आज गुरुपोर्णिमा !
आयुष्यात एकचं गुरु नसतो.!
गुरूंची रांग आपल्याला घडवीत असते !
त्या सर्वांना, काहींच्या स्मृतींना विनम्र वंदन !!
त्यावर रचली गेली तक अभंग रुपी कविता
आयुष्यात एकचं गुरु नसतो.!
गुरूंची रांग आपल्याला घडवीत असते !
त्या सर्वांना, काहींच्या स्मृतींना विनम्र वंदन !!
त्यावर रचली गेली तक अभंग रुपी कविता
वंदन करते, गुरुजना !!
आम्ही भाग्यवान, लाभली मातेची
सावली मायेची, आई तीच !!
प्रत्येक पावली, वटवृक्ष आधार
आम्ही ते निर्धार, बापा संगे !!
मदतीस उभे सारखे पाठीशी
घडता मोडता, ताई दादा !!
मामा मावशी, आत्या काका
भावंडांचा मेळा, नातलगी !!
हे कर ते नको, सांगाया बहुत
शेजारीपाजारी भोवताली !!
घेतला आकार, शाळेच्या मंदिरी
शिक्षण शिदोरी शिक्षकांची !!
लाभले मजसी, अनेक गुरुजी
ज्ञानाची ती ओझी विद्यार्थ्यांची !!
गप्पा दंगामस्ती, ना चाले त्या विना
लपाछपी खुणा, सवंगडी !!
गाण्याची लकेर, चित्रांची रंगोटी’
लोकरीची गाठ कलावंत !!
जे जे ज्याचे पाशी, आवडे मजसी
घेता उचलोनी खुशी ख़ुशी
आयुष्यात लोकं आलीगेली माझ्या
नोंद कोठेतरी केली मीही !!
निसर्ग अमाप देणगी ती दैवी
सदैव शिकवी सर्वांना ते !!
वेडी तरुणाई, घेताना भरारी
भेटे कोणीतरी सांगू नये !!
भेटला संसारी, सासरी नांदते
जीवाचे ऐक्य ते नवऱ्याशी !!
वंशवेलीवरी, मुलेबाळी येता
झालो आम्ही दोघे आईबाबा !!
पुढची पिढी ही होऊनी समृद्धी
आनंद वाटती माझ्या दारी !!
प्रत्येक उंबरी, उलथापालथ
हीच शिकवण दृष्टी देई !!
समाज भोवती, कसा दिसतसे
आपले नाते त्यासी आहे कैसे !!
आयुष्य सुंदर, माथा टेकवता
चुकता माकता देवापाशी !!
चिमुकले हात, श्रीमंती चाखतं
वंदन करीतं गुरुजना !!
©वंदना धर्माधिकारी
गुरुपौर्णिमा
रविवार, ५ जुलै, २०२०
No comments:
Post a Comment