Monday, July 20, 2020

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by
Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 
Hello,
On 17th July, 2020 I addressed a National Webinar on Banking Career and IBPS exams. SNDT Women's University & TMF SMART Centre, Pune arranged it. This is a right time to start study. Very tough competition is there. For one vacancy 40000 candidates are in a line. Exam. is not very difficult, but it is not easy also. One has to fight for tough fight.
IBPS notification for RRB is already declared and last date for online form submission is 21 July,2000.

Notification for PO will come next month sometime in August,2020 and immediately after notification for clerks will appear in September, 2020. Also, notification for SOs will follow these two.
Friends, exams are approaching and you have to start if not done so far very seriously. Very tough competition to get entry into it. Start serious studies now.
Do listen to this video, you will get guidance for IBPS exams, as well as for entering in banking sector.
Best of Luck!!
Vandana Dharmadhikarhttps://youtu.be/kW4BHfs-lgs





Sunday, July 5, 2020

आज गुरुपोर्णिमा !
आयुष्यात एकचं गुरु नसतो.!
गुरूंची रांग आपल्याला घडवीत असते !
त्या सर्वांना, काहींच्या स्मृतींना विनम्र वंदन !!

त्यावर रचली गेली तक अभंग रुपी कविता


वंदन करते, गुरुजना !!


आम्ही भाग्यवान, लाभली मातेची
सावली मायेची, आई तीच !!

प्रत्येक पावली, वटवृक्ष आधार
आम्ही ते निर्धार, बापा संगे !!

मदतीस उभे सारखे पाठीशी
घडता मोडता, ताई दादा !!

मामा मावशी, आत्या काका
भावंडांचा मेळा, नातलगी !!

हे कर ते नको, सांगाया बहुत
शेजारीपाजारी भोवताली !!

घेतला आकार, शाळेच्या मंदिरी 
शिक्षण शिदोरी शिक्षकांची !!

लाभले मजसी, अनेक गुरुजी
ज्ञानाची ती ओझी  विद्यार्थ्यांची !!

गप्पा दंगामस्ती, ना चाले त्या विना
लपाछपी खुणा, सवंगडी !!

गाण्याची लकेर, चित्रांची रंगोटी’
लोकरीची गाठ कलावंत !!

जे जे ज्याचे पाशी, आवडे मजसी
घेता उचलोनी खुशी ख़ुशी

आयुष्यात लोकं आलीगेली माझ्या
नोंद कोठेतरी केली मीही !!


निसर्ग अमाप देणगी ती दैवी
सदैव शिकवी सर्वांना ते !!

वेडी तरुणाई, घेताना भरारी
भेटे कोणीतरी  सांगू नये !!

भेटला संसारी, सासरी नांदते
जीवाचे ऐक्य ते नवऱ्याशी !!

वंशवेलीवरी, मुलेबाळी येता
झालो आम्ही दोघे आईबाबा !!

पुढची पिढी ही होऊनी समृद्धी
आनंद वाटती माझ्या दारी !!

प्रत्येक उंबरी, उलथापालथ
हीच शिकवण दृष्टी देई !!

समाज भोवती, कसा दिसतसे
आपले नाते त्यासी आहे कैसे !!

आयुष्य सुंदर, माथा टेकवता
चुकता माकता देवापाशी !!

चिमुकले हात, श्रीमंती चाखतं
वंदन करीतं  गुरुजना !!

