कविता : गणपतवाणी
कवयित्री : सौ.वंदना विजय
धर्माधिकारी
कवीवर्य श्री.बा.सी.मर्ढेकर यांचा
गणपतवाणी परिचयाचा आहे.
गणपतवाणी : गणपतवाणी बिडी पिताना,
चावायाचा नुसतीच काडी,
म्हणायचं अन मनाशीच की,
या जागेवर बांधीन माडी …….
कवीवर्य
श्री.बा.सी.मर्ढेकर यांची क्षमा मागून.....
गणपत वाणी कोठी जाताना
ठेवायाचा कानात अत्तर
म्हणायचा अन तालावरती
प्रेमापायी या पायरीवर
खप्पड गाल अन काळपट काया
बारिक करूनी मिश्कील डोळा
नाकी धरतो अत्तरी फाया
हाती घेऊनी कानातला बोळा
घुंगूरनादी गणपतवाणी
नकोइतकी अत्तर फवारणी
गलिच्छ मुखे केली विनवणी
कोणी ना भेटे प्रेमदिवानी
स्वप्नात वाणी हुंगे अत्तर
कधी चमेली कधी मारवा
रात्र वाण्याची रंगूनी जाई
मुंडी हलवा नवरदेवा
गणपतवाणी बाईलवेडा
गजरा अत्तर यातचं मेला
जीन्यात त्यासी धक्का देता
घुंगूरवालीने उलटाच केला.
वंदना धर्माधिकारी
07-02-2017