इसपिक एक्का, बदाम राणी, ऐका पत्तेवाणी!
सुश्रेय दिवाळी अंक – २००९
वाचला ना लेख. आहे ना गंमत! पत्ते खेळायला मला खूप खूप आवडते.
आता तर पत्त्यांची शाळा दाखवते इथे.....
“पत्त्यांची शाळा “
मला आवडतं खूप पत्ते कुटायला
पिसून सरसर भरभर वाटायला
मस्तपैकी सर्कन कात्री लावायला
मार कट म्हणता टिचकी मारायला ..... १.
समोरासमोर बसलेले असतात भिडू
वख्खई बोलता पटकन वळला लाडू
हुकुम लपवा आधी नका फोडू
संपला डाव आता नका ओरडू ..... २.
भिकार सावकार भिडू फक्त दोन
डाव लावायला एकटा देखील पुरे
पाच तीन दोनसाठी हवेत गडी तीन
झब्बुला असतील ते खेळतात सारे ..... ३.
गाढव व्हायला भिणार नाही मी
त्याच्या सारखं ओरडते का कोणी?
झालेला अपमान गिळायला शिकलो
गंमतच गंमत पोट धरून हसलो ..... ४.
नाटे ठोंब म्हणजे माझ्याकडे नाही
जोडी लपवलेली चालणार नाही
कोणाकडे राणी होती आठवत नाही
स्मरणशक्तीची कसोटी होई. ..... ५.
चारी सत्त्या पडल्या खाली
त्यामागे इतरांची पळापळ झाली
मार्कांची बेरेज पटापट केली
बदामसात मध्ये मज्जाच आली ..... ६.
मॅरेज मध्ये जो राजा तीच राणी
लफड्यात इथे अडकतं नाही कोणी
तीनशेसात मध्ये तोंडी बेरीज हुकमी
खाजवून डोके करा उतारी नामी ..... ७.
उचल चल पत्ते ... च्यालेंज माझा
गुलाम म्हणून तू लावलास राजा
चुकीच्या लोकांना लगेच पकडा
आयुष्यभराचा गिरवला धडा ..... ८.
अष्ट एक्का त्रिभुज राजा
सप्त राणी चतुर गुड्डू छकी दश्शी
दुरी नवी आणि पणजी
जादूमंत्र पाठ फसाल तुम्ही ..... ९.
कधी खेळलो मेमरी, कधी बांधला बंगला,
तर कधी मेंढीकोट खूपच रंगला
कधी रमी मध्ये सिक्वेन्स रिअल
अति महत्वाचा जोकरचा रोल ..... १०.
आपली जागा ओळखून वागेल तो खरा
आपापला आब प्रत्येकाने ठेवलेला बरा
गुलामचोराची जरी असली थोडी भीती
त्याने तर दिली जादू, युक्ती, अन गती ..... ११.
दोन काळी दोन लाल राजा राणी मोठे
एक्क्याची सत्ता मोठी अजबच वाटे
असली तर असू दे मी दुर्री बिचारी
हुकुमाची असेल तर कमालच करी ..... १२.
झालं का खेळून पत्ते करा गोळा
सगळ्यांची लाडकी पत्त्यांची शाळा
त्यातूनच शिकलो चांगल वागायला
संस्कार ते काय पत्त्यांशी बोला ..... १३.
.............. तेरा कडवी चार ओळी
तेर चोक बावन्न बरोबर जुळली..........
वंदना
धर्माधिकारी