©वंदना धर्माधिकारी
गुरुपौर्णिमा

रविवार, ५ जुलै, २०२० 


Saturday, July 4, 2020

FOR ALL JOB SEEKERS and THEIR FRIENDS
IBPS NOTIFICATION :: 2020 :: BANK RECRUITMENT EXAMINATIONS
Sakal COMPREHENSIVE GUIDE TO IBPS BANK PO, CLERKS & LIC PRELIM + MAIN EXAM.
Written By : Mrs. Vandana Dharmadhikari, Mr.Santosh Patil, Mr.Krushna Kulkarni, Ms.Vallari Dharmadhikari and Ms. Aamrapali Aurangabadkar.
Price : Rs.300.--. Sakal Publication, Pune : 020 24405678/8888849050
Available with me : Mrs.Vandana Dharmadhikari – 9890623915.
Institute of Banking Personnel Selection (IBPS) has
issued the latest notification for the recruitment of 2020
 Vacancy : 9638 ::: Post Name : Clerk ::: Qualification : Degree
 Location : All Over India ::: Last date : 21.07.2020
IBPS RRB Exam.dates :
• Online Exam Preliminary : Officer I & office Assistants :
August 2020 :: 1,2,8,9 and 16 .
• Single Exam. : Officers Scale II & III : 9th Septembr 2020 .
• Online Exam.Main : Officer Scale I : 13th September,2020.
Office Assistants : 19th September,2020.
IBPS PO Exams.
• Online Exam.Priliminary : 3rd, 4th and 10th October,2020 .
• Online Exam. Main : 28th November, 2020.
IBPS Clerks Exams.
• Online Exam. Preliminary : 12th, 13th and 14th December,2020.
• Online Exam. Main : 24th January, 2021.
IBPS SO Exams.
• Online Exam. Preliminary : 26th and 27th December,2020.
• Online Exam. Main : 30th January, 2021.
Book is available with me
BEST OF LUCK TO ALL APPEARING FOR EXAMINATIONS!
©Vandana Dharmadhikari : 9890623915.
Like
Comment
Share

Tuesday, July 2, 2019

91. Deshonnati 100th article published


सौ.वंदना विजय धर्माधिकारी
दैनिक देशोन्नती : लेखमाला अर्थसंस्कार
लेखांक १०० : “अर्थसंस्कार शताब्दी -१००”
शुक्रवारी : २४-०५-२०१९  







  

दैनिक देशोन्नती मधील पान ४ वरील अर्थसंस्कार लेखमालेतील लेखांची.” आज शंभरी होत आहे. लेखाची शंभरी काही विशेष साजरी करायची नाही. शंभर नंबरवर काहीतरी किमान पाच शंभर शब्दात मांडते असेच काहीतरी.
जून,२०१७ पासून दर शुक्रवारी अर्थसंस्कार मालिकेत बँकिंग विषयाची माहिती देत होते. १०० लेख झालेत, पुढे लिहावे का थांबावे विचारात आहे. बँकिंग विषय एक सागर आहे, लिहावे तितके नवीन मिळत राहते. लेखमालेस उत्तम प्रतिसाद मिळाला. धन्यवाद!


लहानपणी जोरजोरात पाढे म्हणताना “दहावर शून्य शंभर!!” सर्व ताकदीनिशी मोठ्यांदा ओरडायचे असते. पुढे जोरात ओरडायचे,“माझा पहिला नंबर.” असेच दंगामस्ती करताकरता हळूहळू समजायला लागतं की किती जरी काहीही छान चांगले केले तरी आपल्यापुढे त्याहीपेक्षा भरीव आखीव रेखीव कामे करणारे अनेक आहेत. तसे करणे इतर कोणालाही करायला जमणारे नसते. थोरामोठ्यांप्रती प्रचंड आदर मनात गोळा होतो. आदर्श समोर ठेवून मार्गक्रमणा करताना समाजातील ज्येष्ठश्रेष्ठ व्यक्तीच्या कार्याने अनेकवाटा दाखवलेल्या असतात. दिग्गज व्यक्तिमत्व समाजाला आधारस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत असते.  मोठमोठ्या लोकांची चारीत्रे, अनुभव कथन याच कारणास्तव वाचायची असतात. मग, अजिबात म्हणता येत नाही की ‘माझा पहिला नंबर!’

पहिला नंबर नसला तरी आजचा नंबर आहे शंभर. गणितातला अव्वल आकडा १००. शंभर म्हणजे दहावर शून्य, दहाचा वर्ग, दाहीदाही शंभर, सम, नैसर्गिक प्रमुख-प्राईम नंबर. शंभर- शेकडा-शे-शत-शतक-हंड्रेड.

