महाराष्ट्रातील कॉलेजेसची अंतर्गत इंग्रजी डिबेट स्पर्धा :
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे : २०१०
महाराष्ट्र राज्य कॉलेजेस मधील डिबेट स्पर्धा दोन दिवस ६ आणि 7 फेब्रुवारी, २०१० रोजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे आयोजित
केली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मी आणि इंडियन एक्स्प्रेस संपादिका आम्हा
दोघींना निमंत्रण होते. स्पर्धा अतिशय टफ झाली. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयात
खूप विविधता होती. आम्ही जरी जज्ज म्हणून होतो, तरी त्यापैकी बरेच विषय दोघींनाही
नवीन होते. मुलांची बुद्धी, प्रेझेन्टेशन, वक्तृत्व, सभाधीटपणा सर्वच विशेष
कौतुकास्पद होते. अतिशय उत्कृष्ट तयारी करून सगळे आले होते. त्यांच्यात नंबर लावणे
आम्हा दोघीनच अवघड गेले होते.
स्पर्धा झाल्यावरचे चित्र अधिक उत्साह देणारे होते.
सगळेजन एकमेकांशी दुसर्याच्या विषयात इंटरेस्ट घेऊन विचारीत होते. चौकशी करीत
होते, गप्पा रंगल्या होत्या. खूप चांगला अनुभव तिथे आला. पुढची पिढी हुशार आहे,
याची तिथे खात्री झाली म्हंटल तरी चालेल.
वंदना धर्माधिकारी