कविता : चिमणी
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ....कळली ना
चिमणीनं केलं काम
चिमणीनं आणला
दाणा
चिमणीनं गायलं
गाणं
गाण्यावर ताल तू
धरला ना .... धरला ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........१.
चिमणीच्या
हातामंधी
प्रेम माया तेथं
नांदी
हाती भाजी
चिरताना
वरणाला फोडणी तू
घातली ना ..... घातली ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........२.
ऑफिसातून घरी आली
चिमणी पावसात भिजलेली
ओली साडी सो
गॅसवर आधण तू ठेवले ना ..... ठेवले ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........३.
चिमणीला माहेराला
मधून मधून
डोकायला
पिल्लांसंगे
निघताना
तुझं तिकीट
तिच्या संगे काढलं ना ..... काढलं ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........४.
चिमणी आली तुझ्या दारी
लागलं तसं पाणी
भारी
माझं माझं
म्हणताना ना
पुरुषी अहं तुझा
सरला ना .... सरला ना
चिमणीची उडी तुला
कळली ना ..... कळली ना ..........५.
वंदना धर्माधिकारी
१० एप्रिल, २००५.