श्रीमती पुणे – २००५ : प्रथम
क्रमांक : वंदना धर्माधिकारी
‘दैनिक लोकमत’ मधेही माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले होते. ‘मधुरा’ मधील लेखमाला गाजली होती.
त्यानंतर ‘बँकिंग जिज्ञासा’ पुस्तक नुकतेच
प्रकाशित झालेले. लोकमतने त्याचे परीक्षण छापले होते, आणि सखीची मी सभासदही होते.
सगळं मजेत चालले होते. एक दिवस असाच लोकमत ऑफिस मधून फोन आला. “वंदनाताई आजउद्या लोकमत ऑफिसमध्ये
भेटायला या.”
आणि गेले तर...गंमतचं झाली. तेथील सखी
प्रमुखांनी माझ्यापुढे एक अर्ज धरला आणि ‘वंदनाताई हे भरून द्यायचं. लगेच द्या,
घरी नेलात, तर उद्या आणून द्या.”
“ आहो, पण, मी कधी अशा स्पर्धेत
भाग घेतला नाही. बघितल्या देखील नाही कधीकाळी..... ते ते कॅट वॉक वगैरे कधीच
केलेलं नाही. नको. मी नाही घेत भाग.”
“ नाही....नाही. तुम्ही आम्हाला
पाहिजेत. इतक्या छान छान कविता करता. मस्त कवितेतून करून द्या तुमचा परीचय. तुम्ही
येणार आहात. आम्ही सोडणार नाही तुम्हाला.”
“बरं.. मी उद्या आणून देते.”
“नक्की, मस्त एन्जॉय कराल तुम्ही.
मी सांगते ते ऐकायचं हं. उद्या आणून द्या, आणि हो फोटो पाहिजे हं!”
दोनतीन पानांमध्ये विचारलेल्या
प्रश्नांची माहिती मी भरली. फोटो घेऊन ऑफिसला गेले. “श्रीमती स्पर्धेत सहभाग
घेतला”. बघू या तरी.
मध्ये काही दिवस गेले आणि
स्पर्धेची वेळ जवळ आली. भाग घेतला कि झोकून द्यायचं असतं इतकेच मला माहित होते. प्रथम
लेखी, मग संस्कृत पाठांतर, प्रश्नोत्तरे, असे करतानाच साधारण तीनशे साडेतीनशे पैकी
अनेकजणी गेल्या घरी. मी चालले हळूहळू पुढे. ऐन स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होती.
तिथे आपला महाराष्ट्रीय पोशाख सोडून दुसरा कुठल्याही प्रांताचा, अथवा महाराष्ट्रीय
विशेष पोशाख परिधान करून त्या प्रांताच्या भाषेत आपण काय केले ते सांगायचे होते.
मी बंगाली स्त्री झाले, आणि घोटून पाठ केलेले माझ्या पेहरावाचे वर्णन बंगालीत
बोलून टाकले. मस्त कविता केली माझ्यावरचं आणि झाली ओळख वंदनाची. ...आणखीन बरेच
काही होते. अभिनय होता, गद्य पद्य लिखाण तेही मी माझेचं सगळं निवडून सादर केले. माझीच
कविता चाल लावून गायले मी. अशाप्रकारे आणखीन काही विविध कसोट्या पार करीत शेवटच्या
कसोटीपर्यंत तीन जणींची निवड केली. मग होती फायर राउंड. तीन परीक्षक
प्रेक्षकांच्यात बसलेले. आणि एकामागून एकेक प्रश्नांची सरबत्ती. मीही भराभर मान वळवीत उत्तरे दिली. आणि....तो निकालाचा क्षण आला–
“वरिष्ठ गट, प्रथम क्रमांक वंदना
धर्माधिकारी”
टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या,
आणि...... मला स्टेजवर घेऊन गेले.
