15-12-2001
व्हीआरएस घेऊन एक वर्ष
झाले, आणि कसे सरले समजलेच नाही. तरीपण वर्षापूर्वी आणि वर्षभर काय व कसे
ते लेखणीने बरोबर
पकडले शब्दात. तेच हे असे.....
व्हीआरएस पूर्वी आणि व्हीआरएस
नंतर.
व्हीआरएस घेऊन एक वर्ष झाले, आणि
कसे सरले समजलेच नाही. इतके सलग महिने घरात बसायची सवय नव्हतीच. आणि जरी सहा सहा
महिने राजा घेऊन घरी बसले तरी बँकेत एक दिवस जायचे हे निश्चित होते, आणि गेले
देखील. इथे तसे नाहीच, बँक आणि बँकिंग संपलेले. नव्याने आयुष्याला कलाटणी द्यायची
म्हंटल तर करायचं तरी काय? तसा मला फारसा प्रश्न आला नाही. मी आणि मुलीच पुण्यात
होतोत तेंव्हा. बाबा उत्तर प्रदेशात मिरेठला होते. मुलींची महत्वाची वर्षे होती.
अभ्यास होता, धावपळ होती. त्यांना आई घरी आहे यात आनंद होता. तसा मलाही त्यांच्या
बरोबर प्रत्येक दिवस घालवताना खूप छान वाटतं होते.
नोकरी करणाऱ्या बाईच्या मनाला खंत
असते, “ मुलं लहान असताना नाही मला वेळ देता आला. आणि मी कुठेतरी कमी पडले, त्यांना
वाढविताना, संस्कार करताना, अभ्यास घेताना. अगदी प्रत्येकीला असे वाटते. कधी कधी
भितीही वाटते, ती अशी की - मुलं मोठी झाली आणि दूर गेली. मोठी मुलं बाहेरचं अधिक
असतात, त्यांना आई फारशी नसली तरी चालते. पण, मी तरी काय करणार. नोकरी जी करते.” ही
खंत मलाही होती, अजूनही आहे म्हंटल तरी चालेल. एखादी गोष्ट त्यात्या वयात मुलांना
द्यायला नाही जमलं ते आईला जाणवते. बोलता येत नाहीत या गोष्टी हेच खरं. असो....
तर, एक वर्ष झाले व्हीआरएस घेऊन
आणि गंमतशीर कविता केली. आधल्या वर्षी मी काय करीत होते, आणि आत्ता काय करते.
वंदना धर्माधिकारी