25-03-2017
लोकसत्ता – अर्थसाक्षरता
अर्थसाक्षरता लेखाला
लोकमत दैनिकातर्फे पत्रपंडित पद्मश्री पां.वा.गाडगीळ पुरस्कार जाहीर झालेला आहे.
बहुतेक डिसेंबर,२०१८ मध्ये पुरस्कार वितरण असेल, असे समजते. आर्थिक विषयाच्या
लेखांना देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार समजला जातो. तोच मला आत्ता दुसर्यांदा
मिळतं आहे. एकुणातच आर्थिक विषयाच्या लेखणीस पुरस्कार फार कमी आहेत. असो.
पहिला पुरस्कार १६
डिसेंबर, २०१५ रोजी नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते मी स्वीकारलेला आहे.
धन्यवाद!
वंदना धर्माधिकारी
लोकमत पद्मश्री पां.वा.
गाडगीळ पुरस्कार प्राप्त लेख
दैनिक लोकसत्ता –
अर्थसाक्षरता
लेखिका : सौ.
वंदना विजय धर्माधिकारी
(या अर्थसाक्षरता
लेखाला लोकमत दैनिकातर्फे पत्रपंडित पद्मश्री पां.वा.गाडगीळ पुरस्कार जाहीर झालेला
आहे. बहुतेक डिसेंबर,२०१८ मध्ये पुरस्कार वितरण असेल, असे समजते. आर्थिक विषयाच्या
लेखांना देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार समजला जातो. तोच मला आत्ता दुसर्यांदा
मिळतं आहे. एकुणातच आर्थिक विषयाच्या लेखणीस पुरस्कार फार कमी आहेत. असो.
पहिला पुरस्कार १६
डिसेंबर, २०१५ रोजी नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते मी स्वीकारलेला आहे. )
अर्थ म्हणजे पैसा जो बँकेच्या
माध्यमातून फिरत असतो. बँकिंग जाणकारास पैसा हाताळणे बऱ्यापैकी समजते. याची कसोटी
नुकतीच घेतली गेली. प्रत्येकाला धावपळ करावी लागली, पैशाचे गणित वेगळ्या प्रकारे
सामोरे आल्याने काहींना आनंद झाला, काहींना सांभाळणे अवघड गेले. कस लागला तो लोकांच्या
अर्थसाक्षरतेचा. आम्हा बायकांना काय कळते, काय नाही याचासुद्धा. बँकिंगची जाण
बायकांना कितपत आहे हे तिलाही समजलं आणि इतरांनाही.
८ नोव्हेंबर, २०१६ रोजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चलनातील पाचशे-हजारच्या नोटा रद्द घोषित केल्या. चलनी नोटांचे विमुद्रीकरण अशा प्रचंड धाडसी
निर्णयाने काही काळ गडबडीचा, गोंधळाचा गेला. खात्यात पैसे आहेत तरीही चलनाचा तुटवडा,
एटीएम्सच्या रांगा, रोख रक्कम नाही. व्यवस्थित करायला काहीना जमलं, काहींची पंचायत. डेबिट/एटीएम/क्रेडीट कार्ड कधीच वापरले नाही. साधे चेक बुक देखील घेतलेले नाही. आता बोला? प्रसंगावधान
सांभाळून सरकारी नियोजन होते. यामध्ये बायकांची कुचंबणा निराळीच. अडीअडचणीला
घरातल्यांना-घराला बाई कशी सांभाळून घेते याचा गौप्यस्फोट तिला करावा लागला. तिने
बाजूला ठेवलेली पुंजी उपडी करावी लागली. अर्थात, तिला त्यातही मार्कस द्यायला
पाहिजेत. किती मार्कस हे अलहिदा.
मानवी जीवनात पैशाचे अनन्यसाधारण महत्व असूनही बायका बँकिंग समजून घेत नाहीत. फुली तिथे सही करण्यातच
फुलाबाईची धन्यता. समाजात प्रचंड वैविध्य असल्याने सर्वांचे मूल्यमापन एकाच
पट्टीने केवळ अशक्य असते. बायकांचे तर
त्याहून अशक्य. ‘नंबर एकच्या आतल्या गाठीच्या, कसे पैसे गोळा केले समजणार नाही.’ ‘बायकांच्या
मनात काही राहत नाही, मनात आलं की बोलून जातात.’ दोन्ही विरोधी वाक्ये असली तरी
एकाच बाईच्या बाबतीत खरी असल्याने तिचे गणित सोडविणे अवघडच.
