती व्यसनाधीनता :
सुश्रेय, दिवाळी अंक २००९ ::: स्पर्धा : प्रथम क्रमांकाचा लेख

ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुश्रेय’ दिवाळी अंकाने स्पर्धा घ्यायचं ठरवलं. त्यांना असेच कुणीतरी माझे नाव सुचविले, आणि त्यांच्याकडून विचारणा झाली. “ तुम्ही स्पर्धेत भाग घ्यावा असे वाटते. लेख द्याल का आमच्या अंकासाठी.”

मला काय, मी लिहीतचं होते दिवाळी अंकांत, इथेही लिहू म्हंटल. विषय गंभीर, चर्चेचा तसाच  आजच्या युगाचा असा होता. मी माझ्यापरीने सर्वांगाने विचार करून लेख पाठवला. आणि त्याला पहिल्या  नंबरचे बक्षीस मिळाले. दिवाळी अंक संपादक पतीपत्नी दोघीही एकदिवस घरी आले. त्यानंतर अधून मधून लिहित असते, याही दिवाळी अंकात काहीतरी. अंक चांगला असतो हा.

वाचाच हा लेख... वैचारिक आहे.



वंदना धर्माधिकारी







Tuesday, October 20, 2009

12. Playing Cards - Sushrey 2009 Diwali aanka

इसपिक एक्का, बदाम राणी, ऐका पत्तेवाणी!

सुश्रेय दिवाळी अंक – २००९ 




वाचला ना लेख. आहे ना गंमत! पत्ते खेळायला मला खूप खूप आवडते.
आता तर पत्त्यांची शाळा दाखवते इथे.....
“पत्त्यांची शाळा “

मला आवडतं खूप पत्ते कुटायला
पिसून सरसर भरभर वाटायला
मस्तपैकी सर्कन कात्री लावायला
मार कट म्हणता टिचकी मारायला  ..... १.

समोरासमोर बसलेले असतात भिडू
वख्खई बोलता पटकन वळला लाडू
हुकुम लपवा आधी नका फोडू
संपला डाव आता नका ओरडू ..... २.

भिकार सावकार भिडू फक्त दोन
डाव लावायला एकटा देखील पुरे
पाच तीन दोनसाठी हवेत गडी तीन
झब्बुला असतील ते खेळतात सारे ..... ३.

गाढव व्हायला भिणार नाही मी
त्याच्या सारखं ओरडते का कोणी?
झालेला अपमान गिळायला शिकलो
गंमतच गंमत पोट धरून हसलो ..... ४.

नाटे ठोंब म्हणजे माझ्याकडे नाही
जोडी लपवलेली चालणार नाही
कोणाकडे राणी होती आठवत नाही
स्मरणशक्तीची कसोटी होई. ..... ५.

चारी सत्त्या पडल्या खाली
त्यामागे इतरांची पळापळ झाली
मार्कांची बेरेज पटापट केली
बदामसात मध्ये मज्जाच आली ..... ६.

मॅरेज मध्ये जो राजा तीच राणी
लफड्यात इथे अडकतं नाही कोणी
तीनशेसात मध्ये तोंडी बेरीज हुकमी
खाजवून डोके करा उतारी नामी ..... ७.

उचल चल पत्ते ... च्यालेंज माझा
गुलाम म्हणून तू लावलास राजा
चुकीच्या लोकांना लगेच पकडा
आयुष्यभराचा गिरवला धडा ..... ८.

अष्ट एक्का त्रिभुज राजा
सप्त राणी चतुर गुड्डू छकी दश्शी
दुरी नवी आणि पणजी
जादूमंत्र पाठ फसाल तुम्ही ..... ९.  

कधी खेळलो मेमरी, कधी बांधला बंगला,
तर कधी मेंढीकोट खूपच रंगला
कधी रमी मध्ये सिक्वेन्स रिअल
अति महत्वाचा जोकरचा रोल ..... १०.

आपली जागा ओळखून वागेल तो खरा
आपापला आब प्रत्येकाने ठेवलेला बरा
गुलामचोराची जरी असली थोडी भीती
त्याने तर दिली जादू, युक्ती, अन गती ..... ११. 

