• लेखिका, निवेदिका, कवयित्री • १४ प्रकाशित पुस्तके : ९ बँकिंग विषयी आणि ५ साहित्यिक • १० लेखमाला. नियमित मासिकात लिखाण • ललित, वैचारिक, आर्थिक विषय : मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, पुस्तके • अनेकविध कार्यक्रमांचे निवेदन • कवीसंमेलनात सहभाग, स्वरचित कवितांचे सादरीकरण • श्रीमती पुणे २००५ :संपन्न व्यक्तिमत्व स्पर्धा,वरिष्ठ गट प्रथम पुरस्कार
Friday, December 14, 2018
Saturday, December 8, 2018
88. Loksatta : Nisatalya Kshananche Zaad : Chaturang :
88. निसटलेल्या क्षणांचे झाड! : लोकसत्ता :चतुरंग पुरवणी : शनिवार : ८ डिसेंबर, २०१८
एखादी वस्तू हरवली तर
ती शोधून काढता येते. वेळ लागतो शोधायला. असते अशीच कुठेतरी पडलेली, अडकून बसलेली.
सापडल्यावर खूप आनंद होतो कारण त्यात आपला
अडकला असतो ना जीव. निर्जीव ज्याला आपण म्हणतो त्यातही आपला जिवंत जीवात्मा असा
घट्ट अडकतो. तर मग, ना ज्याला आकार उकार रूप गंध अशा त्या क्षणाचे काय? कसे जातात
कुठे तरी न सांगता सवरता, हळूच चोर पावलांनी आलो असं दाखवतात आणि लुप्त होतात. पटापट
एकेक करीत कितीतरी क्षण घरंगळत जातात, निसटतात एकामागून एकेक. त्यांची लागलेली
चुटपूट जीवघेणी असते. पुन्हा नाही भेटत ते, हळवं मन कासावीस होते क्षणिक त्याच्या
अनुभूतीसाठी. पुसटशी जरी चाहूल लागली तरी जीव मोहरून उठतो हे मात्र अगदी खरं!
छोट्या छोट्या गोष्टी
सरकन गळून जाव्यात, तसेच क्षण कधी निसटतात समजत नाही. हे हरवले, गेले, परत नाही
येणार याची जाणीव मात्र अस्वस्थ करून सोडते. घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत असते
तर कित्ती छान झाले असते? नको तसेही. त्याने तर काळ पुढे गेलाच नसता. तसे बरोबर
नाहीच. जे जे हवे जे मागे गेले त्याच्याच पाठी धावलो असतो आपण सगळेजण. म्हणूनच
निसटलेले क्षण फक्त स्मरायचे असतात. आत खोलवर पडलेले असतात कायमचे विसाव्याला आल्या सारखे. तरीपण काळाची पुटं
चढतात त्यावर आणि त्यांची बोचणी हलकी होतं जाते. नाही मिळालं मला तेंव्हा तर नाही,
काही बिघडलं नाही असं म्हणून मीच माझी समजूत घातली की नवीन काही हासील करायला जोर
येतो.
नंतर गंमत होते. हेच कधीचे कुठले तरी जुने पुराणे सांडलेले, ओढून घेतलेले,
निसटलेले ते एकेक करीत स्वप्नात येतात माझ्या. अगदी खरं... त्यात ‘आईने असे नाही
करायचे, तसे नसते वागायचे, हेच असेच बरोबर ते चूक चूक चूकच अगदी बजावून
सांगितलेले’ देखील आहेत. चिडलेली असते मी, तरी आई ऐकत नाही माझं, तिचं आपलं तेच
असतं, नाही म्हणजे नाही... कधीतरी मी आणि आई दोघीच घरात असताना आई खूप काय सांगते,
त्याने काय झालं, काय होईल ... काहीबाही
असतं सारं काही. त्यावयात फारसं समजायचं नाही. आईला आपली खूपखूप काळजी आहे, याची जाणीव
व्हायची आणि मी आईला बिलगायची. मला पटायचं आईने सांगितलेलं आणि माझ्या नाकावरचा
पुसला जायचा. हरवले काही क्षण आईमुळे पण आईचं ऐकायाचेच हेच बरोबर होतं. असू देत
माझं असं. मला चालतं.