किती टक्के बायकांची खाती आहेत? त्या अर्थसाक्षर
आहेत? प्रश्न विचार करण्याजोगा आहे. ‘बायकांचे-अर्थज्ञान’ विषयच अनेकांच्या चेष्टेचा.
खरं पाहता बायका व्यवहार सांभाळून उत्तम
आर्थिक नियोजन करू शकतात. देशाचा सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी महिलांच्या
कौशल्याचा वापर केला पाहिजे. स्त्री अर्थसाक्षरते पाठोपाठ घर सुधारते. जसजसा परिपक्वतेने निर्णय
घेणाऱ्या महिलांची संख्या अधिक आर्थिक सहभाग
वाढेल तशी देशाची प्रगती निश्चितच वाढेल.
महिलां बचत करतात, परंतु पैशाची वृद्धीसाठीच्या योजनांनुसार गुंतवणूक करायला सरावलेल्या असतीलच असे नव्हे. पुरुषप्रधान संस्कृतीत कौटुंबिक आर्थिक
व्यवस्थापनात महिलांचा सहभाग अल्प प्रमाणात असल्याने आर्थिक सक्रीयता कमी. स्वावलंबी आणि अत्मभानी होण्यासाठी महिलांनी
आर्थिक गोष्टीत लक्ष घालून पार्श्वभूमी, जोखीम, लाभ, फायदेतोटे, भविष्य आणि आपापली
कुवत यांचे त्रैराशिक मांडावे. कुठल्याही प्रकारचे व्यवहार करताना बारकाईने बघावे,
चुकल्यावर होणारे नुकसान सोसावे लागते. काही उदाहरणांवरून समजून येईल. जिथे
खबरदारी घ्यायला पाहिजे ती घेतलीच पाहिजे. अन्यथा???? वाईटात वाईट काय होईल, किती
नुकसान होईल याचा अंदाज बांधणे चांगले
असते. यालाच जोखीम म्हणतात. त्यालाच बायका तयार नसतात, स्वत:चे उत्पन्न असोनसो, जोखीमिची टाळाटाळ.
काळानुसार त्यातही बदल होताना दिसतो आहे.
१.
लग्नानंतर सुमाचे व नवऱ्याचे दोघांचे संयुक्त खाते काढले. माहेराहून मिळालेली सर्व रक्कम खात्यात जमा केली. तिनेही विश्वासाने दिली.
सासूसासरे दोघांच्या नावाने बँकेत सुरक्षित जमा कक्ष होता. त्याच लॉकरमध्ये तिचे
सर्व दागिने ठेवले. मधूनमधून तो तिला पैसे द्यायचा. सणासुदीला सासूबाई दागिनेही
आणून देत असतं. वरवर सगळं छान दिसतं असलं तरी आत खूप काही शिजत होतं. त्याने खाते
वापराची सूचना `F or S – Former or Survivor म्हणजे जो पर्यंत तो हयात आहे तोपर्यंत त्याच्या सहीने आणि त्याच्या पश्चात
तिच्या सहीने खाते वापरले जाईल. दोनचार वर्षांनी
लग्नाला जाताना दागिने पाहिजेच, तेंव्हा आधीच्या सारखेच नकली दागिने तिला दिले.
तिच्या ते लक्षात आले. खुषी समाप्त.... पुढे काय???
२.
पन्नाशीच्या नंदाताईनी मुलीच्या बाळंतपणासाठी पैसे गोळा केले. मुलाची लक्षणं
ठीक नाहीत. घरात पैसे नकोत म्हणतं बँकेत खाते काढून जमा केले. पासबुक, चेकबुक, सही
करून ठेवलेले चेक्स एकत्रित ठेवले कपाटात. दिवस भरलेल्या पाहिलंटकरणीला घेऊन
दवाखान्यात जाताजाता पैसे काढू म्हणून बँकेत आल्या. बघतात तो पंचवीस हजाराचे पाचशे
झालेले. रडारड, आडलेली लेक, आणि पुढ्यात???? जुनी व्हाऊचर काढून बघितलं तर मुलाने
पैसे काढलेले दोनतीन वेळा दिसले. तेंव्हा बँकेतल्याच लोकांनी त्यांना पैसे देऊन
मदत केली. ‘लवकर मुलाची तक्रार पोलीस चौकीत करा’, बँकेने सांगितले. पण, बाईने चौकी गाठली नाही.... पोरगा ना
तो..पुढे काय???