दोन काळी दोन लाल राजा राणी मोठे
एक्क्याची सत्ता मोठी अजबच वाटे
असली तर असू दे मी दुर्री बिचारी  
हुकुमाची असेल तर कमालच करी ..... १२.

झालं का खेळून पत्ते करा गोळा
सगळ्यांची लाडकी पत्त्यांची शाळा
त्यातूनच शिकलो चांगल वागायला
संस्कार ते काय पत्त्यांशी बोला  ..... १३.           

.............. तेरा कडवी चार ओळी                                        
         तेर चोक बावन्न बरोबर जुळली..........

वंदना धर्माधिकारी

Thursday, October 16, 2008

11. Dilip Prabhawalkar Interview -Sarvottam

एका खेळीयाचे अनेक खेळ - दिलीप प्रभावळकर –
मुलाखत – श्रीसर्वोत्तम दिवाळी अंक २००८

मराठी चित्रपटसृष्टी मधील हरहुन्नरी, लोकप्रिय कलाकार म्हणून आपण सगळेच श्री.दिलीप प्रभावळकर यांना ओळखतो. इंदोरहून त्यांची मुलाखत घेण्याचे सांगितले गेले. त्यानुसार फोन करून वेळ ठरवली. जाण्यापूर्वी त्यांची वेबसाईट बघून गेले. त्यातून बरेच काही मिळाले. प्रत्यक्ष भेटल्यावर आमचा खूप गप्पा रंगल्या.

पहिल्यांदाच सिनेसृष्टीतील एका ज्येष्ठ कलाकाराची मुलाखत घेत होते. दडपण नव्हते, पण दिलीप प्रभावळकरांचे सर्व चित्रपट वा नाटके मी बघितलेली नव्हती. किंवा फारसे काही वाचलेले देखील नव्हते. स्वभाव कसा असेल, नीट बोलतील की नाही असे जरा वाटले. मी ठरवलेले प्रश्न विचारायचेच असे ठरवून गेले होते.
पण, तसं काही झालं नाही. व्यवस्थित मुलाखत घेतली गेली. आणि छापून आलेली त्यानाही खूप आवडली.

आपण आता वाचालचं ती.


वंदना धर्माधिकारी 










Wednesday, October 15, 2008

10. Diwali Aanka 100 years - Sarvottam

शताब्दी दीपांकांची : श्री सर्वोत्तम दिवाळी अंक २००८ :

“दिवाळी अंक” ही मराठी माणसाची गरज, आवड आहे, फराळाची चव आहे. इतकेच नव्हे दिवाळी अंक वाचणे हे त्याचे प्रेम आहे साहित्यावरचे. ती मराठी मनाची मिजास आहे. मिजास म्हणण्या इतके वैविध्य, अविष्कार, साहित्य, काव्य, व्यक्तिमत्वे, विनोद, पदार्थ, दौरे आणि बरेच काही मराठी दिवाळी अंकांतून दरवर्षी मराठी मनाला श्रीमंत बनवीत असते. शतकानुवर्षाचा अंकांचा प्रवास फक्त मराठीत आहे. इतर भाषांनी याचे अनुकरण करून अंक काढायला सुरवात केली, परंतु त्यांची संख्या केवळ बोटांवर मोजण्या इतकीच आहे. आपुल्या ज्ञानियाच्या म्हराठीत मात्र प्रतिवर्षी ५०० हून अधिक अंक निघतात, काही बंदही होतात, तसेच नवीन येतातही. पण एकुणातला आकडा असाच असतो.

