तिळगुळ घ्या, निदान बोला तरी! सकाळ : मुक्तपीठ : १४ जानेवारी २००८.
संक्रांत, वर्षाचा पहिला सण! आपले सण, रीतीरिवाज, संस्कार सारे काही माणसाला माणूस घडविणारे आहेत. म्हणजे
इथे कसं. वर्ष सुरु झालं की आधीच्या वर्षातलं काही भांडण असेल तर संपले म्हणायचे
आणि तिळगुळ देऊन घेऊन नाते घट्ट करायचे. बोलणं आटत चालले आहे, हे सगळ्यांना
चांगलेच जाणवते. पण का म्हणून मी पहिल्यांदा बोलू त्याच्याशी? हा प्रश्न अनुत्तरीत
राहतो. अगदी खरे, माघार कोण घेणार? पहिल्यांदा कोण हसणार, बोलणार. लहानपण मस्त
असते, कट्टी नाहीतर लगेच बट्टी. ना आढेवेढे, ना रागरूसवा. मोठे होता होता काय होते
समजत नाही. आणि नाती अलग अलग व्हायला लागतात. अगदी तेव्हढ्या पुरते कसेबसे साडे
चार शब्दात संवाद संपतो. काय म्हणावे याला?? म्हणून आपले सण साजरे करावेत. निदान
वर्षाचा पहिला संक्रांतीचा सण करायचाच करायचा.
“ तिळगुळ घ्या, गोड बोला! “असे म्हणून जर सगळेजण गुण्यागोविंदाने राहू लागले
असते, तर हा असा लेख मी लिहिला नसता, आणि सकाळने छापला नसता. बघा, विचार करा...
निदान बोला तरी!