तुतारीच्या लहरींनी भरतनाट्य
भारावले. तेव्हढ्यात “भारतमाता” आली, तिने माझ्या हातात तलवार दिली. पुन्हा प्रचंड
टाळ्या वाजत होत्या. बक्षीस देण्यात आलं. खूप काही भेटवस्तू मिळाल्या. अगदी
थाटामाटात समारंभ संपला तसा माझ्याभोवती
आणखीन घोळका झाला. खूप खूप छान वाटलं! आणि श्रीमती पुणे घरी आली. ही देखील माझी
वेगळी ओळख झाली. मस्त वाटतं मला ते आठवले तरी. मी हेही करू शकते जाणवलं. खरं तर
आपल्या आत खोलवर कुठेतरी बरेच काही दडलेले, लपलेले सुप्तावस्थेत पडलेले असते. माझे
तसेच होतं होते, ते असेच एकेक करीत मी बाहेर काढत होते, नाहीतर आतले उफाळून वर येई
आणि मला दखल घ्यावीच लागे. सुंदर सेकंड इनिंग आहे माझी.
तो दिवस माझ्या आयुष्यात खूप वेगळा आनंदाचा झाला,
कारण मी झाले होते..... “श्रीमती पुणे २००५ – वंदना धर्माधिकारी’
----------------------------------------------------------------------------------------------
अलका बापूराव भोमे मी १९७६ साली आले सासरी
विजयची मी वंदना आडनाव धर्माधिकारी .
आहो, सगळंच माझं पुण्यात, आहे मी पक्की पुणेरी
आपला देश, भाषा, संस्कृती याप्रती स्वाभिमान माझ्या उरी
विजयची मी वंदना आडनाव धर्माधिकारी .
आहो, सगळंच माझं पुण्यात, आहे मी पक्की पुणेरी
आपला देश, भाषा, संस्कृती याप्रती स्वाभिमान माझ्या उरी
२८ वर्षे केली मी बँक ऑफ इंडियात नोकरी
२००० साली घेतली VRS , आणि निवांत बसले घरी
घरीच असते, काहीच काम नाही, अधुरी मी स्वप्नपरी.
काय सांगू? माझ्याभोवती गोळा झाला पसाराच भारी
एकेक करता करता माझ्या उर्मिला आली उभारी
“...आणि म्हणूनचं गं!” म्हणतं कवितांचा कार्यक्रम करी
समाजाचे आपण देणं लागतो ही बोचणी सदैव अंतरी
लेखणीतून मांडू लागले माझ्या अनुभवांची शिदोरी
‘बँकिंग जिज्ञासा’
सहा आवृत्त्या लगोलग गेल्या बाजरी
‘Banking Horizon’
तेही त्याचे बरोबरी
‘ऐश्वर्यवती’
लेखमाला, कार्यक्रम आणि श्रीमंतीची तयारी
आईवडिलांना
श्रद्धांजली वंदूनी ‘निरुपण गीते’चे करी
हिरवीगार नाजूक
‘पालवी’ संस्कार शिंपण भरजरी
‘घायाळांची मोट’
एकेक कथा मनाला अस्वस्थ करी
असे घायाळपण
अनुभवले अन कधी दिले कोणालातरी
किती वास्तव, अगदी
हळवे, लेखणी हेलावून सोडणारी
‘मैत्री बँकिंगशी’ फारच आवडले घरीदारी
संगे त्याच्या ‘हिंदी,
गुजराथी आणि ब्रेल’ रुपांतरी
‘मित्रता बँकिंग
से’ पुरस्कार मोठे त्याचे पदरी
दृष्टीहींनांना
ब्रेल पुस्तक असून तेही भेटे ब्रेल रिडरवरी
कधी कविता, कधी
ललित लेख झळकतो कोठेतरी
एका मागून एक
लेखमाला असतात पेपरमध्ये कुठल्यातरी
‘श्रीमती पुणे
२००५’ मोरपीस मागेच खोवलं आहे शिरावरी
आज मैत्री
बँकिंगशी ची अकरावी आवृत्ती ठेवते तुमच्या सामोरी