दिवाळीच्या विविध पदार्थांच्या चविष्ट चटपटीत गोड फराळा बरोबर दोनचार अंक घरात येतातच. आता, इंग्रजी माध्यमांच्या मम्मी पप्पांच्या घरात कदाचित नसतील येत. त्यांना सांगावेसे वाटते, मराठी आहात ना, घातलं ना मुलांना इंग्रजी शाळेत, मग, निदान दिवाळीच्या सणाला तरी आपल्या भाषेचे काहीतरी वाचायला घरात आणा. तुम्हाला हवे त्या विषयाचे विशेषांक देखील असतात. बालसाहित्य, तरुणाई, वार्धक्य, पर्यटन, आरोग्य, विनोद, बदलते जग, अगदी फक्त इतर देशातील अनुभव, मॉडर्न जीवन, असे एकेका विषयाला वाहून घेणारे वैशिष्ठ्यपूर्ण अंक काढले जातात. अनुभवातून काही शिकायचे असते तेंव्हा इथे तर त्यांची रेलचेल असते म्हंटल तर चुकीचे होणार नाही. दहाबारा अंक वाचल्यावर लक्षात येतील हे बोल.
आपल्याच भाषेचे हे जगा वेगळेपण आपणचं  जतन करायचे आहे. मराठी माणसाचे कर्तव्य आहे असे म्हणावेसे वाटते, त्यासाठी दिवाळी अंक घेत जा, वाचत जा, खूप छान छान अंक येतात.

‘लोकसत्ता – लोकरंग’  मध्ये याच विषयावर माझा दीर्घ लेख आला होता. खूप गाजला तो लेख साहित्यिक विश्वात. काहींनी त्यातला काही मजकूर त्यांच्या दिवाळी अंकांत टाकला होता.
१९०९ मध्ये ‘मनोरंजन’ दिवाळी अंकाने सुरवात केलेली ही साहित्यिक दिवाळी आहे. त्यांचा शताब्दी वर्षात २००८ साली इंदोर येथील ‘श्रीसर्वोत्तम’ दिवाळी अंकात मी लिहिलेला ‘दिपांकांची शताब्दी’ हा अभ्यासपूर्ण लेख जरूर वाचा. आणि हो.... मी सांगितलेले ते... दिवाळी अंक दरवर्षी दिवाळीत घ्यायचे, भेट द्यायचे, वाचायचे, आणि मराठीला वाढवायचे. हे लक्षात ठेवा म्हणजे ठेवा. एकदा याही फराळाची चटक लागली, की म्हणालं, “दिवाळी अंकांशिवाय दिवाळी साजरी केली जात नाही.”


वंदना धर्माधिकारी





Friday, June 20, 2008

9. Mahilashram Highschool - Annual Gathering - Chief Guest

महिलाश्रम हायस्कूल, कनिष्ठ विद्यालय, वार्षिक स्नेहसंमेलन २००७-२००८

कर्वेनगरची कर्वे संस्था, खास महिलांसाठीची म्हणून कायम मनात घर करणारी संस्था आहे. एक लेखिका म्हणून त्या संस्थेशी माझा मधून मधून संबंध येतो. त्यांच्या काही स्पर्धांना मी
परिक्षक म्हणून गेलेली आहे. २००७-२००८ महिलाश्रम हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाची प्रमुख पाहुणी म्हणून मला निमंत्रण आले होते. मी ते आनंदाने स्वीकारले.
सकाळी संस्थेत गेल्यावर अण्णांच्या राहत्या घरात आम्ही नाश्ता घेतला. ती वस्तू होती तशीच ठेवलेली आहे. नंतर सगळे बाहेर येऊन उभे राहिलो. मुलींनी मार्चिंग करीत  सर्वांना सलामी दिली. मस्त वाटले सलामी घेताना.
नंतर मुलीनी भरवलेल्या सायन्स प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आहे. त्यांच्या प्रयोगांची मांडणी, रचना, साहित्य आणि खुद्द भावी शास्त्रज्ञ होऊ इच्छिणाऱ्या मुली. आपला प्रयोग समजावून देत होत्या.
वार्षिक स्नेहसंमेलनातला महत्वाचा भाग असतो “बक्षीस समारंभ”. शाळेतल्या लहान लहान मुलींना समोर बघितल्यावर आपण त्या वयात असताना आपल्या शाळेतले दिवस आठवतात. गंमत वाटते, खूप गप्पा झाल्या त्या दिवशी. मी जे बोलले ते मुलींना आवडले होते. ऐकत होत्या सगळ्या, आणि नंतर दादही चांगली दिली. मलाही समाधान वाटले.

