पी सावळाराम यांचे गीत, वसंत प्रभू संगीतकार आणि
लता मंगेशकरांचे अजरामर गीत... एखादे गाणे खूप वेळ मनात रेंगाळल की
लता मंगेशकरांचे अजरामर गीत... एखादे गाणे खूप वेळ मनात रेंगाळल की
मला
वाटतं ते घुसळलं जातं. जसं ताकातून लोणी येतं वर, तसेच त्याच्यासारखेच
तरी
आपले वेगळे अस्तित्व दाखविणारे दुसरे गाणे बाहेर डोकावते. खूप आनंद होतो
अशावेळी
आपलीच रचना पुन्हा पुन्हा गाताना.... असेच झाले एक गाणे कोजागिरीला.
हृदयी जागा तू अनुरागा,
प्रितीला या देशील का, देशील का, देशील का .....!ध्रु!
या चालीवर माझे शब्द. खास कोजागिरी निमीत्त.....
कोजागिरीचे दोन खिलाडी :::::
आभाळीच्या पूर्ण चंद्रमा
शीतलता तू देशील का, देशील का, देशील का !ध्रु!
कोजागर हा जागर झाला
नाजूक चांदणी लज्जित बाला
चंदाराजा आतुरलेला
जवळी तिजला घेशील का, घेशील का, घेशील का .... १.
नभआंगणीचे दोन खिलाडी
शुभ्र चांदणे तो नावाडी
पौर्णिमेच्या मुहूर्त समयी
तुझ्या घरा तिज नेशील का, नेशील का, नेशील का .... २.
दोन जीवांचे हितगुज वेडे
शांत निर्झरी चमचम दौडे
धरा नभाचे अमूर्त मिलन
ढगाआड चंदा जाशील का, जाशील का, जाशील का ... ३.

वंदना
धर्माधिकारी
कोजागिरी पोर्णिमा :::: गुरवार, ५ ऑक्टोबर २०१७!
कोजागिरी पोर्णिमा :::: गुरवार, ५ ऑक्टोबर २०१७!