२०१९ वर्ष गदिमा, बाबूजी आणि पुलं त्रयींचे जन्मशताब्दी वर्ष आहे, याची जाणीव मराठी मनाला आहेच आहे. शंभर आकडा अतीव महत्वाचा आहे. “शतायुषी भव!” असा मोलाचा आशीर्वाद दिला जातो. परीक्षा असते शंभर मार्कांची. मग ती कुठलीही असो शाळा कॉलेजमधील नाहीतर आयुष्यातील चढउतारांची गोळाबेरीज करणारी. यश टक्क्यात मोजलं जाते. टक्केवारी म्हणजे १०० पैकी किती गुण मिळाले ते. एखाद्याने खूप छान मोठे काम केले तर सहज शब्द उमटतात, “अगदी शंभर नंबरी काम केलेत आपण.”

‘शंभर नंबरी सोन्याची’ असे एखाद्याचेच  कौतुक होते. अर्थ निघतो व्यक्ती शुद्ध सोन्याची झळाळी ल्यालेली गुणसंपन्न आहे. फार थोड्यांनाच असे कौतुक मिळते, अगदी शंभरात एखाद्याच्याच वाट्याला येते. नाहीतर असतेच शंभरी टोमण्यांची वा शिव्यांची. आता हेच बघा. करू नये असा गुन्हा केलेल्याला शिक्षा ठोठावली जाते, “काही खरं नाही  त्याचं. भरली शंभरी आता.” अगदी लहान मुलांना अभ्यासावरून फराळ दिला जातो, “शंभरवेळा समजावून दिल्यावर देखील कसे डोक्यात शिरत नाही तुझ्या? माठ्या?” भांडण, मग ते कोणाचेही असो, शंभरदा तेचतेच बोलत असतात. आहे ना गंमत.

शंभर पैशाचा एक रुपया १९५७ मध्ये ठरवले गेले. त्याआधी १६ आण्यांचा रुपया होता. भारताचा रुपया तसेच इतर देशांचे चलन, तेही १००च्या भाषेत. उदाहरणार्थ:
१००पैसे = १रुपया : १००सेंट्स = १डॉलर : १००पेन्स = १पौंड : १००सेंट्स = १युरो

३० नोव्हेंबर,१९१७ रोजी प्रथम एक रुपयाची नोट छापली गेली.  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यावर अशोक स्तंभ प्रतिमा दिसू लागली. मध्यंतरी नोटेची छपाई बंद होती. लोकाग्रहास्तव परत  २०१५ मध्ये एक रुपयाच्या नोटा छापल्या गेल्या. ३० नोव्हेंबर,२०१७ रोजी याच नोटेला शंभर वर्षे झाली आहेत.

कशाचेही मोजमाप शंभरात. जागतिक युनिट सिस्टीम मेट्रिक पद्धतीमध्ये शंभर असते.
आपल्या बरोबर ग्रीस, इस्त्राईल, नेपाळ यांच्याहीकडे पोलिसांचा फोन नंबर १०० आहे. शुद्ध उकळत्या पाण्याचे तपमान असते १०० डिग्री सेल्सियस. क्रिकेट खेळात शंभरचे महत्व का सांगायला हवे?  महाभारतात कौरव १०० होते. शिशुपालाचे १०० अपराध झाल्यावर श्रीकृष्णाने भर सभेत सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. असे खूप काही आहे.

अर्थसंस्कारच्या शंभरीच्या निमित्ताने मला आठवण झाली दिवाळी अंकांच्या शताब्दी वर्षात २००८ साली मी मोठ्ठा अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता. “शताब्दी दिपिकांची.” खूप गाजला तो लेख. सहज आठवलं इतकेच.