वंदना धर्माधिकारी





Sunday, May 18, 2008

8. 'Aani Mhanunch G' Lokmt Sakhi Manch - Poerty Program

“… आणि म्हणूनचं गं!” : लोकमत सखी मंच कार्यक्रम : १८ मे, २००८

कविता केल्यावर दुसऱ्याला वाचून दाखवायची घाई प्रत्येक कवीला असतेच. तशीच मलाही आहेच. असे आहेत काही प्रथम श्रोता होणारे, ऐकवीत असते त्यांना. खूष व्हायला होतं आपल्या कवितेला दाद मिळाली की!
अशीच एक संधी मला चालून आली. लोकमत सखीतर्फे चिंचवड, मोरे सभागृहात माझ्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम ठरविला गेला. प्रायोजक होते, ‘चंदुकाका सराफ,पुणे’. त्यांनी चिंचवडला शाखा काढली, तेंव्हा त्यांनी प्रायोजकत्व दिले, आणि मी कविता सादर केल्या. नुसत्याच माझ्या मी नाही सादर केल्या, तर तबला पेटी, सिंथ सायझर, गायिका असा सगळा गोतावळा घेऊन मस्त तयारीनिशी दोन तासांचा कार्यक्रम केला. संगीतकाराने नव्याने काहींना चाली लावल्या होत्या, आधी बरीच प्रक्टिस केली होती. त्याने उठावदार कार्यक्रम झाला. सगळ्यांना आवडला होता.
“... आणि म्हणूनचं गं!” माझी बँकेला उद्देशून केलेली कविता. प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असतेच. हे हे असं आहे म्हणून मी तसं करते. तेच या कवितेत मी व्हीआरएस घेताना बँकेला सांगितले होते. माझं असे असे आहे म्हणून मी घरी राहते. त्याच नावाने माझा कविता संग्रह आहे. “… आणि म्हणूनचं गं!”  पुस्तक आलेल्या सर्व महिलांना भेट देण्यात  आले.
मधून मधून अगदी एकटी देखील माझ्या कवितांचा कार्यक्रम मी करते. आवडते मला तेही  करायला.

वंदना धर्माधिकारी



Monday, January 14, 2008

7. Tilgul Gya Nidan Bola tari

तिळगुळ घ्या, निदान बोला तरी! सकाळ : मुक्तपीठ : १४ जानेवारी २००८.

संक्रांत, वर्षाचा पहिला सण! आपले सण, रीतीरिवाज, संस्कार  सारे काही माणसाला माणूस घडविणारे आहेत. म्हणजे इथे कसं. वर्ष सुरु झालं की आधीच्या वर्षातलं काही भांडण असेल तर संपले म्हणायचे आणि तिळगुळ देऊन घेऊन नाते घट्ट करायचे. बोलणं आटत चालले आहे, हे सगळ्यांना चांगलेच जाणवते. पण का म्हणून मी पहिल्यांदा बोलू त्याच्याशी? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. अगदी खरे, माघार कोण घेणार? पहिल्यांदा कोण हसणार, बोलणार. लहानपण मस्त असते, कट्टी नाहीतर लगेच बट्टी. ना आढेवेढे, ना रागरूसवा. मोठे होता होता काय होते समजत नाही. आणि नाती अलग अलग व्हायला लागतात. अगदी तेव्हढ्या पुरते कसेबसे साडे चार शब्दात संवाद संपतो. काय म्हणावे याला?? म्हणून आपले सण साजरे करावेत. निदान वर्षाचा पहिला संक्रांतीचा सण करायचाच करायचा.
“ तिळगुळ घ्या, गोड बोला! “असे म्हणून जर सगळेजण गुण्यागोविंदाने राहू लागले असते, तर हा असा लेख मी लिहिला नसता, आणि सकाळने छापला नसता. बघा, विचार करा... निदान बोला तरी!

वंदना धर्माधिकारी




Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com