Tuesday, February 7, 2017

56. Poem - गणपतवाणी

कविता : गणपतवाणी
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी

कवीवर्य श्री.बा.सी.मर्ढेकर यांचा गणपतवाणी परिचयाचा आहे.

गणपतवाणी :  गणपतवाणी बिडी पिताना,
चावायाचा नुसतीच काडी,
म्हणायचं अन मनाशीच की,
या जागेवर बांधीन माडी …….
 कवीवर्य श्री.बा.सी.मर्ढेकर यांची क्षमा मागून.....

गणपत वाणी कोठी जाताना 
ठेवायाचा कानात अत्तर
म्हणायचा अन  तालावरती
प्रेमापायी या पायरीवर 

खप्पड गाल अन काळपट काया 
बारिक करूनी मिश्कील डोळा
नाकी धरतो अत्तरी फाया 
हाती घेऊनी कानातला बोळा

घुंगूरनादी गणपतवाणी
नकोइतकी अत्तर फवारणी 
गलिच्छ मुखे केली विनवणी
कोणी ना भेटे प्रेमदिवानी

स्वप्नात वाणी हुंगे अत्तर
कधी चमेली कधी मारवा
रात्र  वाण्याची रंगूनी जाई
मुंडी हलवा नवरदेवा

गणपतवाणी बाईलवेडा
गजरा अत्तर यातचं मेला
जीन्यात त्यासी  धक्का  देता
घुंगूरवालीने उलटाच  केला. 

वंदना धर्माधिकारी
07-02-2017

7 comments:

  1. छान विडंबन वंदनाताई 👌

    ReplyDelete
  2. विडंबनाचे अवडंबर. नाही भावले एव्हडे फार मनाला.

    ReplyDelete
  3. काय करणार? गणपतवाणीचं काहीच भावणारे नाही, म्हणून कविताही तशीच वाटली. असो बिचारा गणपतवाणी. धन्यवाद!

    ReplyDelete
  4. गंमतीशीर कविता.. दुसरं काय म्हणू

    ReplyDelete
  5. खरी कविता शाळेत होते आम्हाला... त्यावर टाकले शब्द..धन्यवाद!

    ReplyDelete

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com