‘अर्थसंस्कार’ शंभरीत पूर्ण भरला जाणारा नाहीच. पुढेपुढे जाणारच आहे.  कितीतरी अजून लिहायचे  आहे. तरीपण, आजच्या शंभरीच्या निमित्ताने देशोन्नती संपादक, त्यांची सर्व टीम, मोठ्या प्रमाणात लाभलेला अर्थसंस्कारचा वाचकवर्ग या सर्वांना खूपखूप मन:पूर्वक धन्यवाद देते.  आर्थिकविषयक माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटू यात.  


वंदना धर्माधिकारी
M : 9890623915











Friday, March 8, 2019

90 Women's day 8th March 2019



महिला दिन विशेष अतिथी - एन के जी एस बी बैंक, कोथरुड शाखा. 


दैनिक देशोन्नती : लेखमाला अर्थसंस्कार : लेखांक ९० : कर्तव्य अणि हक्कांची सांगड :
शुक्रवार  ८ मार्च, २०१९.


एनकेजीएसबी बैंक मॅनेजर सोबत



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पद्मश्री  : महिला दिन कार्यक्रम :  एम् कॉम विद्यार्थ्यांना लेक्चर :
विषय : महिलांसाठी शासकीय योजना : उल्लेखनीय : एमएसएमई सपोर्ट





 पुणे विद्यापीठात लेक्चर  देताना  : ८ मार्च,२०१९



अगं सखे,

आपला मानाचा कौतुकाचा महिला दिन करू यात आपण साजरा. एखादा दिवस ठेवून दे तू स्वत:साठी. मैत्रिणींच्या घोळक्यात खिदळण्यासाठी, हसता हसता फुलण्यासाठी. तुझा जन्म फुलण्यासाठी आहे, हे तू विसरलीस की काय? खरं आहे ते, कामाच्या जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली तू स्वत:कडे बघतेस कोठे? नाही ना जमतं तुला ते? असं म्हणून कसं चालेल. अगं, तू खूष आनंदी तर तुझं सगळं घर हसेल, नटेल, मजेत राहील. आणि तू जर नाराज तर सांग मला घरात काय होतं. भांड्याला भांड लागतं हे मलाही माहित आहे, पण म्हणून नेहमीच का त्या भांड्यांना भांडू द्यायचं. त्यावर तोडगा काढायची हिम्मत आहे तुझ्यात, ताकद नुसती कष्टाने मनगटात नसते, खंबीर व्हायला आजचा दिवस तुझ्यासाठी    आहे हे तरी विसरू नकोस.

हळूहळू तिला समज यायला लागली स्वत:च्या हक्कांची. सगळीकडे सध्या महिला दिन दणक्यात साजरा होऊ लागला. थोडं इकडे तिकडे बघितल्यावर बदल होताना दिसतो, समाजात महिलांना मान मिळायला लागला आहे. तिच्यातल्या माणूसपणाची ओळख तोही ओळखू लागला, आणि नसेल त्याला त्याची जाणीव तर तीही शहाणी होऊन त्याला त्याची जागा दाखवू लागली. त्यातं काय व कसे हेही तिला समजू लागले. बायका सुधारित आहेत, यात समाजाला गती दिली जाते, प्रगती होते, समाजाची उंची वाढते हे आलेच आहे लक्षात सगळ्यांच्या. असे हे स्थित्यंतर हळू हळू होणारी प्रोसेस आहे. त्याला अधिक गतिमान केले पाहिजे. सकारात्मक  विस्तार  वाढवला पाहिजे. खेड्यापाड्यातली परिस्थिती अजूनही जुनाट वळणाची असायची शक्यता धूसर होताना खूप ठिकाणी जाणवते. तेथील महिलांची हिम्मत, ताकद आणि स्वत्व जपायची जिद्द खरोखरीच वाखाणण्याजोगी दिसते. प्रत्येक गावाचे चित्र वेगळेपण दर्शविते. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. वाईट याचेच वाटते की याच कर्तबगार बायकांना गावात दारूबंदी करा असे फलक घेऊन रस्त्यावर यावे लागते. अशावेळी पुरुषोत्तम देशातले कधी सुधारणार? आपलेच गुणगान कौतुक कधी थांबवणार आणि खर्या अर्थाने माणूस कधी बनणार? यासाठी तिनेच  स्वत:ची जागा निर्माण केली पाहिजे. स्त्रीला फुकट सहज अहसा गोष्टी मिळत नाहीत, हे इतिहास सांगतो. तिला ते सर्व मिळवावे लागते, लढा द्यावा लागतो हक्कासाठी तरच तिला मिळते तिच्याच घरात एखादा हक्काचा कोपरा. देऊ केली जाते  मानाची जागा तिच्या घरी, दारी, मनी, गाभारी. याचसाठी बोलावते मी एकेकीला.