कधी मोठी झाले हे उंची मोजूनही मला नव्हतं समजलं. वरच्या वर्गात गेल्यावर
लक्षात यायचं फळ्यावर लिहिताना हात वरपर्यंत पोचायला लागला ते. तिथेतर किती हरवलं
सांडल होतं. शाळा अकरावी पर्यंत नंतर कॉलेज चार वर्षे. अगणित निसटलेले एकेक क्षण येतात सामोरे. आता हसू येतं
त्यांचे, पण त्या वेळी हवेसे वाटायचे. मी ते सगळे क्षण सुरवातीला एका कंपासपेटीत
ठेवायची. पण
ती लगेच भरली, मग घेतलं जुन दप्तर. लवकरच तेही लहान झालं. आमच्याकडे शेतावरचा
आंबेमोहोर असायचा. त्याचं पोतं घेतलं आणि
कोंबले क्षणांना आत. पोत्याला भोकं होतं हे मी बघितलंच नाही. गेले बाई माझे क्षण
हरवून. कुठे आठवतं बसू. दिलं त्यांना कायमचं सोडून. मारला दाभणाने टाका पोत्याला
आणि एकेक करीत पोती टाकली माळ्यावर. माळाही भरला, आता काय करायचं या
निसटलेल्यांचे? शिवाय मांडलेला संसार म्हंटल की माळ्यावर काय काय ठेवावं लागतं ते
आधी नव्हतं ना माहित. तरीपण, त्यापेक्षा माझे सांडलेले क्षण मोलाचेच होते,
तेंव्हाही आणि त्यातले काही आत्ताही. फरक इतकाच वाटतो, आता त्यांच्याकडे मी
तिर्हाईताच्या नजरेतून बघू शकते. आतलं आंदोलन नाही उमटतं.
मी पडले की हो संसारात. काय काय सोडलं
देवालाच ठावूक. मिळवलं देखील भरपूर काही तरीही निसटणारे होतेच तिथे. काही हळवे,
काही रडके, काही ह्यांचे काही इतरांचे. घरचे दारचे, पाळणाघरातले देखील, काय सांगू
कित्येक क्षण बस मधले देखील आहेत. बस नाही मिळाली तर काय व्हायचं लेटमार्क! त्याचे नकोत का टिपलेले क्षण. गाडी घेऊन किक
मारल्यावर भरधाव पळतानाचे सिग्नलवर दिसलेले, कोणीतरी मागून पुढे गेलेले, जाताना
कानाजवळ जोरात शिट्टी मारलेले. खूप खूप आहेत ठेवलेले. आई झाल्यावर खुलली कळी आणि सारं काही छान छान
वाटू लागलं. गणपती बाप्पाचे विसर्जन करता
करता गेलेले क्षणही दिले मुळामुठा अर्पण. आता तर नातवंड खेळतात मांडीवर तेंव्हा
कशाच्च काहीच वाटतं नाही. ह्यालाच वय वाढलं म्हणावं का? मोठ्ठ घर घेतलं तरी
पोत्यांनी माळे भरले गेलेच. तरी बरं प्रत्येक खोलीत माळे आहेत माझ्या घरात.
हल्ली, बिल्डर्स नाही काढतं माळे. कारण काय, तर ते अडगळीचे नकोच ठेवायला, त्यापेक्षा मस्त इंटिरियर
करून घ्या. बिल्डर माणूसच असतो, त्याला कसे माहित नाही हे गुपित माळ्यांच? कोणीतरी
मागतं असेलचं की ही असली ठेव ठेवायला मला मोठ्ठा माळा हवाच म्हणून. अशावेळी, जास्त
पैसे मागितले की होते पंचाईत. घर घेणे सोपे थोडेच असते, शिवाय त्यात माळा मागितला
तर हजारो जास्तीचे द्यायचे. त्यापेक्षा माळ्यावर टाकायचं ते देऊ यात नदीत सोडून. होतं
असं देखील कधीकधी कोणाच्यातरी बाबतीत. मला तर वाटतं, हल्ली माळे नसलेली घरेच वाढतं
चालली, म्हणूनही असेल की लोकं तुटक वागायला लागली. मोठ्ठ गाठोडेच फेकलं पाण्यात
असेच वाटते. वाड्यासारखी नाही राहिली, जुन्या सोसायटीत देखील माळे असायचे, सावली
होती वाड्यासारखी तिथेही. अजूनही आहे, लागते ना सगळ्यांना मधूनमधून. पण आता तेही
नाहीत, म्हंटल्यावर काय होणार? एक माझी शंका अशीही.