पुढे काय? दोन्ही घरी व्हायचे होते ते झालेले. पुढे नुकसान, मनस्ताप, कुचंबणा,
बोलती बंद, धाक, मार, +++ बँकेने काहीही चुकीचे केलेले नसते, तिथे तक्रारीला जागा
नाही. इथे त्या दोघींनी काही गोष्टी नीट काळजीने केल्या असत्या तर ही परिस्थिती
आली नसती.
इथे – सुमाने खाते काढतेवेळी बँकेत खाते
वापराच्या सूचनांचा अर्थ समजून उमजून सूचना द्यायची होती. जातीने बारकाईने
लक्षपूर्वक नवरा काय करतोय बघायला हवे होते. काही लाखो रुपये खात्यात तिचे. तिला मात्र पाच दहा
हजार देऊन उरलेले सगळे उडविले. आपल्या दागिन्यांसाठी वेगळा लॉकर स्वत:च्या नावावर
घ्यायला हवा होता. तसा आग्रह धरायचाच. इतरेजन म्हणतील त्याला मान डोलावली. चुकली.
लुबाडली गेली.
तसेच –
नंदाताईना फक्त खाते काढायचे ठावूक. परंतु त्याची काळजी घेणे नाही. चेक सही करून
ठेवायचे नसतात, शिवाय चेकबुक पासबुक एकत्र कोणाला मिळेल असे ठेवू नये. हे कुठे
माहित? कष्टाने साठवलेली रक्कम गेली, पुन्हा बाळंतपणाच्या खर्चाची विवंचना लागली.
सगळाच मनस्ताप. पोरगा उनाड. ही दोनचं
उदाहरणे खूप बोलकी आहेत. दोन्हीकडे अर्थसाक्षरता अभाव.
यावरून सगळ्यांनीच शहाणपण घ्यावे. यासाठी वरचेवर विविधप्रकारे बँकिंग व्यवहार
करावेत. सुमाने खाते काढतानाच बचत खात्यावर डेबिट/एटीएम/क्रेडीट कार्ड केवळ
स्वत:साठी घ्यायला हवे होते. वापरायची रक्कम अधिकांश ठेवून कार्ड वापर वरचेवर
करायला पाहिजे होता. तसेच, एखादे पाच/दहा हजाराचे रिकरिंग फक्त तिच्या नावावर
काढायला हवे होते. त्याचा हप्ता याच खात्यातून घेण्यासाठी तशा सुचना बँकेला
द्यायला हव्या होत्या. शिवाय एकदोन लाख खात्यात ठेवून उरलेली रक्कम मुदत ठेव
एकटीच्या नावाने करायला हवी होती. रिकरिंग/मुदत ठेव खात्याचे नामांकन नवऱ्याचे
नावे न करता माहेरच्यांपैकी कोणा एकाच्या नावाने करायला हवे होते. त्यांनी सुमाला
दिलेले पैसे आहेत. समजा काही झालं तर ते त्यांना मिळतील, नवरोबाला कशाला लगेच?
वंदना धर्माधिकारी
M : +919890623915
लोकमत पां.वा.गाडगीळ
द्वितीय पुरस्कार दुसऱ्यांदा मिळत आहे.
लोकमत राज्यस्तरीय
पुरस्कार योजना २०१६-२०१७ : २९ ऑक्टोबर २०१७ पान : ५ :
१ ऑक्टोबर, २०१६ ते ३०
सप्टेंबर, २०१७ कालावधील लेख पाठवणे
१.
लोकसत्ता :
चतुरंग : २५ मार्च,२०१७ : लेख – अर्थसाक्षरता
२.
दि महाराष्ट्र
अर्बन कॉ-ऑपरेटीव्हा बँक्स फेडरेशन, लि. मुंबई :
नागरी बँक
वार्तापत्र : एप्रिल ते जून, २०१७
लेख :
विमुद्रिकरण, कॅशलेस बँकिंग आणि पर्यायी माध्यमे
पान क्रमांक :
२४,२५,२६,२७,२८ आणि २९
पुरस्कार मिळाल्याची
बातमी : लोकमत – १२ फेब्रुवारी २०१८ : पान ६