04-09-2007
बँकिंग जिज्ञासा आणि Banking Horizon
लेखिका : सौ.वंदना विजय
धर्माधिकारी
बँकिंग लिखाणाला सुरवात झाली ती सकाळ मधुरा पुरवणीतून. २००४ साली ‘ओळख
बँकिंगशी’ लेखमाला खास महिलासाठी असलेल्या
मधुरा मध्ये प्रसिद्ध झाली. अनेक घराघरात मी पोचले. वाचकांचे फोन यायला लागले. त्यांच्याशी
बोलताना मला काहीतरी वेगळं केल्याचा आनंद वाटू लागला.समाजाला जे काही हवे आहे ते
कदाचित मी देऊ शकेल असाही विचार डोकावू लाग बँकिंग जिज्ञासा’ ला. आज तेच होत आहे,
मी सातत्याने करीत आहे. त्यानंतर त्याचे
पुस्तक काढायचा विचार केला आणि बँकिंग जिज्ञासा’ पुस्तक ३१ जुलै,२००५ रोजी
प्रकाशित केले. तेंव्हा वाटलं नव्हतं मला की मी बरेच वर्षे बँकिंग विषयावर लिखाण
करेन. एकामागोमाग मागणी तसा पुरवठा करीत करीत बरीच मजल मारली म्हणते. पहिली
आवृत्ती एका महिन्यात संपली. लगेच दुसरी काढली. माझी लेखणी महाराष्ट्रातील विविध
भागात याच पुस्तकाने गेली.
साधी सरळ सोपी भाषा, ओघवती भाषाशैली, समजेल उमजेल अशी लेखणी त्यामुळे पुस्तक
वाचकांना खिळवून ठेवू लागले. इतक्या सोप्या भाषेत लिहिणे मी लिहिले की ज्याला
लिहिता वाचता येते त्याला
नक्कीच बँकिंग समजणार. जवळ जवळ २५ ठिकाणी म्हणजे वर्तमानपत्रे, मासिके,
साप्ताहिके यामध्ये पुस्तकाचे परीक्षण छापून आलेले होते. आवृत्यावर आवरत्या
काढल्या. शेवटची सहावी आवृत्ती ४ सप्टेंबर, २००७ रोजी सकाळ मधुरांगण ऐश्वर्यवती
कार्यक्रमात प्रकाशित केली गेली. एकुणात माझ्या चार पुस्तकांचे प्रकाशन एकत्रित
केले गेले.
त्याचे इंग्रजी रुपांतर ‘Banking Horizon’श्रीमती पुष्पा पंडित
यांनी केले. तेही लोकांना खूप आवडले. त्याहीची पहिली
आवृत्ती लवकर संपली. रोहन ग्राफिक्स यांनी ही दोन्ही पुस्तके अतिशय छान काढली. एकाच
वेळी माझी चार पुस्तके ‘ऐश्वर्यवती’ मधुरांगण कार्यक्रमात प्रकाशित केली गेली.
बँकिंग जिज्ञासा – ६ वी आवृत्ती
Banking
Horizon – २ री आवृत्ती
ऐश्वर्यवती
सार्थ १८ श्लोकी गीता
त्यानंतर मात्र या पुस्तकांच्या आवृत्त्या काढल्या नाहीत. बँकिंग बदलत गेले.
मी वेगळे लिहायला लागले. त्याचीही पुस्तके झाली.
वंदना धर्माधिकारी