धो धो कोसळतात हेच
निसटलेले निसरड्या मनातून खाली. मी एकटी असते, मस्त मूड असतो तेंव्हाही येतात, आणि
मी नाराज असते त्यावेळेला देखील डोकावतात हळूच. यायचं असतं पुढे हेच खरं. बोलवायला
का लागतं त्यांना. आतल्या खोलीतल्या दाराच्या आडून हॉलमध्ये नाहीतर ओट्यापाशी मी
असेल तिथे वाकून बघायची सवयच असते त्यांना. जित्याची सवय मोडता येत नाही, तर मग
यांची ती मी काय मोडणार? एखादं झाडं तयार करावं याच निसटलेल्या क्षणाच असं मनात
आलं. त्याच रात्री घराच्या गच्चीवर भला मोठा चौकोनी वाफा करून झाड करायला लागले.
मी एकटीच हं, नको मला कोणाची लुडबुड. फक्त माझे हरवलेले क्षण तिथे लावणार, इतरांना
काय त्याचे? कितीही वाढू देत त्यांची
उंची, कोणी काही म्हणणार नाही की जागा मोकळी करून दे असा दट्ट्या लावणार नाही.
आठवून आठवून अशा निसटलेल्यांना लटकवल की मी तिथे, गच्चीवरील झाडावर. मोठमोठ्या झुंबरांना कसे रंगीबेरंगी लोलक लटकवतात
ना तसेच लोंबणारे हलणारे डोलणारे ते क्षण चकाकतात मस्त पैकी. माझं झाड तसं सरळसोट
नाही त्या उभ्या ख्रिसमस्ट्रीसारखं. तर वेगळं मस्त डौलदार, गोलाकार, सावली देणार आहे. खोडाला टेकून
उभं राहायचं आणि वर बघायचं तर आकाश फटीतून दिसतं इतकं गच्चगुच्च भरून केलं लगेच.
किती काय लोंबत आहे खाली, मला खुणवतं, त्यांना झाड आवडलं असेच मला वाटतं. नाहीतर
बसले असते का ते निसटलेले क्षण गपगुमान झाडावर. पुन्हा खाली घे आणि होतं तिथेच ठेव
असा हट्ट् केला असता. मस्त नाचले मी एकटीच
माझ्या झाडाभोवती.
तुम्हाला दाखवीन
कधीतरी. आता हेच बघा ना, मला लिहावं लागलं
हे सगळं. गेला की नाही निसटून मनातला क्षण. जवळ असतात तर बडबड नसती का केली मी. खूप
हसलो असतो आपण सगळेजण. त्यासाठी तरी यायलाच पाहिजे एकत्र. बसले टपटप टाईप करीत
लॅपटॉपवर. नेहमी नाही असं बडवत बसणार. मग, माझे क्षण कमीकमी होतील की. आधीचे सगळे
गेलेत झाडावर. नवीन हवेत मला. माझा ठेवा आहे तो लाडाचा. आत्ता मात्र जाऊ दे म्हणून
देते सोडून. असं असलं तरी तुम्ही येणार
नक्की माझं झाड बघायला. आणि नाही आलात तर मी काय करीन सांगू. आपण एकत्र गप्पा
मारतोय याच निसटलेल्या क्षणांना मी झाडाला टांगणार आणि त्याभोवती परत गिरकी घेणार.
वंदना धर्माधिकारी
Subscribe to:
Posts (Atom)
Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020
vandanadharmadhikari.blogspot.com
-
“ ऐश्वर्यवती” : सकाळ – मधुरांगण कार्यक्रम – ४ जुलै, २००७ “ ऐश्वर्यवती” सकाळ मैत्रीण मधील आठवडाभर दररोज एक अशी वर्षभर चाललेली एक लेख...
-
नुक्कड – फेसबुक पेजवर १९ मार्च,२०१८ रोजी कथा टाकली होती. https://www.facebook.com/groups/1224596050970011/permalink/1640101162752829 ...
-
प्रभात दिवाळी अंक २०१६ ::: कथा : एक जड पारडं लेखिका ::: सौ . वंदना विजय धर्माधिकारी रुपाली घुटमळत होती घरात. कसं आईला ...