बायांनो, आपल्याला बदल घडवायचा आहे. परिवर्तन दीर्घकाळाची प्रक्रिया होऊ देण्यात स्त्रियांचेच नुकसान आहे. एकेक पिढी त्याच कामातच जर खपली तर कसे होईल? त्यासाठी महिलांनी अधिक जोमाने स्त्रीवर्गात आत्मभिमान रुजवायचा आहे,  बदल घडवून समाजपरिवर्तन करताना डगमगायचे सोडून दिले की सगळं काही छान जुळून येते. खटकते गं एक गोष्ट, सांगतेच, बाईचं बाईची वैरीण असते, ह्या वाक्यातही तथ्य आहेच. त्यामधील हवा काढून टाकायची आणि महिलांनीच एकमेकींचा पाठीशी उभं रहायचे. यालाच जोरात फिरवून गती द्यायची की मग  सगळ्यांच्या आयुष्यात चार चांद लागायला वेळ लागणार नाही.... शेवटी तुझे तुलाच सर्व करावे लागणार आहे, कोणीही तुझ्या समोर उभे राहून तुझ्या हातावर काही ठेवणार नाही.. तर उठ, हो पुढे आणि गोंजारून बघा  स्वत्व तुझ्यातलं. फार छान आहे ते. घे शेजारणीला बरोबर, आणि साद घाल साऱ्या सख्यांना..... तर.... फेर धरला येशील,ओठी गाणे गाशील....

चलं गं सये, महिलादिनी खेळाया
हक्काचा सुदिन साजरा कराया
आपुल्या जीवा कौतुकाचं गाणे गाया
धरूनी हातात हात मन मोकळं कराया
एकमेकी आधाराची साथ संगती द्याया...

किती जरी सांगितले, बोलावले, समजावले  तरी तिला जे रुचेल तेच ती करेल. हे मला ठावूक आहे. माझे हे वाचतील आणि पळतील कामाला. तरीही तिला सांगितल्या शिवाय मला राहवतं नाही हेही खरे. गदागदा हलवून तिला समजावले की मला बरे वाटते. त्यामुळे इथे एकच शेवटचे सांगते आणि थांबते. बाई गं, तुला आर्थिक व्यवहारांसाठी काही अडचण आली तर जिथे मिळेल तिथे, तू वाचीत रहा, त्यात माझी लेखणीही तुला कुठेतरी भेटेल. तुला समजेल असेही मी लिहिले आहे. आणि मी आहे ना तुला मार्गदर्शन करणारी. कधीही फोन करून बोलू शकतेस तू माझ्याशी. सांगीन मी मला जमेल तसे. एकेक करून खूप मोठा फेर धरायचा आहे आपल्या सगळ्या बायकांना. मध्यभागी ध्येय ठेवायचे अर्थसाक्षर होण्याचे.... तर... कोण कोण येणार फेर धरायला, महिला दिनी गाणे गायला.

सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते.


वंदना धर्माधिकारी
८ मार्च, २०१९


Friday, December 14, 2018

89. Marathi Sahitya Sammeln - 11,12,13 Jan.2019


मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ, महाराष्ट्र, पुणे 








Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com