94 Deshonnati 50 article educational loan
स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट, २०१५ रोजी “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम” सरकार ने घोषित
केला. कौशल्य विकास आणि मेक इन इंडिया ह्या सरकारच्या योजनांना नजरेसमोर ठेवून जास्तीत जास्त भारतीय युवकांनी
यामध्ये सहभागी व्हावे त्यासाठी त्यांना आवश्यक ते शिक्षण घेताना आर्थिक मदत
मिळावी. या उद्देशाने नवीन पोर्टल सुरु केले. गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना
उच्च दर्जाचे त्यांच्या आवडीचे शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, त्यासाठी
त्यांना आर्थिक मदत करू शकणारी ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. सरकार कडून
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती तसेच बँकातर्फे शैक्षणिक
कर्ज रूपाने मदत घेण्यात यामुळे सुलभता आणली गेली आहे. भारत सरकार, अर्थ मंत्रालय, मानव संसाधन विकास
मंत्रालय, उच्चतर शिक्षा विभाग, भारतीय बँक संघ (Indian Bank’s
Association – IBA) आणि NSDL - e governance सर्वांनी मिळून “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी
कार्यक्रम” साठी तयार केलेले पोर्टल आहे www.vidyalakshami.co.in.
NSDL - e governance द्वारा
सरकारच्या योजना राबविणे, त्यामध्ये पारदर्शकता ठेवणे, विविध सुविधा पुरविण्यात
येणाऱ्या अडचणींवर मात करणे, योग्य लाभार्थीनां फायदा मिळवून देणे, संपूर्ण
नियंत्रण ठेवणे, समस्या निवारण करणे, अशी सर्वतोपरी जबाबदारी घेतली जात आहे. जास्त
माहितीसाठी www.egov-nsdl.co.in या वेबसाईटला भेट द्यावी.
वरील पोर्टल वर
जाऊन विद्यार्थी आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर देऊन
आपले रजिस्ट्रेशन करून शकतो. भारतीय बँक संघ (IBA) यांनी तयार
केलेला सर्व बँकेचा एकत्रित असा कर्ज अर्ज फॉर्म ( CELAF –
Common Education Loan Application Form) भरायचा असतो. पत्त्याचा दाखला, स्वत:चे आधार कार्ड, आय डी प्रुफ, कॉलेजमध्ये
प्रवेश मिळाच्याची नोंद , पैसे भरल्याची पावती, बँक खाते नंबर अशी माहिती
भरायची. आपल्या
ग्राहकास जाणा – केवायसी प्रक्रियेच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे स्कॅनकरून पाठवायची असतात. अटींना मान्यता
दिल्यावर शिष्यवृतीसह शैक्षणिक कर्ज उपलब्धता पोर्टल दर्शविते. कर्ज कुठल्या
कुठल्या बँकांकडून घेता येते त्या बँकांची यादी बघायला मिळाल्यावर तीन पर्याय
निवडता येतात. प्रत्येक बँकांच्या शैक्षणिक कर्ज योजनेनुसार पुढील कर्ज प्रकरण
कर्ज अर्ज तपासणी व मंजुरी केले जाते.
विद्यार्थ्याने
भरलेला अर्ज एनएसडीएल तर्फे त्या त्या बँकेमार्फत ज्या भागात विद्यार्थी राहत
असेल, अथवा त्याने नमूद केलेल्या बँकेच्या विशिष्ट शाखेकडे अर्ज पाठविला जातो.
त्या बँक शाखेच्या CAPS – Credit
Automation Processing System वर सर्व
पाठविल्यावर पुढील प्रक्रियेसाठी अर्जदार विद्यार्थ्याला बँकेत बोलावले जाते. या
पोर्टलवरून कर्ज मिळाल्यास शैक्षणिक कर्जासाठीची सबसिडी दिली जात नाही. ही विद्यार्थ्याच्या
सोयीसाठीची एक खिडकी योजना (singal window) आहे.प्रत्येक बँकेची कर्ज योजना थोड्याफार
फरकाने एकसारखी आहे. काही फरक असू शकतो. ढोबळमानाने पुढील मुद्धे महत्वाचे आहेत.
:-
कर्ज मंजुरी ::
भारतात शिक्षणासाठी : जास्तीतजास्त १० लाखापर्यंत,
परदेशात शिक्षण घेणार असल्यास २० ते २५ लाखांपर्यंत
मार्जिन ::
कर्जदाराचा सहभाग : ४ लाखापर्यंत – ०%
पुढे – भारतात शिक्षण –
५% ते १०%
परदेशात शिक्षण – १५% ते २०%
कर्जदार ::
विद्यार्थी, सहकर्जदार :: आईवडील, पालक,
परतफेड :: १)
संपूर्ण शिक्षण झाल्यावर सहा महिन्यांनी वा नोकरी लागल्यावर लगेचच.
२) शिक्षण चालू असताना दरमहिन्याला लागणारे व्याज भरल्यास काही बँकांकडून
व्याजदरात ०.०५% सवलत
३) शिक्षण पूर्ण होई पर्यंत ठराविक दराने दरमहा सरळ व्याज
विद्यार्थिनींना
विशेष सवलत :: ०.०५ ते १ % व्याजदर कमी
सबसिडी :: ४
लाखांपर्यंतच्या कर्ज प्रकरणास काही खात्यांमध्ये सबसिडी देण्यात येते.
परंतू, “ प्रधान मंत्री विद्या लक्ष्मी
कार्यक्रम – एनएसडीएल पोर्टल” वर अर्ज नोंदणी
केल्यास सबसिडी मिळत नाही.
तारण :: बँक
ठेवपावत्या, केवायसी, एनएससी, घर-बंगला-फ्याट, सरकार बॉंड,
विद्यार्थ्याचे
पालक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर कर्ज प्रकरणात त्यांना व्याज उत्पादन योजनेच
फायदा घेता येतो. मानव संसाधन विकास मंत्रालय कडून व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण
यासाठी कर्ज घेता येते. यामधील बरेचसे कोर्सेस अल्प कालावधीसाठी असतात. ६ महिने/१
वर्ष अशा काळात शिक्षण घेऊन नोकरी देखील लागू शकते, अथवा व्यवसाय काढता येतो.
प्रमुख तारण ::
विद्यार्थ्याची गुणवत्ता, प्रामाणिकपणा, चिकाटी, ध्येयाप्रती निष्ठा, कष्ट, जिद्द,
झेप. कर्ज प्रकरण करताना अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. त्याचा स्वतंत्र विचार
करावा.
ही सर्व
प्रक्रिया चालू असताना आपला अर्ज कुठ पर्यंत आलेला आहे, त्याचा प्रवास तपासता
येतो.
अधिक माहितीसाठी
पुढील ठिकाणी संपर्क साधता येतो.
मुंबई : फोन
नंबर : 022 24994200/
022 24976351
तमाम सर्व विद्यार्थ्यांनी याचा जरूर जरूर लाभ घ्यावा. शुभेच्छांसह!
वंदना
धर्माधिकारी